थरचे वाळवंट
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
थरचे वाळवंट हे भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या सरहद्दीवरचे वाळवंट आहे.
२००००० चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेले हे वाळवंट आकारमानाने जगातील सातव्या व आशियातील तिसऱ्या क्रमांकाचे आहे.[१]
सीमा
[संपादन]भारतात थरच्या पूर्वेला सतलज नदी व अरवली पर्वतरांग असून दक्षिणेला कच्छचे रण आहे. पश्चिमेला हे वाळवंट पाकिस्तानात सिंधू नदीपर्यंत पसरले आहे. भारतातील राजस्थान राज्याचा ३/५ भाग तसेच गुजरात व हरियाणातला काही प्रदेश या वाळवंटाने व्यापला आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांताचा पूर्व भाग (थरपरकार जिल्हा) व पंजाब प्रांताचा दक्षिणेकडचा काही भाग थरमध्ये येतो.
निर्मिति
[संपादन]थर वाळवंटाचा जन्म हा एक वादाचा विषय असून काही भूवैज्ञानिकांच्या मते हे वाळवंट ४००० वर्षे ते १ लाख वर्षे इतके जुने आहे, तर काहींच्या मते हा भूप्रदेश शुष्क होण्यास त्यापेक्षा बऱ्याच आधी सुरुवात झाली होती. अगदी अलीकडे (इ.पू. २०००) सरस्वती नदी अदृश्य झाल्यानंतर हा प्रदेश वालुकामय झाला असाही एक मतप्रवाह आहे. वाळवंटात लुप्त होणारी वर्तमान काळातील घग्गर नदी म्हणजेच सरस्वती यावर मतभेद असले तरी खालील निरीक्षणे संशोधनांती विश्वासार्ह वाटतात.
- सतलज व यमुना ह्या नद्या कधी काळी घग्गर / सरस्वतीच्या उपनद्या होत्या पण भूगर्भातील चकत्यांच्या हालचालींमुळे त्यांचे प्रवाह बदलले. परिणामतः मुख्य नदी आटली.
- कर्बौत्सर्जनाद्वारे कालमापन केले असता हडप्पा व काली बंगा संस्कृतीचे स्थलांतर इ.पू. २००० च्या काळात पाण्याच्या तीव्र दुर्भिक्ष्यामुळे झाले असे अनुमान निघते.[२]
अर्वाचीन साहित्यातील उल्लेख
[संपादन]या प्रदेशाचा रामायणांत लवणसागर असा उल्लेख आढळतो. नंदिस्तुति (ऋग्वेद १०.७५)मधील दाखल्यानुसार सरस्वती नदी सतलज व यमुनेच्या मधोमध होती. महाभारतात देखील सरस्वती नदी वाळवंटात लुप्त होत असल्याची नोंद आहे.
भूविज्ञान
[संपादन]सजीव सृष्टी
[संपादन]वनस्पती
[संपादन]-
खेजडीचे झाड (प्रॉसोपिस सिनेरारिया)
-
कडुलिंब ॲझाडिरॅक्टा इंडिका
-
रोहिडा (टेकोमेला अंड्युलाटा)
-
पिलू (साल्व्हाडोरा ओलेओइडेस)
-
अल्बिझिया लेबेक (शिरीष)
-
बॅलेनाइट्स रॉक्सबर्गी इंगुडा
-
कॅपारिस डेसिड्युआ (खैर)
-
अकेशिया ल्युसोफ्लोआ (रेमझा)
-
अकेशिया सेनेगाल (डिंकबाभूळ)
-
कॅलिगोनम पॉलिगॉनोइडेस फोग
-
अकेशिया निलोटिका (बाभूळ)
-
झिझिफस झिझिफस (बोरीचे झाड)
-
कॅरिसा कॅरेंडस (करवंद)
-
Calotropis procera (Aak shrub)
-
Kankeda (Rajasthani) shrub or small tree
-
Leptadenia pyrotechnica (Khimp shrub)
-
Clerodendrum multiflorum (Arana shrub)
-
Murayla (Rajasthani) shrub
-
Mimosa hamata (Alāy shrub)
-
Tribulus terrestris (गोखरू)
-
Aerva tomentosa (Bui herb)
-
Crotalaria burhia (Sania herb)
-
Saccharum munja (Munja grass)
-
Saccharum spontaneum (Kans grass)
-
Sorghum halepense (Barru grass)
-
Masa (Rajasthani) herb
-
Cenchrus biflorus (Bharut grass)
-
Citrullus colocynthis (Gadtumba climber)
संदर्भ
[संपादन]- ^ http://www.britannica.com/eb/article-9071941/Thar-Desert
- ^ Kalibangan: Death from Natural Causes, by Raikes