हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी (बंगाली: হোসেন শহীদ সোহ্‌রাওয়ার্দী ; उर्दू: حسین شہید سہروردی ; रोमन लिपी: Huseyn Shaheed Suhrawardy) (सप्टेंबर ८, इ.स. १८९२ - डिसेंबर ५, इ.स. १९६३) हा भूतपूर्व ब्रिटिश भारतातील व त्यानंतरच्या पूर्व पाकिस्तानातील राजकारणी व इ.स. १९५६ ते इ.स. १९५७ या काळात पाकिस्तानाचा पाचवा पंतप्रधान होता.

मौलाना अब्दुल हमीदखान भाषानी याने स्थापलेल्या पूर्व पाकिस्तान अवामी मुस्लिम लीग या पक्षात सुर्‍हावर्दी सामील झाला. मौलाना भाषानी याच्या हयातीनंतर सुर्‍हावर्दीने पक्षनेतृत्वाची धुरा सांभाळली. पुढील काळात अवामी लीग असे नामांतर झालेला हा पक्ष मुस्लिम लीग पक्षाविरुद्ध पाकिस्तानात उभा राहिलेला पहिला प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष ठरला.

बाह्य दुवे[संपादन]