Jump to content

दंगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

:

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



Teamsters, armed with pipes, riot in a clash with riot police in the Minneapolis Teamsters Strike of 1934
Rioters typically wear face masks, scarves, and other headgear, in order not to be recognizable and in order to filter tear gas; they may use cobblestones as projectiles

शांततामय सहअस्तित्व हा नियम आणि आपापसात उद्‌भवणारे हिंसक संघर्ष हा अपवाद असतो..[] एखाद्या मानवी समूहाने हिंसक मार्गाने केलेल्या सार्वजनिक शांतताभंगास दंगल असे म्हणतात.

दंगल हे नागरी अव्यवस्थेचे एक विद्रूप रूप असते. दंगलीत संघटित किंवा असंघटित गटांद्वारे काही विशिष्ट किंवा अविशिष्ट लोकांच्या विरोधात किंवा अन्यथा, खासगी व सार्वजनिक मालमत्तेची लुट आणि नासधूस होते. आणि असे घडताना, अचानक किंवा ठरवून, सौम्य वा तीव्र स्वरूपाचे हिंसाचार होऊ शकतात. एकदा दंगल सुरू झाली की ती घडवण्यास कारणीभूत असलेल्या नेत्यांना ती आवरता येतेच असे नाही. शेवटी दंगल हा एक सार्वजनिक गोंधळाचा प्रकार असतो आणि तिच्यात केवळ झुंडशाही असते. दंगल सुरू होण्याच्या तात्कालिक कारणानुसार आणि दंगलीत भाग घेणाऱ्या लोकांच्या मनोवृत्तीप्रमाणे दंगलीत कोणती मालमत्ता उध्वस्त करायची हे अवलंबून असते. साधारणपणे, दुकाने, खाद्यालये, वाहने, सरकारी संस्था आणि धार्मिक स्थळे यांना दंगलीची झळ पोचते.

दंगलीमागे बहुधा एखादा सार्वजनिक स्वरूपाचा खऱ्या अथवा काल्पनिक, अविश्वास, संशय अथवा अन्यायातून उद्भवणारी अस्वस्थता असते. अन्यायाविरोधात केलेल्या तक्रारीची दखल योग्य रितीने घेतली गेली नाही हे कारण, दंगलीचे - समर्थन नव्हे पण -बीज असू शकते. बेरोजगारी, सरकारी गैरकारभार, लोकांची राहणीमानाची दरिद्री स्थिती, अधिकाऱ्यांची दमनशाही, करआकारणी, सक्तीची लष्करभऱती, वांशिक संघर्ष, धार्मिक मतभेद, अपुरा अन्नपुरवठा आदि कारणांवरून ऐतिहासिक काळात दंगली झालेल्या आहेत, आणि या काळातही होतात.

दंगल ही दोन किंवा अधिक गटांमध्ये असलेल्या मतभेदांची प्रतिक्रिया म्हणून, अथवा शासकीय/अशासकीय सस्थेसंबंधी असलेली नाराजी हिंसक मार्गाने व्यक्त करताना होऊ शकते. या नाराजीशी इतर व्यक्तींचा काही संबंध आहे किंवा नाही याचे भान न ठेवता त्या व्यक्तींच्या कामकाजात अडथळा आणणे, प्रसंगी इजा पोहोचवणे, तर काही वेळा आयुष्यावर बेतू शकणाऱ्या उपद्रव मूल्याचा गैरवापर करणे, गुंडागर्दी, सार्वजनिक उपद्रव, खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण अशी दंगलींची काही ठळक वैशिष्ट्ये असतात.

दंगलींची कारण मिमांसा

[संपादन]

