"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎वनस्पती: माहितीत भर घातली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎खास आकर्षण: माहितीत भर घातली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११: ओळ ११:


==खास आकर्षण==
==खास आकर्षण==
अजस्त्र अशा खाऱ्या पाण्यातील मगरी; ज्यांची लांबी जवळपास २३ फूट अशी असू शकते; हे येथील सर्वात मोठे आणि खास आकर्षण आहे. तसेच


==पर्यटन==
==पर्यटन==

१३:१९, १९ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

भितरकनिका (अन्य नावे - वित्रकर्णिका) राष्ट्रीय उद्यान हे भारतातील ओरिसा राज्यातील केंद्रपाडा जिल्ह्यात आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ६७२ चौ.किमी. आहे. या राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूने भितरकनिका अभयारण्य वसलेले आहे. याच्या पूर्वेला गहिरमाथा सागरकिनारा आणि सागरी अभयारण्य आहे. १६ सप्टेंबर १९९८ रोजी हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले. या राष्ट्रीय उद्यानात ब्राह्मणी, बैतरणी, धामरा, पाठसाला या नद्यांमधून पाणी येते.

वनस्पती

येथे सुंदरी, थेस्पिया, कॅझ्युरीना अशा अनेक प्रकारच्या खारफुटी वनस्पतींच्या प्रजाती आहेत. येथे इंडिगो बुश हे व इतरही गवतांच्या प्रजाती आहेत.भारतातील ही दुसऱ्या क्रमांकावर असलेली सर्वांत मोठी खारफुटी परिसंस्था आहे.येथील वन हे हेंतल वन म्हणून ओळखले जाते.

प्राणी

खाऱ्या पाण्यातील मगरी, पांढऱ्या मगरी,जंगली डुक्कर, रिसस प्रजातीची ( लाल तोंडी ) माकडे, चितळ, मॉनिटर लिझार्ड असे प्राणी अजगर, किंग कोब्रा हे सर्प आणि काळा कुदळ्या,डार्टर हे पक्षी येथे आढळतात. गहिरमाथा आणि इतर सागर किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्र कासव आपण बघू शकतो. धोका असलेल्या खाऱ्या पाण्यातील मगरी येथे सर्वात जास्त संख्येने आढळतात.

खास आकर्षण

अजस्त्र अशा खाऱ्या पाण्यातील मगरी; ज्यांची लांबी जवळपास २३ फूट अशी असू शकते; हे येथील सर्वात मोठे आणि खास आकर्षण आहे. तसेच

पर्यटन

हे सुद्धा पहा