हावडा राजधानी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हावडा राजधानी एक्सप्रेस
हावडा राजधानी एक्सप्रेसचा मार्ग

हावडा राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी सर्वात जुनी असलेली ही रेल्वे पश्चिम बंगालमधील कोलकात्याच्या हावडा रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते. आठवड्यातील सहा दिवस हावडा राजधानी गयामार्गे तर एक दिवस पाटण्यामार्गे धावते. पूर्व रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ह्या राजधानी एक्सप्रेसला कोलकाता ते दिल्ली दरम्यानचे १,४५१ किमी अंतर पार करायला १७ तास लागतात. हावडा राजधानीला मिळालेल्या उत्फुर्त प्रतिसादानंतर सियालदाह राजधानी एक्सप्रेस ही दुसरी राजधानी चालू करण्यात आली.

हावडा राजधानी एक्सप्रेस सर्वप्रथम ३ मार्च १९६९ रोजी धावली. संपूर्ण वातानुकूलित डबे असलेली ही भारतामधील पहिलीच रेल्वेगाडी होती. हावडा राजधानी एक्सप्रेसला साधारणपणे पहिल्या वातानुकूलित श्रेणीचे २, द्वितीय वातानुकूलित श्रेणीचे ५ तर तृतीय वातानुकूलित श्रेणीचे ९ डबे असतात. प्रवासाच्या भाडेखर्चामध्ये संपूर्ण खानपान सेवा समाविष्ट असते.

स्थानके व मार्ग[संपादन]

गया मार्गे[संपादन]

पाटणा मार्गे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]