परिस्थिती अथवा घटनाजन्य असमाधानाचे प्रतिसाद बऱ्याचादा सुयोग्य अधिकृत मार्गाने उमटून शंकांचे निरसन होत नाही तर ते व्यक्ती व्यक्तीत अथवा समाजात निंदा नालस्तीच्या स्वरूपात प्रकट होत रहातात. एका बाजूने दोन किंवा अधिक व्यक्ती अनुपस्थीत व्यक्ती अथवा परिस्थितीबद्दल निंदा करतात तेव्हा त्यांचे आपापसातेले भावबंध घट्ट होण्यास सहाय्यकारी होते त्याच वेळी त्याचा नकारात्मक परिणाम पूर्वग्रह आणि असंतोषास बळकटी येत जाते.[] बऱ्याचदा या सामाजिक असंतोष अथवा असमाधानाच्या परिस्थीतीचा उपयोग तात्कालिक नेतृत्व अथवा सत्ताप्राप्तीच्या स्पर्धेत आपली बाजू मजबूत करून घेण्याकरीता टोकाची भाषा वापरून करून घेतला जातो.सहसा अतीटोकाची भाषा करणारे नेतृत्व हे अल्पमतात असते पण टोकाच्या भाषेला प्रसिद्धी माध्यमांकडून अवास्तव प्रसिद्धी प्राप्त होते.जर असंतोष समाजाच्या दोन वेगवेगळ्या गटातील असेल तर दुसऱ्या गटातील लोकसुद्धा तशाच स्वरूपाच्या पण असमाधान निंदा पूर्वग्रह आणि असंतोषास बळकटी येणे याप्रक्रीयेतून जाऊन त्यांच्यात सुद्धा नेतृत्व अथवा सत्ताप्राप्तीची लालसा असलेले नेतृत्व अतीटोकाची भाषा वापरावयास लागते.दोन्ही समूहाचे असे नेते सलेक्टीव्हली दुसऱ्या समूहाच्या नकारात्मक बाजू दाखवण्यात मग्न होतात.परिणामी समूहात परस्पर अविश्वास आणि असुरक्षीततेची भावना घर करते.अफवा पसरतात अथवा पसरवल्या जातात एखाद्या क्षूल्लक कारणावरून ठिणगी पडल्याचा फायदा घेत दंगलखोर दंगलींची सुरुवात करतात.[] कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा फायदा इतरही गुन्हेगार लूटारू आणि इतर हिसंबंधी उठवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे परिस्थितीस बऱ्याचदा गंभीर वळण लागण्याचा संभव असतो.

साधारणतः कोणतीही व्यक्ती अथवा कुटुंब नवख्या ठिकाणी स्थानांतरित होताना अथव झाल्या नंतर सहकार्य आणि इतर आर्थिक पाठबळाकरिता आपल्या धर्माच्या,भाषेच्या आणि प्रांताच्या लोकांसोबत रहाणे आणि संबध प्रस्थापित करणे पसंत करतो सुरक्षा ही याची सकारात्मक बाजू तर इतर बहूसंख्य लोकांपासून वेगळ्या ठिकाणी वास्तव्य होणे हे बहूसंख्य लोकांच्या भाषा आणि संस्कृती मिसळण्याकरता विलंब करणारे असते यातून अल्पसंख्यांक आणि बहूसंख्यांक अशा विभगणीस सुरुवात होते.मराठी विचारवंत नरहर कुरुंदकरांच्या मतानुसार सहसा कोणताही अत्यल्पसंख्यांक समाज सहसा बहूसंख्याकांशी जुळवून घेतो पण जेव्हा लोकसंख्या दहा ते पंधरा टक्क्यांच्या पुढे जाते तेव्हा समाज स्वतःच्या गरजा अधिक स्पष्टपणे मांडावयास लागतो सुयोग्य नेतृत्वाचा अभाव असल्यास नकारात्मक मार्गांचा अवलंब होतो त्याच वेळी बहूसंख्य समाजात दुसऱ्या समाजाबद्दल असलेला अविश्वासासही खतपाणी मिळत गेल्यास परिस्थिती चिघळण्याकरता लागणारी मनोभूमी निर्माण होते

पूर्वनियोजित दंगली

[संपादन]

आधुनिक काळात आर्थिक, सामरिक अथवा आंतरराष्ट्रीय राजकारणातील हितसंबंध जपण्याच्या दृष्टीने, इतर राष्ट्रातील नको असलेल्या राजवटी उलथवणे, अथवा शत्रूराष्ट्रात अंतर्गत कलह माजवण्याच्या दृष्टीने इतर हिंसक मार्गांसोबतच गुप्तपणे दंगलींना प्रोत्साहन देणे, अथवा त्या राष्ट्रात अशी आर्थिक परिस्थिती/नाकेबंदी निर्माण केली जाते की राजकीय अथवा सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल अशा अस्थऐर्याची परिणती बऱ्यादा दंगलीत होऊन अशा राष्ट्रांचे इप्सित साध्य झाल्याचे अथवा तसा संशय व्यक्त केला गेल्याचे आढळून येते.

स्वतःच्या राजकीय पक्षास विशिष्ट गटाची मते मिळावीत याकरता मतांचे ध्रुवीकरण घडवण्यासाठीही दंगलीचा मार्ग अवलंबिला जातो.तसेच/अथवा स्वतःच्याच राजकीय पक्षातील नको असलेल्या गटाच्या हातातून सत्ता जाऊन आपल्या गटाच्या हाती यावी सत्तेतील व्यक्ती अकार्यक्षम ठरली आहे हे दाखवण्याचे वेगवेगळे उपद्व्याप राजकारणात सतत सुरू असतात त्यातील एक नकारात्मक उपद्व्याप म्हणजे एखादी दंगल घडल्यानंतर सत्तेतील अथवा नोकरशाहीतील संबधीत व्यक्तीच परिस्थिती हाताळण्यात व्यक्तिगत अपयश आल्याचा ठपका ठेवून पायउतार करवता येते.

