हिमनदी
Jump to navigation
Jump to search
हिमनदी अथवा बर्फाची नदी ही शब्दशः बर्फाची नदी असते. याला इंग्रजीत ग्लेशियर असे म्हणतात. हिमनदीचे थोडे पाणी वितळून ते नदीच्या तळापाशी जाते पण वरती बर्फाचे अस्तर राहतेच. या बर्फाच्या अस्तराच्या तळावर या पाण्याचा वंगणासारखा परिणाम (Lubrication) होऊन घर्षण कमी होते व अतिप्रचंड बर्फाचा थर उताराच्या दिशेने घसरू लागतो. सामान्य नदी/ओहोळाप्रमाणे वेग नसला तरी या हिमनदीमध्ये हे बर्फाचे अस्तर वार्षिक २ ते २.५ किमी पर्यंत हलते. अश्या हिमनद्या हिमालय, आल्प्स, अँडीझ, रॉकी, हिंदुकुश पर्वतरांग या पर्वत रांगांमध्ये आहेत. याशिवाय ध्रुवीय प्रदेशात अतिथंडीमुळे सपाट प्रदेशांतही हिमनद्या आढळतात. ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या आकाराने व लांबीनेही मोठ्या असतात. जागतिक तापमानवाढीने हिमनद्यांच्या वितळ्याचा वेग बऱ्याच प्रमाणात वाढला आहे.