जिल्हा साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जिल्हा साहित्य संमेलने या पानावरून पुनर्निर्देशित)

महाराष्ट्रात जिल्हास्तरावर होणाऱ्या साहित्य संमेलनांस जिल्हा साहित्य संमेलन म्हणतात. त्यांतली काही ग्रामीण साहित्य संमेलन म्हणूनही ओळखली जातात. ही संमेलने घेणाऱ्या संस्थांचे कार्य सहसा त्या जिल्ह्यातच असते.

औरंगाबाद जिल्हा[संपादन]

  • १ले औरंगाबाद जिल्हा मराठा साहित्य संमेलन,२७-६-२०१०, संमेलनाध्यक्ष : रा.रं.बोराडे
  • दुसरे औरंगाबाद जिल्हा मराठा साहित्य संमेलन २२ व २३ डिसेंबर २०१२ रोजी जिल्ह्यातील वैजापूर येथे झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव गडाख होते.
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे औरंगाबाद जिल्ह्यातले १ले जिल्हा साहित्य संमेलन १९डिसेंबर २०१३ रोजी बाजारसावंगी या गावी झाले.

कोल्हापूर जिल्हा[संपादन]

  • जिल्ह्यातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी येथील राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे १०, ११ जुलै २०१० पहिले कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन आयोजण्यात आले होते. संमेलनाध्यक्ष ?
  • दुसरे जिल्हा साहित्य संमेलन आणि ग्रंथोत्सव कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनमध्ये ३ ते ५ डिसेंबर २०११ रोजी झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे हे संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष कथालेखक सखा कलाल होते.

चंद्रपूर जिल्हा[संपादन]

  • येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचाच्यावतीने २२ डिसेंबर २०१८ रोजी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यिक वसंत आबाजी डहाके संमेलनाध्यक्ष होते.

ठाणे जिल्हा[संपादन]

  • ठाणे जिल्हा साहित्य संमेलन (२००८). संमेलनाध्यक्ष : विजय पाडळकर
  • ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने १७ जानेवारी २०१०ला ठाणे जिल्हा एक साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष ?
  • ३रे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : रामदास फुटाणे
  • ९वे ठाणे जिल्हा मराठी साहित्य संमेलन ठाणे शहरात ८ जानेवारी २०१७ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते.

नंदुरबार जिल्हा[संपादन]

  • नंदुरबारचे पहिले जिल्हा साहित्य संमेलन, १४ जानेवारी २००९ रोजी नंदुरबार येथे झाले होते. संमेलनाध्यक्ष : रानकवी ना. धों. महानोर.
  • नंदुरबार जिल्ह्याचे द्वितीय साहित्य संमेलन २७ फेब्रुवारी २०१० रोजी शहादा येथे झाले. संमेलनाध्यक्ष : कवी ‘गोंधड’कार वाहरू सोनवणे.
  • नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेले चौथे नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलन, ९-४-२०१२ला, संमेलनाध्यक्षा : डॉ. अलका कुलकर्णी होत्या.

परभणी जिल्हा[संपादन]

  • ४थे परभणी जिल्हा साहित्य संमेलन जाम (जिल्हा परभणी) येथे प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.

बीड जिल्हा[संपादन]

  • बीड तालुक्यातील नेकनूर येथे जिल्हा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने झालेले तृतीय बीड जिल्हा साहित्य संमेलन, २५-१२-२०११ला; संमेलनाध्यक्ष : डॉ. पाटांगणकर होते.

बुलढाणा जिल्हा[संपादन]

  • बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष : ज.ह. खरात; उद्‌घाटक : विठ्ठल वाघ

मुंबई जिल्हा[संपादन]

  • कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : वसुंधरा पेंडसे-नाईक

रत्‍नागिरी जिल्हा[संपादन]

  • तिसरे रत्‍नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-४-२०१० खेड येथे झाले.संमेलनाध्यक्ष : डॉ. अनिल अवचट.

लातूर जिल्हा[संपादन]

हिंगोली जिल्हा[संपादन]

  • १९९५ मध्ये जवळाबाजार (ता. वसमत, जि. हिंगोली) येथे जिल्हा साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनाचे समारोपाचे पाहुणे म्हणून शेतकरी संघटक शरद जोशी यांना आमंत्रित केले होते.


हे सुद्धा पहा[संपादन]