सुषमा सेठ
सुषमा सेठ | |
---|---|
सुषमा सेठ | |
जन्म |
२० जून, १९३६ दिल्ली, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | १९५६ ते आजतागायत[१] |
भाषा | हिंदी |
प्रमुख चित्रपट | जुनून (१९७८) |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | हम लोग, देख भाई देख |
पती | ध्रुव सेठ |
अपत्ये | दिव्या सेठ आणि इतर दोन |
सुषमा सेठ (२० जून, १९३६) या एक भारतीय नाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहेत. त्यांनी १९५० च्या दशकात नाटकात काम करत आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि दिल्ली-आधारित थिएटर ग्रुप 'यात्रिकच्या' त्या संस्थापक सदस्य बनल्या. इ.स. १९७८ मध्ये त्यांनी जुनून या हिंदी चित्रपटात काम करून हिंदी चित्रपट सृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले. सेठ या हिंदी चित्रपटात 'माँ' आणि 'दादी'च्या भूमिकेसाठी ओळखल्या जातात. याशिवाय दूरदर्शन वरील मालिका हम लोग (१९८४-१९८५) मधील दादीच्या भूमिकेसाठी त्या विशेष प्रसिद्ध आहेत.[२] त्यांनी देव राज अंकुर, राम गोपाल बजाज, मनीष जोशी बिस्मिल आणि चंदर शेखर शर्मा यांसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.[३]
वैयक्तिक आयुष्य
[संपादन]सुषमा सेठ यांचा जन्म दिल्लीत झाला असून त्या मणिपुरी नृत्यांगना 'चारू सिजा माथूर' यांच्या मोठी बहीण आहेत.[४] सेठ यांनी 'कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी, नवी दिल्ली' येथून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 'लेडी इर्विन कॉलेज, नवी दिल्ली' येथून 'गृहविज्ञान' मध्ये शिक्षिकेच्या डिप्लोमा केला. त्यानंतर अससोसिएट सायन्स डिप्लोमा 'ब्रायरक्लिफ कॉलेज, न्यू यॉर्क' येथून पूर्ण केला. या शिवाय युनायटेड स्टेट्समधील कार्नेगी मेलॉन, पिट्सबर्ग येथून बॅचलर ऑफ फाइन आर्ट्समध्ये शिक्षक प्रशिक्षण डिप्लोमा केला.[५]
सुषमा सेठ आणि त्यांचे पती उद्योगपती ध्रुव सेठ यांना तीन मुले आहेत.[४] अभिनेत्री 'दिव्या सेठ' या त्यांच्या कन्या आहेत, ज्यांनी आपल्या आईसोबत 'हम लोग' आणि 'देख भाई देख' या मालिकांत काम केले होते.[६][७]
अभिनयाची कारकीर्द
[संपादन]सेठ यांनी १९५० च्या दशकात रंगमंचावर आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली होती. जॉय मायकल, रती बार्थोलोम्यू, रोशन सेठ आणि इतरांसोबत, त्या १९६४ मध्ये दिल्ली-आधारित यात्रिक थिएटर ग्रुपच्या संस्थापकांपैकी एक होत्या.[८] अभिनयाव्यतिरिक्त, त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.[१] इस १९७० च्या दशकात, त्यांनी मुलांसाठी क्रिएटिव्ह थिएटरची स्थापना केली आणि ती चालवली, ही संस्था मुलांसाठी नाटके आणि कार्यशाळा आयोजित करते.[९]
सेठ यांनी श्याम बेनेगल यांच्या इस १९७८ च्या जुनून चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले, ज्यामध्ये त्यांनी शशी कपूरच्या मावशीची भूमिका केली होती. त्याशिवाय सिलसिला, प्रेम रोग, राम तेरी गंगा मैली, चांदनी, दीवाना, कभी खुशी कभी गम आणि कल हो ना हो या भारतीय उद्योगातील काही मोठ्या हिट चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. त्या पंजाबी चित्रपट 'चन्न परदेसी' (१९८०) मध्येही दिसल्या होती.[१०][११]
इस १९८५ मध्ये बी.आर. चोप्राच्या 'तवायफ' चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यांनी ऋषी कपूर, अक्षय कुमार, शाहरुख खान, हृतिक रोशन, अनिल कपूर आणि प्रीती झिंटा यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांच्या आई आणि आजीची भूमिका साकारली आहे.
