Jump to content

मराठवाडा साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे. कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलने, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेचे स्वतःचे पुस्तक प्रकाशन आहे. संस्थेच्या मराठवाड्यात, नांदेड आदी ठिकाणी शाखा आहेत. नांदेडचे शाखाध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम (जून २०१२) आहेत. संमेलने भरवणऱ्या आणखीही काही संस्था मराठवाड्यात आहेत. या सर्व संस्थांनी भरवलेली काही साहित्य संमेलने  :


  • मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले जिल्हा साहित्य संमेलन औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी येथे १९ डिसेंबर २०१३ रोजी झाले. हे संमेलन साहित्य परिषदेची खुलदाबाद शाखा व तेथीलच महाराज सयाजीराव गायकवाड महाविद्यालय यांनी आयोजित केले होते.
  • २१ व २२ मार्च २०१५ या दिवशी मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने नांदेड येथे मराठवाडास्तरीय शेतकरी साहित्य संमेलन झाले..
  • ८वे मराठवाडा साहित्य संमेलन १९५२ साली उदगीर येथे झाले होते. त्यानंतर उदगीरला २०१८ साली हे संमेलन झाले.
  • १९८८ साली झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यू.म. पठाण होते.
  • लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी हे २१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • २६वे मराठवाडा साहित्य संमेलन २००४ साली माजलगाव येथे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आले.या संमेलनाचे अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर हे होते तर स्वागताध्यक्ष माजी आमदार डी. के.देशमुख हे होते. संमेलनाचे उदघाटन प्राचार्य राम शेवाळकर यांच्या हस्ते झाले.
  • मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने २००८साली २९ वे मराठवाडा साहित्य संमेलन नायगाव बाजार (जि. नांदेड) येथे झाले.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे ३१वे मराठवाडा साहित्य संमेलन मुरूड (ता. लातूर) येथे २३ व २४ जानेवारी २०१०ला झाले. संमेलनाध्यक्ष फ.मुं. शिंदे होते.
  • वैजापूर तालुक्‍यातील शिवूर (जिल्हा औरंगाबाद) येथे ता. २९ व ३० जानेवारी २०११ रोजी मराठवाडा साहित्य परिषदेचे ३२वे मराठवाडा साहित्य संमेलन झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे ३३वे मराठवाडा साहित्य संमेलन ७ व ८ जानेवारी २०१२ या काळात बीड जिल्ह्यातील कडा येथे झाले.. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक व पत्रकार भालचंद देशपांडे होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे ३४वे मराठवाडा साहित्य संमेलन पैठण येथे २२-२३ डिसेंबर २०१२ला झाले. संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड (की भालचंद्र देशपांडे?) होते.
  • बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित केलेले मराठवाडा साहित्य परिषदेचे ३५वे मराठवाडा साहित्य संमेलन वसमत येथे ९-१०- नोव्हेंबर २०१४ या काळात झाले. अध्यक्ष भारत सासणे होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे ३६वे मराठवाडा साहित्य संमेलन नांदेड येथे १४-१५ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत झाले. संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख होते.. हे संमेलन यापूर्वी उदगीर येथे होणार होते, परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे ते संमेलन रद्द करण्यात आले होते.
  • औरंगाबाद-मराठवाडा साहित्य परिषदेचे ३८वे मराठवाडा साहित्य संमेलन अंजिठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या सोयगाव येथे २०१६ सालात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झाले. संमेलनाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे होते.
  • ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे २४ आणि २५ डिसेंबर २०१७ या काळात झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी होते. या संमेलनाचे उद‍्घाटन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (पालवे) यांच्या हस्ते झाले.
  • ४०वे मराठवाडा साहित्य संमेलन उदगीर येथे २२ ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत झाले. संमेलनाध्यक्ष डाॅ. ऋषिकेश कांबळे होते. यापूर्वी उदगीरला १९५२ साली ८वे संमेलन झाले होते. या ४०व्या संमेलनात एकूण १२ ठराव पास झाले.
  • ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन देगलूर (जि. नांदेड) येथे मार्च महिन्यात २०२० साली झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार होते.



  • मराठवाडा साहित्य संमेलनाचा हिस्सा असलेले शिक्षकशाखा साहित्य संमेलन उदगीर येथे २३ डिसेंबर २०१८ रोजी झाले. डाॅ. संजीवनी तडेगावकर संमेलनाध्यक्षा होत्या.


पहा : मराठी साहित्य संमेलने : ग्रामीण साहित्य संमेलन : जिल्हा साहित्य संमेलने : महिला साहित्य संमेलने