"डीझेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਡੀਜ਼ਲ
छो Bot: Migrating 53 langlinks, now provided by Wikidata on d:Q38423
ओळ ५९: ओळ ५९:
[[वर्ग:पेट्रोलियमजन्य पदार्थ]]
[[वर्ग:पेट्रोलियमजन्य पदार्थ]]
[[वर्ग:ज्वलनशील पदार्थ]]
[[वर्ग:ज्वलनशील पदार्थ]]

[[af:Diesel]]
[[ar:ديزل (وقود)]]
[[arz:سولار]]
[[bg:Дизелово гориво]]
[[bs:Dizel gorivo]]
[[ca:Gasoli]]
[[cs:Motorová nafta]]
[[da:Dieselolie]]
[[de:Dieselkraftstoff]]
[[en:Diesel fuel]]
[[eo:Dizeloleo]]
[[es:Gasóleo]]
[[et:Diislikütus]]
[[eu:Gasolio]]
[[fa:سوخت دیزل]]
[[fi:Dieselöljy]]
[[fr:Gazole]]
[[he:סולר]]
[[hi:डीज़ल]]
[[hr:Diesel]]
[[id:Diesel]]
[[is:Dísilolía]]
[[it:Gasolio]]
[[ja:軽油]]
[[jv:Diesel]]
[[kk:Дизель отыны]]
[[ko:경유]]
[[lt:Dyzelinas]]
[[ml:ഡീസൽ]]
[[ms:Diesel]]
[[my:ဒီဇယ်ဆီ]]
[[nl:Dieselolie]]
[[nn:Diesel]]
[[no:Diesel]]
[[pa:ਡੀਜ਼ਲ]]
[[pl:Olej napędowy]]
[[pt:Diesel]]
[[ro:Motorină]]
[[ru:Дизельное топливо]]
[[scn:Gassoliu]]
[[simple:Diesel engine]]
[[sk:Motorová nafta]]
[[so:Nafto]]
[[sr:Дизел-гориво]]
[[sv:Dieselolja]]
[[sw:Diseli]]
[[ta:டீசல்]]
[[th:น้ำมันดีเซล]]
[[tr:Mazot]]
[[uk:Дизельне паливо]]
[[ur:ڈیزل (ایندھن)]]
[[vi:Dầu diesel]]
[[zh:柴油]]

१९:०९, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

डीझेल हे (इंग्रजी:Diesel) द्रवरूप इंधन आहे. हे डीझेल इंजिन मध्ये वापरले जाणारे इंधन आहे.

बायोडीझेल

हे रसायन दाब दिल्यावर स्फोट पावते. हे इंधन पेट्रोलियम पदार्थामधून काढले जाते म्हणून याला पेट्रोडीझेल असेही नाव आहे. परंतु पर्यायी डिझेल इंधने जसे की बायो डीझेल हे पेट्रोलियम पदार्थातून काढले जात नाही. पेट्रोडीझेल मधून सल्फर चे प्रदुषण कमी होते म्हणून त्यास अल्ट्रा लो सल्फर डिझेल - 'गंधकाची पातळी अति कमी असलेले डीझेल' (Ultra-low sulfur diesel) असेही संबोधले जाते. हे एक सल्फर प्रदुषणाची पातळी मोजण्याचे एकक म्हणूनही ओळखले जाते. अमेरिकेची संयुक्त संस्थानेयुरोप खंडात बहुतांश ठिकाणी आता अल्ट्रा लो सल्फर डिझेल चा उपयोग केला जातो.

इतिहास

डीझेल हा शब्द जर्मनी येथील शास्त्रज्ञ रुडॉल्फ कार्ल डीझेल यांच्या नावरून घेतला गेला आहे. यांनी इ.स. १८९२ मध्ये डिझेल या इंधनाचा शोध लावला.

