बाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नवजात शिशु या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

नुकत्याच जन्मलेल्या बाळाला नवजात अर्भक (Infant) म्हणतात, आणि त्याच्या आईला बाळंतीण. त्याचे वय २८ दिवसांचे होईपर्यंत नवजात म्हणतात. २८ दिवसांपासून ३ वर्षांपर्यंत बाल्यावस्था आणि ३ ते १६ वर्षांपर्यंत किशोरावस्था म्हणतात.

नवजात अर्भक- बाळ

नवजात अर्भकाचे श्वसन व रक्ताभिसरण[संपादन]

जन्मल्यानंतर स्वतंत्र श्वसनक्रिया सुरू होणे ही बाळासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. श्वसनाचा मार्ग साफ होऊन मूल जन्मल्यावर प्रथम रडते. तेव्हा श्वसन स्वतंत्रपणे सुरू होते.

 • पहिल्या रडण्यानंतर शांत झालेल्या मुलाचा श्वसनाचा दर प्रत्येक मिनिटाला ३० ते ४० इतका असतो. त्यात अनियमित लय असू शकते.
 • त्वचेचा रंग गुलाबी असतो, श्वसनक्रियेत किंवा हृदय व रक्ताभिसरणात काही दोष असल्यास बाळाचे ओठ, डोळयाखालचा भाग, हात, पाय व नखे यांवर निळसर झाक असते.
 • कधीकधी मूल पांढरट व निस्तेज दिसते. असे काही असल्यास मूल रुग्णालयात पाठवावे.
 • श्वसनक्रियेत जर काही दोष असेल तर श्वसनाच्या वेळी बाळाच्या नाकपुडया फुलतात, छातीच्या फासळया आत ओढल्या जातात(Grunting) आणि हनुवटी व मान वर खाली होते.
 • श्वसनात जास्त गंभीर दोष असेल तेव्हा श्वास सोडताना बाळ कण्हते.

नवजात अर्भकाची विष्ठा[संपादन]

बाळ प्रथम शी (विष्ठा) करते ती हिरवट-काळसर रंगाची असते. पहिले दोन ते तीन दिवस हा रंग टिकतो. प्रथम शी करण्याची वेळ जन्मल्यावर ४८ तासांपर्यंत कधीही असू शकते. ४ ते ५ दिवसात काळा रंग जाऊन पिवळी शी होऊ लागते.यात बाळा-बाळात पुष्कळ फरक असतो. काही बाळे दिवसातून १२-१५ वेळा शी करतात. याउलट काही बाळे ४ ते ७ दिवसात एकदाच शी करू लागतात. पिवळी व सैलसर शी असेल तर किती वेळा होते त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नसते.

वजन[संपादन]

आपल्या देशात नवजात बाळाचे वजन २ किलो ते ३ किलो (सर्वसाधारणपणे २.५ किलो) असते. ते ३ऱ्या महिन्यात दुप्पट व १ वर्षांपर्यंत ३ पट होणे अपेक्षित असते. कोणत्याही बाळाचे हास्य बघितले कि, आपला थकवा दूर होतो.

नवजात शिशु

बाळ जन्मताना घ्यावयाची काळजी[संपादन]

 • बाळाचे डोके बाहेर आल्यावर बाकीचे शरीर पूर्ण बाहेर येण्याची वाट न पहाता, बाळाचा श्वसनमार्ग साफ करावा.
 • बाळाला उलटे धरू नका.
 • बाळावर पाणी मारू नका.
 • बाळाचे नाक, तोंड व घसा स्रावनळीने साफ करावा. म्यूकस नळी नसल्यास स्वच्छ मऊ सुती कपडा करंगळीला गुंडाळून बाळाच्या घशातून बोट फिरवून चिकटा काढून टाकावा.
 • बाळ बाहेर आल्यावर नाळेतील नाडी तपासून ती थांबल्यावरच नाळ कापावी.
 • तोपर्यंत बाळ लगेच कोरडे करावे. लगोलग उबदार कपड्यात गुंडाळून ठेवावे. असे न केले तर बाळाच्या शरीराचे तापमान कमी होण्याची शक्यता असते.
 • बाला ला गरगर फिरवू नका .