नोकरशाहीतील किंवा सत्तेतील नको असलेल्या व्यक्तींवर अकार्यक्षमतेचा ठपका येऊन पायउतार व्हावा या नकारात्मक गोष्टीत बऱ्याच मंडळींना वेगवेगळ्या कारणावरून रस निर्माण होतो. स्थानिक स्तरावर काही वेळा रस्तारुंदीकरणात स्वतःच्या दुकांनांची जागा जाऊ नये म्हणून व्यपारीवर्ग स्वतःची दुकाने असलेल्या रस्त्यांवर विविध धर्मांशी संबंधीत धार्मिक स्थाने अथवा प्रतिकांना आर्थिक सहाय्य देऊन उर्जितावस्था प्राप्त करून देण्यास कारणीभूत असतो, रस्तारुंदीकरणाची प्रत्य्क्ष वेळ येऊ नये म्हणून अर्ज विनंत्या कोर्ट कचेऱ्यात शक्य तेवढा कालापव्यय करून घेतला जातो हे सर्व होऊन प्रत्यक्ष कारवाईची वेळ आलीच तर तोपर्यंत कोणत्याना कोणत्या धर्मियांच्या भावना नाजूक झालेल्या असतात त्यास फुंकर घातलीकी दंगली होतात तसेच/अथवा हवी असलेली मोठी कंत्राटे मिळावीत आणि मिळालेली हातची जाऊ नये यासाठी वा तत्सम आर्थिक हितसंबध जपण्याच्या दृष्टीने व्यापारी वर्ग नोकरशाहीतील किंवा सत्तेतील नको असलेल्या व्यक्तींवर अकार्यक्षमतेचा ठपका येऊन पायउतार व्हावा याकरिता दंगल निर्मान करू शकणाऱ्या परिस्थितीस प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आर्थिक हातभार देऊ शकतो.

अतिडावे माओवादी कम्युनिस्ट गट वर्गकलहाचे निमित्त करून कामगारवर्गाच्या हाती सत्ता एकवटण्याकरीता हिंसेचा मार्ग धरतात. असा मार्ग निषिद्ध नसल्याचे प्रतिपादन करून शासकीय अथवा खासगी आस्थापनेच्या विरुद्ध होणाऱ्या हिसक दंगलींचे समर्थन केले जाते. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय अथवा स्थानिक पातळीवर डाव्या गटांचा प्रभाव कमी करण्याची रणनीती म्हणून भांडवलशाही देश अथवा काही स्थानिक भांडवलशहा अतिउजव्या धार्मिक गटाला अथवा राजकारण्यांना उत्तेजन देऊन हिंसेला प्रोत्साहन देतात. अशा दंगलींना ते पडद्याआड राहून चिथावणी देतात असे आरोप झाल्याचे निदर्शनास येते.

दंगंलींचे परिणाम

[संपादन]
काही मोजक्या लोकांचा तात्कालिक स्वार्थ सोडला तर बाकी दंगलींचे परिणाम भिषण आणि भयावह असतात. सामान्य माणसांची उद्योग धंद्यांची आणि सार्वजनिक संपत्ती आणि प्रांणांची अपरिमीत हानी होते.प्रत्यक्ष हानी एवढच किंवा अधिक नुकसान परस्परातील विश्वासास अतीदिर्घ काळाकरता तडे जाताता कुंटुंबे आणि समाजाचे अनावश्य विस्थापन होते आत्मविश्वासाचे खच्चीकरण होते,उप्द्रवमुल्याचे महत्त्व वाढून अविष्कार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा पूर्ण उपयोग करण्यास भितीच्या वातावरणात लोक धजावत नाहीत.दंगलीमुळे विनाकारण अनेक लोकांचा बळी जातो.

कायद्याच्या दृष्टिकोनातून दंगलीची व्याख्या

[संपादन]

Riot दंगल , rout दंगा , आणि Unlawful Assembly जमाव बंदिचे उल्लंघन हे एकमेकांशी संबधीत गुन्हे असले तरी जमाव बंदीच्या उल्लंघनात प्रक्षुब्ध जमाव एकत्र आलेला असतो, दंगा ही राडा अथवा दंगलीच्या आधीची गोंधळाची स्थिती असते तर दंगलीत प्रत्यक्ष हिंसेची घटना घडलेली असते [] दंगलीस प्रोत्साहन देणे आणि दंगल घडवण्याचा कट करणे हे सुद्धा वेग्वेगळे गुन्हे आहेत.व्याख्या

दंगलींचे प्रकार

[संपादन]

झुंडशाही

[संपादन]
मुख्य पान: झुंडशाही

झुंडशाही म्हणजे खेळाच्या चाहत्यांशी संबंधित विशेषतः व्यावसायिक फुटबॉल आणि युनिव्हर्सिटी क्रीडा समर्थकांशी निगडित असभ्य आणि विध्वंसक वर्तन होय. काही स्पोर्ट्स दंगल करणारे अर्ध-व्यावसायिक बनले आहेत, ते संभाव्य दंगलींच्या ठिकाणी प्रवास करतात. हे दंगेखोर कंपन्या म्हणून ओळखले जातात आणि विशेषतः युरोप येथील क्रीडा-संबंधित दंगलींमध्ये त्यांची नोंद घेतली जाते