डिझेल इंजिन

डीझेल इंजिन ही अंतर्गत स्फोटक इंजिने आहेत. हे इंधन पेट्रोल या इंधनाच्या अतिज्वलनशीलतेला पर्याय म्हणून हे वापरतात. रुडॉल्फ कार्ल डीझेल यांनी कोळश्याच्या भुकटीचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी म्हणून या इंजिनाची रचना केली. त्याच वेळी त्यांनी त्यावर इतर इंधने जसे भुईमुगाचे तेल ही यशस्वीरीत्या वापरून पाहिली. हे इंजिन त्यांनी इ.स. १९०० च्या पॅरिस प्रदर्शनात प्रदर्शित केले.

उगम

शुद्धीकरण

पेट्रोडीझेल हे जीवाष्म इंधन आहे. हे कर्बोदक म्हणजेच कर्बोदके यांचे मिश्रण आहे. हे क्रूड तेलाच्या २०० अंश सेंटिग्रेड ते ३५० अंश सेंटिग्रेड या तापमानावर सामान्य वातावरणाच्या दाबात क्रूड तेलाच्याच्या अंशत: शुद्धिकरणातून मिळवले जाते.

डिझेल इंजिनाचे कार्य

पेट्रोल इंजिनमध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्चदाबाच्या स्पार्कप्लग चा उपयोग डीझेल इंजिनात केला जात नाही. त्या ऐवजी डिझेल आणि हवेच्या मिश्रणावर अति उच्च दाब जास्त तापमानावर आणला जातो. दाबाचा रेशिओ १५:१ ते २१:१ सर्वसाधारण असतो. इंजिनात डिझेल काँप्रेशन स्ट्रोक च्या शेवटी सिलिंडर मध्ये हवे सोबत सोडले (इंजेक्ट) जाते. आतील उच्च तपमानामुळे डिझेल व ऑक्सिजन दरम्यान क्रियेला सुरुवात होते. यामुळे दाब तयार होवून यांत्रिक प्रक्रियेला सुरुवात होते. म्हणजे दाबाने पिस्टन हलतो व तो क्रँकला गोल फिरवतो. थंड वातावरणात इंजिन चालू करण्यासाठी इंजिनाचे तापमान वाढवणे गरजेचे ठरते. या तापमान वाढीसाठी ग्लो प्लग चा उपयोग होतो. हे प्लग सिलिंडरच्या आतील तापमान वाढवतात. त्यामुळे इंजिन सुरु करणे सोपे होते.

उपयोग

हे डिझेल नावाचे रसायन उच्च तापमानातही सहजतेने जळत नसल्याने, डिझेल चा उपयोग चिलखती वाहने, लष्करी वाहने तसेच रणगाडे यात होतो. डिझेल इंजिने ही जास्त ताकदीचा टोला (टॉर्क) देवू शकतात. त्यामुळे मालवाहतूकीचे ट्रकट्रॅक्टर मध्ये ही त्याचा वापर होतो.

मोटारींमध्येही डिझेल चा उपयोग होतो. यामुळे पेट्रोल इतके प्रदूषण होत नाही. तसेच एका लिटर मध्ये या गाड्या जास्त धाव देतात असे आढळते.

मर्यादा

डीझेल थंडीत लवकर घट्ट होते व सहजतेने वाहू शकत नाही. त्यामुळे इंजिन सुरु करणे अवघड बनते. विशिष्ट रसायने मिसळून यासाठी कमी तापमानात घट्ट न होणारे डिझेल बनवले जाते. तसेच जर डिझेल इंजिनाला डिझेल पुरवणारा पंप उघड्या अवस्थेत बंद पडला तर इंजिन चालूच राहते. इंग्रजी मध्ये याला रनअवे असे म्हणतात. अशा स्थितीत अडकलेले इंजिन बंद करणे अवघड होते. व शेवटी अनियंत्रित अतिवेगात फिरल्याने हे इंजिन झीज होऊन बंद पडते.

