नूरुल अमीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नूरुल अमीन (बंगाली: নূরুল আমীন ; उर्दू: نورالامین ; रोमन लिपी: Nurul Amin;) (जुलै १५, इ.स. १८९३ - ऑक्टोबर २, इ.स. १९७४) हा पाकिस्तानातील मुस्लिम लीग पक्षातला बंगाली राजकारणी होता. इ.स. १९४८ ते इ.स. १९५६ सालांदरम्यान तो तत्कालीन पाकिस्तानातील पूर्व पाकिस्तानाचा मुख्यमंत्री होता. तसेच डिसेंबर ७, इ.स. १९७१ ते डिसेंबर २०, इ.स. १९७१ या दोन आठवड्यांच्या अतिशय अल्प कालावधीत तो पाकिस्तानाचा आठवा पंतप्रधान होता. बांग्ला स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात त्याने पाकिस्तानाच्या प्रजासत्ताकाच्या पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान या दोन्ही भूप्रदेशांच्या अखंडत्वाचे समर्थन करत स्वतंत्र बंगालीभाषीय राष्ट्रकल्पनेला विरोध केला. त्यामुळे त्याच्याबद्दल पश्चिम पाकिस्तानात राष्ट्रनिष्ठ नेता, तर पूर्व पाकिस्तानात बांग्लाद्रोही नेता अश्या परस्परविरुद्ध प्रतिमा बनल्या.