पोलीस दंगल

[संपादन]

"पोलिस दंगल" हा शब्द नागरिकांच्या एका गटाविरुद्ध पोलिसांच्या गटाने केलेल्या चुकीच्या पद्धतीने, अप्रिय, बेकायदेशीर आणि बेकायदेशीर पद्धतीने  बळाचा करणे यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. पोलीस दंगलीमध्ये सामान्यत: अशी परिस्थिती असते की जेव्हा पोलीस शांततावादी नागरिकांच्या गटावर हल्ला करतात आणि / किंवा पूर्वीपासून शांततावादी असलेल्या नागरिकांना हिंसाचारासाठी भडकावतात.

तुरूंगातील दंगल

[संपादन]

कारागृह दंगल हा कारागृह प्रशासक, तुरूंग अधिकारी किंवा कैदीच्या इतर समूहांविरुद्ध कैदीच्या एका समुदायाने बदल करण्यास भाग पाडण्यासाठी किंवा तक्रार व्यक्त करण्याच्या प्रयत्नातून केलेली अस्थायी कृती आहे,

वांशिक दंगली

[संपादन]

"वांशिक दंगल" ही एक शब्दाची व्याख्या करणारे पद आहे ज्यात वंश किंवा जात हा मुख्य घटक आहे. हा शब्द अमेरिकेमध्ये इंग्लिश भाषेत 1890च्या दशकात दाखल झाला होता. अमेरिकेतील या शब्दाच्या सुरुवातीच्या काळात जातीय दंगलीचा संदर्भ देण्यात आला जो बहुधा बहुसंख्य वांशिक गटाच्या सदस्यांद्वारे इतर जातीच्या लोकांविरुद्ध केलेल्या कारवाईसाठी वापरण्यात आला,

धार्मिक दंगली

[संपादन]

धार्मिक दंगलीमध्ये धर्म हा मुख्य मुद्दा असतो.[] अशा दंगलींमध्ये दंगलखोर एखाद्या विशिष्ट धर्माच्या लोकांवर हल्ला चढवतात.

विद्यार्थी दंगली

[संपादन]

विद्यार्थी दंगल म्हणजे अनेकदा महाविद्यालय / विद्यापीठ अशा उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांनी केलेले दंगल. 1960 आणि 1970च्या दशकात अमेरिका आणि पश्चिम युरोपमधील विद्यार्थी दंगल ही बऱ्याचदा राजकीय स्वरूपाची होती, तरीही अधिकाऱ्यांनी दडलेल्या शांततेत निदर्शनाचा परिणाम म्हणून आणि खेळाच्या घटनांनंतर (गुंडगिरी पहा) विद्यार्थी दंगे होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी दिलेल्या देशात सक्रिय राजकीय शक्ती बनू शकते आणि विद्यार्थी दंगल व्यापक राजकीय किंवा सामाजिक तक्रारींच्या संदर्भात होऊ शकते.

शहरी दंगली

[संपादन]

नागरी दंगल म्हणजे शहरी समस्यांशी संबंधित शहरी परिस्थिती, जसे की भेदभाव, दारिद्र्य, जास्त बेरोजगारी, अव्यवस्थित शाळा, आरोग्याची कमतरता, गृहनिर्माण अपुरीपणा आणि पोलिसांची क्रौर्यता आणि पूर्वग्रह या संदर्भात होणारी दंगल. शहरी दंगली हे वंश दंगली आणि पोलीस दंगलींशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ, भारतात जातीय दंगल ग्रामीण चित्रपटगृहांपुरते मर्यादित आहे तर शहरी आक्रमकतेच्या आसपास धार्मिक दंगल आहे.

दंगलींची राजकीय परिणती

[संपादन]

अन्न दंगलीनंतर अनेक सरकारे आणि राजकीय व्यवस्था खाली पडली आहेत, उदा.

  • जारिस्ट रशिया,
  • क्रांतिपूर्व फ्रांस

दंगलींचा इतिहास

[संपादन]
हे सुद्धा पहा: दंगलींचा इतिहास


आशिया

[संपादन]

1984ची शीखविरोधी दंगल हा शीखांवरील जातीय हिंसाचाराचा ३ - ४ दिवसांचा कालावधी होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी (ऑपरेशन ब्लूस्टारच्या सूडात) केलेल्या हत्येचा बदला म्हणून ही दंगल सुरू केली होती. संपूर्ण भारतभर झालेल्या दंगलीत सुमारे दोन हजार शीख ठार झाल्याचा अंदाज आहे.

