Jump to content

स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेसचा फलक

स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी एक्सप्रेस ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे गुजरातमधील अहमदाबादच्या अहमदाबाद रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते. पश्चिम रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ह्या राजधानी एक्सप्रेसला तिरुवनंतपुरम ते दिल्ली दरम्यानचे ९४० किमी अंतर पार करायला १३ तास व ५० मिनिटे लागतात. राजधानी एक्सप्रेस शृंखलेमधील ही सर्वात उशिरा चालू केली गेलेली गाडी आहे. १९९७ साली अहमदाबाद-जयपूर मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतर पूर्ण झाले. ह्याच वर्षी भारतीय स्वातंत्र्याला ५० वर्षे (सुवर्णजयंती) पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ ह्या गाडीला स्वर्णजयंती असे नाव देण्यात आले.

तपशील

[संपादन]

वेळापत्रक

[संपादन]
गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२९५७ अहमदाबाद – नवी दिल्ली १७:४० ०७:३० रोज
१२९५८ नवी दिल्ली – अहमदाबाद १९:५५ ०९:४० रोज

मार्ग

[संपादन]
स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
ADI अहमदाबाद 0
SBI साबरमती 5
MSH महेसाणा 73
PNU पालनपूर 138
ABR अबू रोड 191
AII अजमेर 496
JP जयपूर 630
GGN गुरगांव 907
DEC दिल्ली छावणी 924
NDLS नवी दिल्ली 940

बाह्य दुवे

[संपादन]