क्योटो प्रोटोकॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जपान देशातील क्योटो शहरात जगातील प्रमुख देशांची जागतिक तापमानवाढ व प्रदुषण नियंत्रण या साठी बैठक झाली या बैठकीला क्योटो प्रोटोकॉल असे संबोधले जाते.

सध्याचे तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून त्यामुळे जर पृथ्वीवर असमतोल निर्माण झाल्यास त्याला केवळ मानवजात जवाबदार असणार आहे. ही तापमानवाढ मुख्यत्वे हरितवायू परिणामामुळे होत आहे.

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अमूलाग्र प्रयत्न होण्याची गरज आहे. क्योटो प्रोटोकॉल हा त्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या प्रोटोकॉलमध्ये अनेक देशांनी मान्य केले आहे की ते इ.स. २०१५ पर्यंत आपापल्या देशातील हरितवायूंचे उत्सर्जन इ.स. १९९० सालच्या पातळीपेक्षा कमी आणतील. कराराप्रमाणे अनेक देशांनी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु जर्मनी सोडता बहुतेक देशांना या कराराचे पालन करणे अवघड जात आहे[१]. याचे मुख्य कारण म्हणजे हरित वायूंचे उत्सर्जन एवढ्या पटकन कमी करणे म्हणजे आर्थिक प्रगतीला खीळ घालणे. तसेच या अमेरिकेसारख्या सर्वात जास्त उत्सर्जन करणाऱ्या देशाने अजूनही या करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे एकंदरीत जागतिक तापमानवाढ सध्यातरी अटळ दिसत आहे. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोप, चीन, जपान हे देश जवाबदार देश आहे. याचे मुख्य कारण त्यांचे मोठ्या प्रमाणावरील उर्जेचा वापर व मोठ्या प्रमाणावरील हरितवायूंचे उत्सर्जन परंतु जागतिक तापमानवाढीचा सर्वात जास्त फटका एकंदरीत उष्ण कटीबंधीय देशांना जास्त बसणार आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यास जागतिक प्रयत्नांची गरज आहे.

कलमे[संपादन]

सामील देश व भूमीका[संपादन]

अधिक माहिती[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. [German response to Kyoto Protocol| जर्मनीचे क्योटो प्रोटोकॉल चे पालन विकी लेख]