वृषाली किन्हाळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. वृषाली किन्हाळकर या मराठवाड्यातील एक मराठी कवयित्री व लेखिका आहेत. त्यांच्या दोन कवितासंग्रहांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वृषाली किन्हाळकर यांचे मला उमगलेले अध्यात्म हे सदर महाराष्ट्र टाइम्समध्ये दर बुधवारी प्रकाशित होत असे. त्यांनी दै. पुण्यनगरी, दिव्य मराठी व लोकसत्तामध्ये लेखन केले आहे.

त्यांचे पती डॉ. माधवराव भुजंगराव किन्हाळकर हे भोकर मतदारसंघातून निवडले जाणारे आमदार व माजी गृहराज्यमंत्री आहेत.

किन्हाळकर या अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय मेडिकल कॉलेजमधून स्नातक झालेल्या स्‍त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्या नांदेड येथे वैद्यकव्यवसाय करतात.

पुस्तके[संपादन]

  • तारी (कवितासंग्रह)
  • वेदन (कवितासंग्रह)
  • संवेद्य (ललित लेखसंग्रह)
  • सहजरंग (ललित लेखसंग्रह)

पुरस्कार[संपादन]

  • २२ फेब्रुवारी २००९ रोजी करकाळा (तालुका उमरी, जिल्हा नांदेड) येथे झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या त्या खास निमंत्रित पाहुण्या होत्या.
  • वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय (पळसप) यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेले २ रे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप(तालुका व जिल्हा उस्मानाबाद) येथे २ फेब्रुवारी २०१३रोजी भरले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.
  • किन्हाळकर यांच्या तारी आणि वेदन या दोन्ही कवितासंग्रहाला पुरस्कार मिळाले आहेत.
  • (कै.) सौ. कमलताई जामकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा "दर्पण' पुरस्कार.
  • उस्मानाबाद येथे ६-७ फेब्रुवारी २०१६ या काळात झालेल्या ७व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.