पूर्वांचल
Appearance
पूर्वांचल हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात स्थित असलेल्या पूर्वांचलच्या उत्तरेस नेपाळ देश, पूर्वेस बिहार राज्य, पश्चिमेस अवध प्रदेश आग्नेयेस झारखंड राज्य, दक्षिणेस छत्तीसगढ तर नैऋत्येस मध्य प्रदेश आहेत. प्रामुख्याने भोजपुरी भाषिक असलेल्या पूर्वांचलला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. वाराणसी, गोरखपूर,कुशीनगर इत्यादी प्रमुख शहरे पूर्वांचल भागात आहेत.
पूर्वांचलमधील जिल्हे
[संपादन]पूर्वांचल प्रदेश अविकसित व दुर्लक्षित असून येथील रहिवासी १९६० सालापासून वेगळ्या राज्याची मागणी करत आहेत.
- वाराणसी जिल्हा
- जौनपूर जिल्हा
- संत रविदास नगर जिल्हा
- मिर्झापूर जिल्हा
- गोरखपूर जिल्हा
- गाझीपूर जिल्हा
- देवरिया जिल्हा
- कुशीनगर जिल्हा
- आझमगढ जिल्हा
- मऊ जिल्हा
- महाराजगंज जिल्हा
- बस्ती जिल्हा
- संत कबीर नगर जिल्हा
- सिद्धार्थ नगर जिल्हा
- बलिया जिल्हा
- सोनभद्र जिल्हा
प्रसिद्ध पूर्वांचली व्यक्ती
[संपादन]- मंगल पांडे
- तुलसीदास - रामचरितमानसचे निर्माते
- योगी आदित्यनाथ