चाइना मधील विद्यार्थी, विचारवंत आणि कामगार कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात १५ एप्रिल १९८९, ते ४ जून, १९८९. दरम्यान निदर्शने मालिका होती. बीजिंगमधील टियानॅनमेन स्क्वेअरवर निदर्शने केंद्रे होती. सरकारकडून सूड उगवणे बऱ्याचदा हिंसक होते आणि प्रभावित भागात दंगली होतात.

२००५ मध्ये, चीन सरकारने संपूर्ण चीनमध्ये ८७,००० निदर्शने आणि दंगलीची कबुली दिली..[]

मे १९९८ मधील जकार्ता दंगली ही जकार्ता आणि इंडोनेशियाच्या सुकर्ता येथे पारंपारिक चिनी इंडोनेशियन लोकांविरुद्ध दंगलीची मालिका होती. वांशिक चिनी महिलांवर बलात्कार, छळ आणि हत्या केल्याची शेकडो कागदपत्रेही होती.[] मानवाधिकार गटांनी असे निश्चित  केले आहे की इंडोनेशियन सैन्य दंगलीत सामील झाले होते, ज्याने एक पोग्रॉममध्ये अधोगती केली.[]

भारताची फाळणी ही दक्षिण आशियाई इतिहासातील एक अत्यंत क्लेशकारक घटना होती. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीपासून हा प्रदेश स्वतंत्र झाला. त्यानंतर झालेल्या दंगलींमुळे शेकडो हजारो हिंदू आणि मुस्लिमांचा मृत्यू झाला.

२००५ मध्ये, जिललॅंड्स-पोस्टेन मुहम्मद कार्टून वादावरून पाकिस्तान आणि इतर असंख्य भागात देशव्यापी दंगल झाली.[]

२००८ मध्ये  बीजिंग  मध्ये, लॅमिस्ट भिक्षूंना ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर, २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकच्या काही महिन्यांपूर्वी कित्येक नागरिकांनी (मुख्यतः तिबेट तिबेटमधील नागरिकांनी) चिनी सरकारविरुद्ध बंड केले. दंग्यांव्यतिरिक्त, इतर तिबेटी नागरिक आणि चीनबाहेरील इतर चिनी विरोधी संघटनांनी दंगल होण्यापूर्वी ऑलिम्पिक टॉर्च रिलेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तसेच मशाल काढून टाकण्याचा प्रयत्न करून टॉर्च वाहकांना त्रास देऊन इतर अनेक मुद्द्यांचा प्रयत्न केला. प्रत्युत्तर म्हणून, विरोधकांशी पुढील संघर्ष टाळण्यासाठी टॉर्च वाहकांना सुरक्षेद्वारे एस्कॉर्ट करावे लागले.

ऑस्ट्रेलिया

[संपादन]

१८७९ची सिडनी क्रिकेट दंगल ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील सुरुवातीच्या दंगलींपैकी एक होती. सध्या दंगली ह्या  मुख्य बातमी बनली जात आहेत. आदिवासी मुलाच्या मृत्यूला उत्तर देणाऱ्या आदिवासी दंगली आणि नुकत्याच २००५ च्या ग्रीष्मकालीन शर्यतीच्या मध्ये झाल्या. हे दंगे पूर्व सिडनी उपनगराच्या किनार व थेट शहरातील मुख्य म्हणजे क्रोन्युला येथे घडले.

युरोप

[संपादन]

युरोपमध्ये गुंडगिरीपासून मे दिवसाच्या दंगलीपर्यंतच्या अनेक दंगली ऐतिहासिक आहेत. अलीकडील दंगल राजकीय संदर्भात (राजकीय प्रात्यक्षिके वाढविणे), सामाजिक केंद्रे आणि / किंवा स्क्वाट्सची बेकायदेशीर कारवाई रोखण्यासाठी दंगल, आणि शहरी क्षेपणाच्या व्यापक संदर्भात जातीय तणाव आणत आहेत.

१४ ते १६ जून २००१ रोजी गोएटबर्ग, स्वीडन शहरात दंगल उसळली. या दिवसांमध्ये चालू असलेल्या अनेक दंगलींमध्ये एकूण ५३ पोलीस अधिकारी आणि ९० वंडल आणि निदर्शक जखमी झाले. दंगलीची कारणे गोयटेबर्गमध्ये झालेल्या ईयू शिखर परिषद आणि या परिषदेला यूएसएचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांची भेट ही होती.

डेन्मार्कमधील कोपेनहेगनमध्ये उन्गॉमशुसेटची विक्री झाल्यानंतर नरेब्रो दंगली झाली. या दंगलीत स्वीडन, जर्मनी आणि युनायटेड किंगडममधील लोक सहभागी झाले होते. लढाईदरम्यान एकूण ७५० लोकांना अटक केली गेली होती; यापैकी १४० परदेशी नागरिक होते.