प्रदुषण

डीझेल मुळे सल्फरचे हवेतले प्रमाण वाढते. मात्र युरोप व इतरत्र झालेल्या जागरूकीमुळे आता त्यावर बंधने आणण्यात आली आहेत. या बंधनांमुळे अल्ट्रा लो सल्फर डिझेल चा जास्त उपयोग केला जातो. तरीही हे प्रदुषण वाढते आहे. या शिवाय गळतीमुळे जर डिझेल पाण्यावर पसरले तर ते पाण्यात मिसळत नाही व त्याचा तवंग पाण्यावर साठतो. यामुळे पाण्याचा ऑक्सिजनशी संबंध खुंटतो व प्राणवायूचे पाण्यातील प्रमाण घटत गेल्याने पाण्यातील जीवसृष्टीचा नाश ओढवतो.

डीझेल पाण्यात मिसळत नाही व त्याचा तवंग साठतो.

रासायनिक गुणधर्म

डीझेल मध्ये ७५% संपृक्त कर्बोदक म्हणजेच कर्बोदके (मुख्यतः पॅराफिन (इंग्रजी: paraffins)) आणि २५% अरोमॅटिक[मराठी शब्द सुचवा] कर्बोदके तसेच यात मुख्यतः नॅफ्तॅलिन (इंग्रजी: naphthalenes) आणि अल्कलिबेंझिन (इंग्रजी: alkylbenzenes) असते.[मराठी शब्द सुचवा] डिझेलचे रासायनिक संयुगः C12H23 असे आहे.

बायोडिझेल

बायोडीझेल हे वनस्पती तेला पासून मिळवले जाते. जसे सोयाबीन चे तेल. परंतु हे जास्त काजळी निर्माण करते. यावर उपाय म्हणून पेट्रोडीझेल व बायोडीझेल यांचे मिश्रण वापरले जाते. सोयाबीन, मका, भुईमूग आदी खाद्य तेलबियांपासून बायोडीझेलची निर्मिती केली जाते. तसेच करंजीच्या (जत्रोफा) या झाडाच्या अखाद्य तेलबियांपासूनही बायोडिझेल मिळवले जाते. असे काही प्रकल्प सद्य काळात भारतातील महाराष्ट्र राज्यातही चालवले जात आहेत..[ संदर्भ हवा ]

सोयाबीन पासून बनवलेले बायोडिझेल

आरोग्यावर परिणाम

डिझेलच्या धुरातून बाहेर पडणारे कार्बनचे बारीक कण हवेचे प्रदुषण घडवतात. तसेच डिझेलच्या धुरातून येणारे गंधक घश्याच्या आजारांचे प्रमाण वाढवतो असे दिल्ली येथील अभ्यासात आढळून आले आहे.[ संदर्भ हवा ] त्याच प्रमाणे नवजात शिशुंच्या आरोग्यावरही याचे परिणाम होतात असे मानले जाते. डिझेलच्या धुराने होणारे प्रदुषण व त्याचे पुर्ण परिणाम अजून समोर यायचे आहेत.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील जुन्या तंत्रज्ञानवर चालणरा एक ट्रक सुरु होतांना प्रदुषण करत आहे

अर्थ व्यवस्था आणि कर

पाश्चात्य जगतात डिझेलच्या किंमती मुक्त व स्पर्धात्मक असतात. मात्र यात तेल कंपन्या भरमसाटपणे नफेबाजी करतात असे समज आहेत. शेल, कॅल्टेक्स ब्रिटिश पेट्रोलियम आदी तेल कंपन्या याचा वारंवार इन्कार करतात.[ संदर्भ हवा ] भारतात डिझेलवर अनुदान दिले जाते. यामुळे वाहतुकीला आणि शेती साठी डिझेल स्वस्तात उपलब्ध होते. स्वस्त वाहतूक व स्वस्त शेती उत्पादने याचा एकुण अर्थव्यवस्थेला फायदा होतो. त्याचवेळी या अनुदानामुळे महागाई वाढते असाही अर्थशास्त्रातील एक मतप्रवाह आहे.[ संदर्भ हवा ] डीझेल वर भारतात अबकारी कर तसेच राज्या राज्यानुसार विक्री कर आकारला जातो. या शिवाय बदलत्या आंतरराष्ट्रीय किंमतीनुसार केंद्र सरकार कडून केंद्रिय आयात शुल्क कमी किंवा जास्त केले जाते.[ संदर्भ हवा ]

बाह्य दुवे