Jump to content

अमृता सुभाष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अमृता सुभाष
अमृता सुभाष
जन्म अमृता सुभाष कुलकर्णी
१३ मे, १९७९ (1979-05-13) (वय: ४५)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, लेखन
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट देवराई, श्वास
प्रमुख टीव्ही कार्यक्रम अवघाचि संसार
आई ज्योती सुभाष
पती संदेश कुलकर्णी

अमृता सुभाष या चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटक या माध्यमांत काम करणाऱ्या अभिनेत्री, लेखिका, गायिका आणि संगीतकार आहेत. अभिनेते प्रसाद ओक सोबतची त्यांची अवघाचि संसार ही झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील मालिका विशेष गाजली.

सदरलेखन

[संपादन]

दैनिक ‘लोकसत्ता’च्या शनिवारच्या ‘चतुरंग’ या पुरवणीत अभिनेत्री अमृता सुभाष यांचे ‘एक उलट, एक सुलट’ नावाचे सदर येत असे. या स्तंभलेखनावर आधारलेल्या ‘एक उलट, एक सुलट’ या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते झाले. (१७-११-२०१४)

अभिनय सूची

[संपादन]
  • अजून येतो वास फुलांचा (चित्रपट, २००६)
  • अजिंठा (चित्रपट, २०१२)
  • अवघाचि संसार (दूरचित्रवाणी मालिका)
  • अस्तु (चित्रपट, २०१५)
  • आजी (चित्रपट, २००६)
  • उर्वशीयम (नाटक)
  • कवडसे (चित्रपट, २००६)
  • कॉंट्रॅक्ट (चित्रपट, २००८)
  • किल्ला (चित्रपट, २०१४)
  • गंध (चित्रपट, २००९)
  • चौसर (चित्रपट, २००४)
  • ३६ घंटे (नाटक)
  • छोट्याश्या सुटीत (चित्रपट, २००८)
  • झोका (दूरचित्रवाणी मालिका)
  • ती फुलराणी (नाटक)
  • तीन बहिणी (चित्रपट, २००६)
  • त्या रात्री पाऊस होता (चित्रपट, २००९)
  • देवराई (चित्रपट, २००४)
  • नितळ (चित्रपट, २००६)
  • पहिले वहिले (नाटक)
  • पाऊलखुणा (दूरचित्रवाणी मालिका)
  • पुनश्च हनिमून (नाटक)
  • फिराक (चित्रपट, २००८)
  • बघ हात दाखवून (चित्रपट, २००६)
  • बाधा (चित्रपट, २००६)
  • बालक पालक (चित्रपट, २०१३)
  • बेला मेरी जान (नाटक)
  • मृगतृष्णा (नाटक)
  • या साठेचं काय करायचं (नाटक, २००६)
  • लव्ह बर्ड्स (नाटक, २००८)
  • वाळू (चित्रपट, २००८)
  • व्हाईट रेनबो (चित्रपट, २००६)
  • विहीर (चित्रपट, २००९)
  • श्री तशी सौ (नाटक)
  • श्वास (चित्रपट, २००४)
  • सावली (चित्रपट, २००७)
  • हापूस (चित्रपट, २००९)
  • क्षितिजापलीकडील समुद्र (नाटक)
  • पुनःश्च हनिमून (नाटक)

पुरस्कार

[संपादन]

अमृता सुभाष यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

  • स्मिता पाटील कौतुक पुरस्कार (१७-१२-२०१७)

संदर्भ

[संपादन]