Jump to content

हजरत निजामुद्दीन–तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हजरत निजामुद्दीन–तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस

तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे केरळमधील तिरुवनंतपुरमच्या तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. उत्तर रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ह्या राजधानी एक्सप्रेसला तिरुवनंतपुरम ते दिल्ली दरम्यानचे २,८४८ किमी अंतर पार करायला ४५ तास व ४० मिनिटे लागतात. राजधानी एक्सप्रेस शृंखलेमधील ही सर्वात लांब पल्ल्याची गाडी आहे. केरळ एक्सप्रेस ही तिरुवंतपुरम ते दिल्लीदरम्यान धावणारी दुसरी जलद गाडी आहे.

मंगळूर ते मुंबईदरम्यान ही गाडी कोकण रेल्वेमार्गावरून धावते.

तपशील

[संपादन]

वेळापत्रक

[संपादन]
गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२४३१ तिरुवनंतपुरम – हजरत निजामुद्दीन १९:१५ १६:५५ मंगळ, गुरू, शुक्र
१२४३२ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम २३:४५ ०८:१५ बुध, गुरू, रवि

मार्ग

[संपादन]
स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
TVC तिरुवनंतपुरम
QLN कोल्लम ६५
ALLP अलेप्पी १४९
ERS एर्नाकुलम २०६
TCR तृशुर २८०
SRR शोरणूर ३१३
CLT कोळिकोड ३९९
CAN कण्णुर ४८८
MAJN मंगळूर ६२५
UD उडुपी ७०६
KAWR कारवार ९७३
MAO मडगांव १०५५
SWV सावंतवाडी रोड ११६५
RN रत्‍नागिरी १३९०
PNVL पनवेल १७५२
BSR वसई रोड १८१९
BRC वडोदरा २१६३
KOTA कोटा २६९१
NZM हजरत निजामुद्दीन ३१४९

बाह्य दुवे

[संपादन]