ऑक्टोबर २००५ मध्ये आणि पुन्हा एकदा नोव्हेंबर २००७ मध्ये पुन्हा एकदा परप्रांतीय तरुणांनी पोलिसांच्या हातून उत्तर आफ्रिकन युवकाच्या मृत्यूवर प्रतिक्रिया म्हणून अनुक्रमे क्लीची-सुस-बोईस आणि विलियर्स-ले बेल या पॅरिस उपनगरामधील गरीब भागात दंगल केली.

ग्रीसमध्येही अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली ज्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या घालून ठार मारलेल्या १५ वर्षाच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूचा परिणाम म्हणून देशभर मोठ्या प्रमाणात दंगा झाला.

युनायटेड स्टेट्स(अमेरिका)

[संपादन]

अमेरिकेच्या इतिहासामधील (झालेल्या मृत्यूच्या दृष्टीने) सर्वात वाईट दंगली गृहयुद्धात घडून आल्या. जेव्हा स्थलांतरित फॅक्टरी कामगारांनी फेडरल सरकारच्या सैन्याच्या मसुद्याला जबरदस्तीने विरोध केला तेव्हा न्यू यॉर्क ड्राफ्ट दंगल झाली. गॅंग्स ऑफ न्यू यॉर्क या सिनेमात या दंगलींचे चित्रण चित्रित केले गेले होते ज्यामध्ये विवादित स्तरावरील अचूकता येऊ शकते.

नागरी हक्क चळवळ आणि शहरी क्षय या संदर्भात अमेरिकेने १९५० च्या दशकापासून जातीय दंगलीची मालिका पाहिली. १९६७ च्या पहिल्या नऊ महिन्यांत, अमेरिकेच्या १२८ शहरांमध्ये १४४ दंगली झाल्या. १९६७ च्या नेवार्क दंगली, दरडोई, १९६० च्या दशकातील सर्वात प्राणघातक नागरी दंगलींपैकी एक बनली..[१०]

दंगलीची दीर्घ आणि अल्प मुदतीची कारणे क्रांती '६७ 'या डॉक्यूमेंटरी फिल्ममध्ये सखोलपणे शोधली गेली . नागरी हक्क नेते मार्टिन ल्यूथर किंग, जूनियर यांच्या हत्येमुळे अमेरिकेच्या असंख्य शहरांमध्ये दंगली सुरू झाल्या. रॉडनी किंग ट्रायलने सुरू केलेले १९९२ मध्ये झालेल्या लॉस एंजेलस दंगलींना अमेरिकेच्या अलीकडील इतिहासातील सर्वात वाईट मानले जाते. या दंगलीमध्ये अंदाजे ५४ लोकांचा मृत्यू आणि जवळजवळ एक अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.

स्टोनवॉल दंगल ही जून १९६९ मध्ये न्यू यॉर्क शहरात झालेल्या पोलीस छापाविरुद्ध उत्स्फूर्त आणि हिंसक निदर्शनांची मालिका होती आणि ती अमेरिकेतील आणि जगभरातील समलिंगी हक्कांच्या चळवळीस प्रारंभ होणारी चिन्हांकित करणारी घटना ठरली आहे.

अमेरिकेच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वात दखल घेतलेले दंगली १९६८ च्या डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये पाहिल्या गेल्या आणि त्याचा व्हिएतनाम युद्धाच्या शेवटी अमेरिकेने व्हिएतनाममधून माघार घेण्यावर जोरदार प्रभाव पाडला. २००० च्या डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनच्या निषेधाच्या कार्यक्रमामुळे लेकर्स दंगलीचा समावेश होता. २००१ मध्ये सिनसिनाटी येथेही दंगल झाली होती. गेल्या दशकात अमेरिकेनेही अनेक जागतिकीकरणविरोधी निदर्शने पाहिली होती, यातील काही उल्लेखनीय उदाहरणे म्हणजेच १९९९ च्या डब्ल्यूटीओ मंत्री परिषदेत सिएटल निषेध , याला "सिएटलची लढाई" म्हणून ओळखले जाते, आणि २००५ टोलेडो दंगल.

पोलीस प्रतिसाद

[संपादन]
Law enforcement teams wear body armor and shields, and may use tear gas

दंगलींना सहसा पोलिसद्वारे (दंगल नियंत्रण) हाताळले जाते, जरी पद्धती वेगवेगळ्या देशांमध्ये  भिन्न असतात तरी वापरल्या जाणाऱ्या रणनीती आणि शस्त्रेमध्ये मुख्यत्वे हल्ले कुत्री, वॉटर तोफ, प्लास्टिक गोळ्या, रबर बुलेट्स, मिरपूड स्प्रे, लवचिक बॅटन फेs्या आणि स्नॅच स्क्वॉड्सचा समावेश असू शकतो. लंडन मेट्रोपॉलिटन पोलीस सेवेसारख्या बऱ्याच पोलीस दलांनी सार्वजनिक सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विभागांना समर्पित केले आहे (टेरिटोरियल सपोर्ट ग्रुप, स्पेशल पेट्रोलिंग ग्रुप, कॉम्पेन्सीज रिपब्लिकनेस डे सिक्युरीट, मोबीले एनीहिड).

