संजीवनी तडेगावकर
डाॅ. संजीवनी तडेगावकर या एक मराठी कवयित्री आणि ललित लेखिका आहेत. स्त्रियांच्या कविता हा त्यांचा पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता. त्यांनी २०१० साली सोलापूर विद्यापीठ, महाराष्ट्र मधून पीएच.डी. प्राप्त केली. त्या जालना, महाराष्ट्र येथील रहिवासी आहेत. वृत्तपत्रांतून सदरलेखन करतात तसेच विविध पुस्तकांना प्रस्तावना,निमित्ताने पुस्तक परीक्षण ,पुस्तक अनुवाद आदि लेखनही करतात.
सन्माननीय पदधारण
[संपादन]● अध्यक्ष - अनुभव प्रतिष्ठान
● संपादक -'आशयघन' वाङ्मयीन त्रैमासिक
● संयोजक- 'कवितेचा पाडवा', जालना हा कवींच्या सन्मानार्थ 1999 पासूनचा साहित्यिक उपक्रम. 'दुःखी'राज्य काव्यपुरस्कार (21 हजार रुपये रोख व सन्मान)
● संचालक - मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद सन-2015-2020
● सदस्य - मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र शासन (सेन्सॉर बोर्ड), मुंबई.सन 2016-2018 व सन 2019-2021
● सदस्य- मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादचे' प्रतिष्ठान या द्वैमासिक संपादक मंडळाच्या सदस्य. सन 2015-2020
● सादरीकरण - कथा -कविता व निवेदनावर आधारित 'कथा कवितेला भेटली' हा वाङ्मयीन कार्यक्रम विविध महाविद्यालय,सामाजिक संस्था आयोजित उपक्रमामध्ये प्रबोधन व मनोरंजनावर आधारित दीड तासाचा (काव्यगायनासहित) कार्यक्रम. 1000 पेक्षाही जास्त ठिकाणी कार्यक्रम सादर. विविध नियोजित विषयांवर व्याख्यान .
● कविसंमेलन सहभाग - अखिल भारतीय साहित्य संमेलन, विभागीय साहित्य संमेलन, विभागीय लेखिका संमेलन, सर्व भाषेतील प्रजासत्ताकपूर्व संध्या, आकाशवाणी वरील कविता सादरीकरण, गोवा साहित्य अकादमी, महाराष्ट्र सदन दिल्ली, विश्व साहित्य संमेलन, 'शोध मराठी मनाचा' ,मराठी संमेलन बेळगाव(कर्नाटक),मराठी संमेलन, इंदूर (मध्यप्रदेश)
●प्रकाशित पुस्तके
[संपादन]◆ कवितासंग्रह ◆
¶ फुटवे | २००७
● अरुंद दारातून बाहेर पडताना | २०११
¶ संदर्भासहित | २०१८
● अनुवाद | एक होती सारा | मूळ लेखक | अमृता प्रीतम | २०१९
● ललित लेखसंग्रह | चिगूर | २००९ । द्वितीय आवृत्ती |२०१८
● मुलाखतसंग्रह | पापुद्रे | २०११
● संदर्भासहित | २०१८. या कवितासंग्रहाला मसापचा काॅन्टिनेन्टल प्रकाशनपुरस्कृत कुसुमाग्रज स्मृति पुरस्कार मिळाला. (२८ फेब्रुवारी २०१९)
● समीक्षा | ...आणि झरे मोकळे झाले | २०१५
(सर्व प्रकाशित पुस्तके www.book ganga.com येथेही उपलब्ध)
¶ संपादन | आशयघन साहित्यिक त्रैमासिक २०१७ पासून
पुरस्कार
[संपादन]- अजिंठा पुरस्कार, जालना | २०११
- 'अरुंद दारातून बाहेर पडताना' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचा 'इदिरा संत' काव्य पुरस्कार | २०११
- कला गौरव राज्य साहित्य पुरस्कार, तरडगाव ,फलटण,सातारा | २०११
- कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे | २०१९
- कोजागरी राज्यसाहित्य पुरस्कार, मंठा ,जालना |२०१३
- ग्रामीण साहित्य पुरस्कार भि.ग. रोहमारे, कोपरगाव, अहमदनगर |२०१२
- चन्द्रभागा राज्य साहित्य पुरस्कार, जालना |२०१२
- कै. धोंंडीराम माने वाङ्मय पुरस्कार, औरंगाबाद | २००८
- प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार, नांदेड | २०११
- मराठवाडा कलागौरव राज्य साहित्य पुरस्कार, औरंगाबाद | २०१३
- यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कार, पुणे | २०१२
- कवी रत्नाकर धम्मपाल राज्यसाहित्य पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर | २०१९
- रमेशलालजी गांधी राज्य साहित्य पुरस्कार, पाथर्डी ,अहमदनगर | २०१२
- रुपाली दुधगावकर राज्य साहित्य पुरस्कार, जिंतूर ,परभणी | २०१२
- शब्दवेल राज्य साहित्य पुरस्कार, लातूर | २०१२
- साहित्यातील योगदान,'लोकमत सखीसन्मान',औरंगाबाद | 2019
- सुभद्रा राज्य पुरस्कार, सेलू, परभणी | २००८
- हौसाई उत्कृष्ट वाड़्:मय राज्य पुरस्कार,कोल्हापूर 2021
- लोकमत अचिवर्स अवॉर्ड -2021
अभ्यासक्रमात समाविष्ट साहित्य
[संपादन]- संत तुकडोजी महाराज विद्यापीठ,नागपूर
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
- महाराजा सयाजीराव विद्यापीठ,बडोदा (गुजरात)
सन्माननीय समावेश
[संपादन]- स्त्रीलिखित मराठी कविता |१९५०-२०१० |संपादक | डॉ अरुणा ढेरे.
सहभाग
[संपादन]- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
- अखिल भारतीय मराठी साहित्य-संस्कृती संमेलन, पणजी, गोवा
- एक कवी- एक कवयित्री, म-सा-प पुणे
- कला अकादमी गोवा काव्यहोत्र राष्ट्रीय कवी संमेलन, पणजी, गोवा
- कवी संमेलन मराठी साहित्य परिषद
- ग्रंथ महोत्सव महाराष्ट्र सदन, दिल्ली
- जागतिक मराठी अकादमी साहित्य संमेलन, 'शोध मराठी मनाचा'
- प्रजासत्ताक दिन पूर्वसंध्येला आकाशवाणीवर सर्व भारतीय भाषा कविसंमेलन, मुंबई
- ● अध्यक्ष ●
- मराठवाडा साहित्य परिषदेचे लेखिका साहित्य संमेलन अध्यक्ष, जालना ,माजलगाव , उस्मानाबाद
- मराठवाडा साहित्य संमेलनाचा हिस्सा असलेले शिक्षकशाखा साहित्य संमेलन उदगीर येथे २३ डिसेंबर २०१८ रोजी झाले. डाॅ. संजीवनी तडेगावकर संमेलनाध्यक्षा होत्या.
- संमेलनाध्यक्ष, ३रे झेप साहित्य संमेलन,औरंगाबाद २०१७
- संमेलनाध्यक्ष,१९वे अक्षरयात्री ग्रामीण साहित्य संमेलन, विटा जि.सांगली २०१८