बोर्दू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोर्दू
Bordeaux
फ्रान्समधील शहर


चिन्ह
बोर्दू is located in फ्रान्स
बोर्दू
बोर्दू
बोर्दूचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 44°50′19″N 0°34′42″W / 44.83861°N 0.57833°W / 44.83861; -0.57833

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश अ‍ॅकितेन
विभाग जिरोंद
क्षेत्रफळ ४९.६६ चौ. किमी (१९.१७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८९ फूट (२७ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,३९,१५७
  - घनता ४,८४५ /चौ. किमी (१२,५५० /चौ. मैल)
  - महानगर ११,२७,७७६
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.bordeaux.fr/


बोर्दू (फ्रेंच: Bordeaux; बास्क: Bordele) हे फ्रान्स देशामधील एक प्रमुख शहर आहे. फ्रान्सच्या नैऋत्य भागात गारोन नदीच्या काठावर व अटलांटिक महासागराजवळ वसलेले बोर्दू अ‍ॅकितेन प्रदेशाच्या तसेच जिरोंद विभागाच्या राजधानीचे शहर आहे. २०१० साली सुमारे २.३९ लाख लोकसंख्या असलेले बोर्दू फ्रान्समधील नवव्या क्रमांकाचे शहर व पाचव्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.

बोर्दूची अर्थव्यवस्था बव्हंशी वाईन निर्मिती उद्योगावर अवलंबुन आहे. येथे आठव्या शतकापासून वाईन बनवण्यात आलेली आहे व जगातील सर्वांत मोठ्या वाईन उत्पादकांमध्ये बोर्दूची गणना होते. येथील १८व्या शतकतील अद्वितीय वास्तूरचनेसाठी बोर्दूला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीमध्ये स्थान मिळाले आहे.

खेळ[संपादन]

फुटबॉल हा बोर्दूमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा एफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दू हा क्लब येथे स्थित आहे.

वाहतूक[संपादन]

बोर्दू-मेरिन्याक विमानतळ येथील प्रमुख विमानतळ आहे.

जुळी शहरे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

विकिव्हॉयेज वरील बोर्दू पर्यटन गाईड (इंग्रजी)