पोलिसांवर दंगली घडवून आणणे (दंगलीदरम्यान बघ्याची भूमिका घेणे) असे पोलिसांवर आरोप केले गेले; तसेच, वर वर्णन केलेली शस्त्रे अधिकृतपणे प्राणघातक म्हणून नियुक्त केली गेली आहेत, परंतु त्यांच्या वापरामुळे असंख्य लोक मरण पावले आहेत किंवा जखमी झाले आहेत.

दंगलींचा समाजशास्त्रीय आणि दंगलप्रतिबंधक उपायविषयक अभ्यास

[संपादन]

दंगलग्रस्त क्षेत्रात प्रत्यक्ष जाऊन दंगलीचा समाजशास्त्रीय अभ्यास करणे स्वसुरक्षितेच्या दृष्टीने फार अवघड असते. त्यामुळे अशा अभ्यासाची जबाबदारी पत्करणारे किंवा दंगलकर्त्यांना शांत करण्याची जोखीम घेणारे महात्मा गांधींसारखे लोक अभावानेच आढळतात. दंगलप्रतिबंधक उपायांच्या पूर्वाभ्यासाची आणि अशा अभ्यासावर आधारून सुचवल्या गेलेल्या उपायांच्या काटेकोर अमलबजावणीची कमतरता असली की दंगल टाळणे किंवा थांबवणे कठीण होऊन बसते.

स्थानिक पातळीवर नागरी संबंधांचे जाळे विविध धार्मिक समुदायांमध्ये असले तर या समुदायांमध्ये परस्पर शांतता नांदते. अशा जाळ्यामधून तणाव आणि संघर्षांवर नियंत्रण मिळविता येते. असे जाळे नसले तर जमातवादी ओळखींचे पर्यवसान सातत्याने घडणाऱ्या भयकारी हिंसाचारात होते. वर्षने यांनी असे जाळे दोन प्रकारचे असते असे म्हणले आहे. एक म्हणजे ‘असोसिएशन फॉर्म्स ऑफ एंगेजमेन्ट‘ जो संस्थात्मक पातळीवरचा असतो आणि दुसरा प्रकार म्हणजे नित्यनेमाच्या व्यावहारिक देवाण-घेवाणीतून येणारा. अशा संबंधांमधून स्थायी प्रकारची शांतता निर्माण होते असा निष्कर्ष लेखकाच्या अभ्यासातून निघतो.

वांशिक संघर्ष विकोपाला गेला की त्यातून वांशिक हिंसाचार निपजतो. अशा तणावपूर्ण संबंधांचा उलगडा करून दाखविण्यासाठी समाजशास्त्रज्ञ विविध प्रकारच्या आयुधांचा वापर करतात. त्यातील एक म्हणजे ‘इसेन्शियालिझम‘ नावाची संकल्पना. आजच्या काळात दोन जमातींमध्ये किंवा धार्मिक/वांशिक गटांमध्ये खटके उडून संघर्ष पेटत असेल तर त्याची कारणे सांगताना मूलतःच दोघांमध्ये वंश, धर्म, संस्कृती वगैरेंमुळे असलेला फरक, त्या फरकांमुळे लोकांच्या मनात परस्परांविषयी पूर्वग्रहांची निर्मिती आणि त्यातून हिंसा, असे म्हणले जाते. तरी अशा मिश्र समाजातील परस्परसंबंधांना भरती आणि ओहोटीचे स्वरूप का येते आणि एकाच देशात काही शहरांत गुण्यागोविंदाने आणि काही ठिकाणी सतत एकमेकांच्या जीवावर उठलेले असे दृश्य का दिसते याचे उत्तर इसेन्शियालिझममधून मिळत नाही.[]

दंगलप्रतिबंधक उपाय

[संपादन]

दंडात्मक कायदे आणि पोलीसदलांक्डून दंडात्मक कारवाई, शिवाय दंगली होऊच नयेत यासाठी अफवा पसरवली जाण्यापासून दक्षता घेणे, मोहोल्ला कमिटी स्थापना करून वेगवेगळ्या गटात संवाद आणि सामंजस्य प्रस्थापित करून देणे इत्यादी गोष्टी ह्या प्रतिबंधक उपाय म्हणून केल्या जातात.

सध्याचा इंग्रजी कायदा

[संपादन]
Cars are sometimes set on fire during riots

इंग्रजी कायद्यामध्ये दंगा हा कलम १ अंतर्गत सार्वजनिक आदेश कायदा १९८६चा भाग बनवितो.

