Jump to content

जोगेंद्र कवाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोगेंद्र कवाडे
जोगेंद्र कवाडे

कार्यकाळ
२०१४ – २०२०

कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मतदारसंघ चिमूर

जन्म १ एप्रिल, १९४३ (1943-04-01) (वय: ८१)
नागपूर, नागपूर जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष (पूर्वी)
पीपल्स रिपब्लिकन पक्ष (सध्या)
पत्नी रंजना कवाडे
अपत्ये १ मुलगा व २ मुली
निवास नागपूर, नागपूर जिल्हा, महाराष्ट्र
व्यवसाय प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ, पत्रकार, राजकारणी, समाजसेवक
धर्म बौद्ध
या दिवशी मार्च २६, २०१७
स्रोत: [१]

जोगेंद्र लक्ष्मण कवाडे ( १ एप्रिल, इ.स. १९४३) हे एक भारतीय राजकारणी, समाजसेवक, माजी प्राध्यापक व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते चिमूर लोकसभा मतदार संघातून १२व्या लोकसभेवर निवडून गेले होते. ते २०१४ पासून २०२० पर्यंत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता, या दरम्यान त्यांनी काढलेल्या ऐतिहासिक लॉंगमार्चचे ते प्रणेते ठरले. कवाडे हे दलित-बौद्ध चळवळीतील एक उल्लेखनिय सामाजिक कार्यकर्ते आहेत.[][][]

कारकीर्द

[संपादन]

जन्मप्राप्त अभावग्रस्त परिस्थितीतून कवाडे यांनी सामाजिक परिवर्तनासाठी काम केले. ते आंबेडकरवादी व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व कट्टर आंबेडकरवादी आहेत. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर मध्ये ते वाणिज्य विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नागपूर येथून १९७२ पासून निघणाऱ्या जय भीम या मराठी साप्ताहिकाचे ते संपादक व प्रकाशक आहेत, याशिवाय त्यांनी अनेक मासिकांमध्ये व दैनिक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत. इ.स. १९७६ मध्ये त्यांनी बौद्धांच्या (१९५६ नंतरचे धर्मांतरित बौद्ध; विशेषतः नवबौद्ध) सवलतीसाठी आंदोलन केले होते, त्यासाठी तिहार कारागृहात त्यांना दहा दिवस कारावासाची शिक्षा झाली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या (सध्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) नामांतरासाठी त्यांनी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी हजारो आंबेडकरवादी तरुणांना एकत्र घेऊन दीक्षाभूमी-नागपूर ते औरंगाबादपर्यंत 'लॉंगमार्च' काढला होता. त्यांच्या या तीव्र आंदोलनाची दखल महाराष्ट्र सरकारला द्यावी लागली. इ.स. १९८२ मध्ये त्यांनी दलित मुक्ती सेनेची स्थापना केली. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून नेतृत्वही केले आहे. कवाडे हे माजी खासदार आहेत, ते इ.स. १९९८ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र पुढे त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्ष नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, जो भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक पक्ष आहे. जून २०१४ पासून कवाडे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य (आमदार) आहेत.[][][][]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

जोगेंद्र कवाडे यांचा जन्म १ एप्रिल १९४३ रोजी नागपूरमध्ये झालेला आहे. ते बौद्ध धर्मीय आहेत. ४ एप्रिल १९७७ रोजी त्यांचा विवाह रंजना कवाडे यांचेशी झाला. या दांपत्याला १ मुलगा व २ मुली आहेत.[]

शिक्षण

[संपादन]

कवाडे यांनी नागपूर विद्यापीठातून (सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) एम.कॉम. ही वाणिज्य शाखेतील मास्टर पदवी ग्रहन केली आहे.[]उत्कृष्ठ वाख्याते

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Biographical Sketch of Member of XII Lok Sabha". www.indiapress.org. 2019-03-24 रोजी पाहिले.
  2. ^ "प्रा. कवाडे यांचा उद्या अमृतमहोत्सवी सत्कार". Maharashtra Times. 2019-03-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-03-24 रोजी पाहिले.
  3. ^ a b "जोगेंद्र कवाडे यांना विधान परिषदेचे सदस्यत्व". Loksatta. 2019-03-24 रोजी पाहिले.
  4. ^ "कोरेगाव भीमा येथील हल्ला सरकारपुरस्कृत अातंकवादच : आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे". divyamarathi. 2019-03-24 रोजी पाहिले.
  5. ^ "कांग्रेस ने कवाडे और गाडगील को विधान परिषद सदस्य बनाया". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2019-03-24 रोजी पाहिले.
  6. ^ a b Prakash, M. "Entranceindia | Prof. Jogendra Kawade MP biodata Chimur | Entranceindia" (इंग्रजी भाषेत). 2019-03-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-03-24 रोजी पाहिले.