Jump to content

मानवी विकास निर्देशांक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मानवी विकास सूचक या पानावरून पुनर्निर्देशित)
World map representing the inequality-adjusted Human Development Index categories (based on 2018 data, published in 2019).[]
  0.800–1.000 (very high)
  0.700–0.799 (high)
  0.550–0.699 (medium)
  0.350–0.549 (low)
  Data unavailable

मानवी विकास निर्देशांक हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसिनशीलअविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.

इ.स. १९९० साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.महबूब् उल हक यांना "मानव विकास निर्देशाकाचे जनक" म्हणून संबोधले जाते.[][][]

१९९० पहिल्या मानवी विकास अहवालात मानवी कल्याणासाठी प्रगती करण्याचा एक नवीन दृष्टीकोन सादर केला.१९९० मध्ये पहिला मानवी विकास अहवाल प्रकाशित करण्यात आला.

मोजणीची पद्धत

[संपादन]

नवी पद्धत

[संपादन]

४ नोव्हेंबर २०१० नंतर, तीन घटक असलेली नवी मोजणी पद्धती अमलात आणली गेली.[]

१. आयुर्मान निर्देशांक (आ. नि.) = (सरासरी आयुर्मान - २०) / (८५ - २०)

जेव्हा सरासरी आयुर्मान ८५ असते तेव्हा निर्देशांक १ असतो आणि जेव्हा ते २० असते तेव्हा निर्देशांक ० असतो.

२. शैक्षणिक निर्देशांक (शै. नि.) = (स. शा. व. नि. + अ. शा. व. नि.)/२

सरासरी शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक (स. शा. व. नि.) = सरासरी शालेय शिक्षण वर्ष / 15

अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक (अ. शा. व. नि.) = अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष / 18

३. उत्पन्न निर्देशांक (उ. नि.) = [ln (द. डो. ए. रा. उ.) - ln (१००)] / [ln (७५०००) - ln (१००)]

जेव्हा दर डोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न (द. डो. ए. रा. उ.) हे ७५००० अमेरिकन डॉलर असते तेव्हा हा निर्देशांक १ असतो आणि जेव्हा ते १०० अमेरिकन डॉलर असते तेव्हा तो ० असतो.

मानवी विकास निर्देशांक हा वरील तीनही निर्देशांकाचा भौमितिक मध्य असतो.

मानवी विकास निर्देशांक = ∛(आ. नि.)x(शै. नि.)x(उ. नि.)

४ ) मानवी विकास  निर्देशांक 0 ते १ च्या  दरम्यान असतो , 0 म्हणजे मानवी विकास झालेला नाही तर १ म्हणजे पूर्ण मानवी विकास होय.

५) निर्देशांकावर आधारित विविध देशांची वर्गवारी केली जाते , o.७५८ पेक्षा जास्त मानवी विकास निर्दशांक असणाऱ्या देशाना 'अतिउच्च मानव विकास ' गटात o .६४o ते o.७५८ मानव विकास निर्देशांक असल्यास 'उच्च मानवी विकास 'o.४६६ ते o.६४o मानव विकास निर्देशांक असल्यास 'मध्यम मानवी विकास 'आणि o.४६६ पेक्षा कमी मानवी विकास निर्देशांक असल्यास त्या देशाना 'कमी मानवी विकास गटात 'टाकले जाते . 

२००९ अहवाल

[संपादन]

५ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी खुल्या केलेल्या ह्या अहवालानुसार जगातील विकसित देश खालील आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Human Development Report 2019 – "Human Development Indices and Indicators"" (PDF). HDRO (Human Development Report Office) संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम. pp. 22–25. 9 December 2019 रोजी पाहिले.
  2. ^ A. Stanton, Elizabeth (फेब्रुवारी 2007). "The Human Development Index: A History". PERI Working Papers: 14–15. 28 फेब्रुवारी 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 फेब्रुवारी 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Human Development Index". Economic Times. 1 डिसेंबर 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 नोव्हेंबर 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "The Human Development concept". UNDP. 2010. 15 एप्रिल 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 जुलै 2011 रोजी पाहिले.
  5. ^ http://hdr.undp.org/sites/default/files/reports/270/hdr_2010_en_complete_reprint.pdf
  6. ^ मानवी विकास अहवाल २००९ (इंग्लिश मजकूर) (पृ. १७१, २०४)

हे सुद्धा पहा

[संपादन]