सार्वजनिक आदेश कायदा 1986 s.1 मध्ये असे म्हणले आहे:

१) जेथे बारा किंवा त्याहून अधिक व्यक्ती एकत्रित उपस्थित राहून एखाद्या सामान्य हेतूसाठी बेकायदेशीर हिंसाचाराचा वापर करतात किंवा सामान्य नागरिकांना धमकावतात आणि त्यांचे आचरण (एकत्रितपणे) केले जाते जेणेकरून घटनास्थळी उपस्थित सामान्य व्यक्तीस त्याच्या वैयक्तिक सुरक्षेची भीती वाटू शकते, सामान्य हेतूसाठी बेकायदेशीर हिंसाचार वापरणारी प्रत्येक व्यक्ती दंगलीसाठी दोषी आहे.

२) एकाच वेळी बारा किंवा त्याहून अधिक वापर किंवा बेकायदेशीर हिंसाचाराची धमकी दिली जाऊ शकत नाही.

३) सामान्य हेतूचा आचरणातून अनुमान काढला जाऊ शकतो.

४) वाजवी खंबीरपणा असलेल्या कोणत्याही व्यक्तीस घटनास्थळी हजर असण्याची किंवा होण्याची शक्यता नाही.

५) खासगी तसेच सार्वजनिक ठिकाणी दंगल होऊ शकते.[११]

हे सुद्धा पहा

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

इंग्रजी मराठी संज्ञा

[संपादन]
riot दंगल
vandalism गुंडागर्दी
tear gas अश्रूधूर
destructive विनाशकारी
wrongful चुकीचा, दोषपूर्ण्, त्रुटी असलेला
disproportionate अप्रमाणशीर
unlawful बेकायदा
illegitimate अवैध
use of force बळाचा वापर
concerted defiance हेतुपूर्वक दुर्लक्ष/झुगारणे
disorder गैरशिस्त
Religious Riot धार्मिक दंगली[१२]
Rebellion उठाव/बंड
Class war वर्गकलह
Internal security अंतर्गत सुरक्षा
Protest निषेध
Pogrom वंशसंहार
Class war वर्गकलह
Race riot वांशिक दंगली
Hooliganism झुंडशाही
ghetto मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b 'धार्मिक दंगली का होतात?'-अमरेन्द्र धनेश्वर यांचे "एथनिक कॉन्फ्लिक्ट अँड सिव्हिक लाइफ: हिंदूज अँड मुस्लिम्स इन इंडिया-आशुतोष वर्षने; ऑक्सफर्ड; वर्ष: २००३ दैनिक लोकसत्तातील पुस्तक परीक्षण Archived 2004-04-29 at the Wayback Machine., लोकसत्ता संकेतस्थळ पान दिनांक १२ ऑगस्ट २०११ रोजी भाप्रवे रात्रौ २०.४५ वाजता जसे दिसले.
  2. ^ "Gossip". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2018-05-14.
  3. ^ "False dilemma". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2018-05-14.
  4. ^ लिगल डिक्श्नरी हे संकेतस्थळ दिनांक १४ऑगस्ट भाप्रवे रात्रौ ७वाजता जसे दिसले
  5. ^ [१]
  6. ^ In Face of Rural Unrest, China Rolls Out Reforms - washingtonpost.com
  7. ^ 1998 Human Rights Report - Indonesia
  8. ^ INDONESIA: Five years after May 1998 rights, those responsible for the atrocities remain at large
  9. ^ Western businesses burn in Pakistan riots | World news | The Guardian
  10. ^ Why Did America Explode in Riots in 1967? Archived 2010-01-06 at the Wayback Machine., by Joshua Zeitz, AmericanHeritage.com, July 23, 2007
  11. ^ http://www.opsi.gov.uk/acts/acts2000/en/ukpgaen_20000025_en_1
  12. ^ धार्मिक दंगली का होतात? -दैनिक लोकसत्ता संकेतस्थळ Archived 2004-04-29 at the Wayback Machine. १२ ऑगस्ट २०१११ भाप्रवे १९.४५ वाजता जसे दिसले

अधिक वाचन

[संपादन]
  • Blackstones Police Manual Volume 4 General police duties, Fraser Simpson (2006). pp. 245. Oxford University Press. ISBN 0-19-928522-5
  • Applegate, Col. Rex. Riot Control: Materiel and Techniques.
  • Beene, Capt. Charles. Riot Prevention and Control: A Police Officer's Guide to Managing Violent and Nonviolent Crowds.
  • Bessel, Richard Emsley, Clive. Patterns of Provocation: Police and Public Disorder.
  • Hernon, Ian. Riot!: Civil Insurrection from Peterloo to the Present Day.
  • Waddington, P.A.J. The Strong Arm of the Law: Armed and Public Order Policing.

बाह्य दुवे

[संपादन]