Jump to content

हुसेन शाहीद सुर्‍हावर्दी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हुसेन शाहिद सुऱ्हावर्दी या पानावरून पुनर्निर्देशित)
हुसेन शाहीद सुऱ्हावर्दी

हुसेन शाहिद सुऱ्हावर्दी (बंगाली: হোসেন শহীদ সোহ্‌রাওয়ার্দী ; उर्दू: حسین شہید سہروردی ; रोमन लिपी: Huseyn Shaheed Suhrawardy) (सप्टेंबर ८, इ.स. १८९२ - डिसेंबर ५, इ.स. १९६३) हे भूतपूर्व ब्रिटिश भारतातील व त्यानंतरचे पूर्व पाकिस्तानातील राजकारणी व इ.स. १९५६ ते इ.स. १९५७ या काळात पाकिस्तानचे पाचवे पंतप्रधान होते.

मौलाना अब्दुल हमीदखान भसानी यांनी स्थापलेल्या पूर्व पाकिस्तान अवामी मुस्लिम लीग या पक्षात सुऱ्हावर्दी सामील झाले. मौलाना भसानी यांच्या हयातीनंतर सुऱ्हावर्दीनी पक्षनेतृत्वाची धुरा सांभाळली. पुढील काळात अवामी लीग असे नामांतर झालेला हा पक्ष मुस्लिम लीग पक्षाविरुद्ध पाकिस्तानात उभा राहिलेला पहिला प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष ठरला.

बाह्य दुवे

[संपादन]