प्रकाशसंश्लेषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ज्या रासायनिक क्रियेद्वारे वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात हवेतील कर्बद्विप्राणिदवायू (Carbon dioxide)व पाणी वापरून अन्न तयार करतात त्या क्रियेला प्रकाशसंश्लेषण म्हणतात.प्रकाशसंश्लेषण : (फोटोसिंथेसिस). सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या उपयोगाने कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी यांसारख्या साध्या संयुगांपासून रासायनिक विक्रियेने ग्लुकोज, सुक्रोज, स्टार्च इ. गुंतागुंतीच्या संयुगांची निर्मिती होते. ही प्रक्रिया बुरशी, भूछत्रे इ. क्लोरोफिलविरहित (हरितद्रव्यहीन) वनस्पती [⟶ कवक] सोडल्यास इतर सर्व वनस्पतींत आढळते; ह्या प्रक्रियेला ‘प्रकाशसंश्लेषण’ म्हणतात.हा शोध लावण्याचे श्रेय डच वैद्य जे. इंगेनहाउस (१७७९) आणि स्विस शास्त्रज्ञ एन्. टी. द सोस्यूर (१८०४) यांना दिले जाते. तत्पूर्वी, जमिनीतील कुजलेल्या (ह्युमस) कार्बनी पदार्थापासून वनस्पतींचे पोषण होते, असे मानले जात असे.