टीव्ही सिटकॉमच्या आनंद महेंद्रू दिग्दर्शित 'देख भाई देख' (१९९३) मध्ये त्यांनी दिवान कुटुंबाच्या प्रमुख घरगृहिनीची भूमिका निभावली होती.[१२] सेठ यांनी राम गोपाल बजाज आणि मनीष जोशी बिस्मिल सारख्या थिएटर दिग्दर्शकांसोबतही काम केले आहे. दूरदर्शनवर ८० च्या दशकाच्या सुरुवातीस प्रसारित झालेल्या दूरदर्शन वरील 'हम लोग' मधील त्यांची भूमिका विशेष गाजली होती, ज्यामध्ये त्यांनी दादी (आजी)चे पत्र साकारले होते. ही भूमिका लोकांना इतकी आवडली होती की, हे पात्र, ज्याला घशाच्या कर्करोगाने ग्रस्त दाखवण्यात आले होते, ते प्रेक्षकांच्या मागणीनुसार वाढवावे लागले होते.[१३]
इ.स. २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून, सेठ अर्पणा नावाच्या एनजीओसोबत काम करत आहेत, ज्यात त्या नाटके आणि नृत्य नाटकांचे दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जीवनापासून प्रेरित होऊन सितारों के पास नावाचे नाटक लिहिले आहे.[१][१४]
अभिनय संचिका
[संपादन]चित्रपट सूची
[संपादन]- जुनून (१९७८) - जावेदच्या चाचीच्या भूमिकेत
- चन्न परदेसी (१९८०) - जस्सी म्हणून (पंजाबी चित्रपट)
- कलियुग (१९८१) - सावित्रीच्या भूमिकेत
- सिलसिला (१९८१)
- स्वामी दादा (१९८२) - सीमाच्या आईच्या भूमिकेत
- प्रेम रोग (१९८२) - बडी मां म्हणून
- प्रणय (१९८३) - मिसेस रॉय म्हणून
- नौकर बीवी का (१९८३) - संध्याची पालक आई म्हणून
- सलमा (१९८५) - मिसेस बकर अलीच्या भूमिकेत
- खामोश (१९८५) - लीलाच्या भूमिकेत
- तवायफ (१९८५) - नादिरा म्हणून
- राम तेरी गंगा मैली (१९८५)
- मेरा घर मेरे बच्चे (१९८५)
- वफादार (१९८५) - श्रीमती नामदेव म्हणून
- फासलें (१९८५)
- अलग अलग (१९८५) - नीरजच्या आईच्या भूमिकेत
- माँ कसम (१९८५) - ठाकुरणीच्या भूमिकेत
- पाले खान (१९८६) - फातिमा खलीमच्या भूमिकेत
- नगीना (१९८६) - राजीवच्या आईच्या भूमिकेत
- काला धंदा गोरे लोग (१९८६) - श्रीमती दुर्गा म्हणून
- जाबाज (१९८६) - लक्ष्मी सिंगच्या भूमिकेत
- प्यार किया है प्यार करेंगे (१९८६) - अन्नपूर्णादेवीच्या भूमिकेत
- नाचे मयुरी (१९८६)
- मर्द की जबान (१९८७)
- खुदगर्ज (१९८७) - सीता सिन्हा म्हणून
- अवाम (१९८७) - दुर्गा जागरण म्हणून
- अपने अपने (१९८७) - मिसेस कपूरच्या भूमिकेत
- धर्मयुध (१९८८) - कुंदनच्या आईच्या भूमिकेत
- औरत तेरी येही कहानी (१९८८) - जमुनाबाईच्या भूमिकेत
- आखरी अदालत (१९८८) - श्रीमती कौशलच्या भूमिकेत
- हम फरिश्ते नहीं (१९८८) - सुप्रियाच्या भूमिकेत
- वारिस (१९८८) - पारोची आई म्हणून
- सूर्या: ऍन अवेकनिंग (१९८९) सलमा खानच्या भूमिकेत
- माटी और सोना (१९८९) - मिसेस यशोदा भूषण म्हणून
- घराणे (१९८९)
- कसम सुहाग की (१९८९)
- बडे घर की बेटी (१९८९) - श्रीमती दिन दयालच्या भूमिकेत
- तुफान (१९८९) - देवयानीच्या भूमिकेत
- चांदनी (१९८९) - मिसेस गुप्ता म्हणून
- जवानी जिंदाबाद (१९९०) - शारदा शर्माच्या भूमिकेत
- जान-ए-वफा (१९९०)
- अमिरी गरीबी (१९९०) - सोनाची मावशी म्हणून
- शंकरा (१९९१) - राणी माँच्या भूमिकेत
- फर्स्ट लव्ह लेटर (१९९१) - उमा देवी म्हणून
- खून का कर्ज (१९९१) - सावित्री देवी म्हणून
- अजूबा (१९९१) - झरीना खानच्या भूमिकेत
- दो मतवाले (१९९१) - अमरच्या आईच्या भूमिकेत
- हीर रांझा (१९९२) - हीरची आई म्हणून
- सूर्यवंशी (१९९२) - राजमाता म्हणून
- सरफिरा (१९९२) - श्रीमती बीके सिन्हा म्हणून
- इंतेहा प्यार की (१९९२) - श्रीमती शंकर दयाल वालियाच्या भूमिकेत
- दिवाना (१९९२) - लक्ष्मी देवी म्हणून
- बोल राधा बोल (१९९२) - सुमित्रा मल्होत्राच्या भूमिकेत
- दिल आशना है (१९९२)
- इन कस्टडी (१९९३) - सफिया बेगमच्या भूमिकेत
- प्यार का तराना (१९९३)
- १९४२: अ लव्ह स्टोरी (१९९३) - गायत्रीदेवी सिंगच्या भूमिकेत
- तेजस्विनी (१९९४) - आजी म्हणून
- दरार (१९९६) - मिसेस मल्होत्रा म्हणून
- करीब (१९९८) लताच्या भूमिकेत
- बडे मियाँ छोटे मियाँ (१९९८) - सीमाच्या आईच्या भूमिकेत
- दाग: द फायर (१९९९)
- ताल (१९९९) - श्रीमती मेहता म्हणून
- चल मेरे भाई (२०००) - आजीच्या भूमिकेत
- धडकन (२०००) - रामची सावत्र आई म्हणून
- ढाई अक्षर प्रेम के (२०००) - योगीच्या आईच्या भूमिकेत
- शिकारी (२०००) - राजेश्वरीच्या आईच्या भूमिकेत
- राजा को रानी से प्यार हो गया (२०००) - मनीषाच्या आईच्या भूमिकेत
- मोक्ष: (२००१) - रितिकाच्या आजीच्या भूमिकेत
- कभी खुशी कभी गम (२००१) - कौर, नंदिनीची आई म्हणून
- तुझे मेरी कसम (२००३) - आजीच्या भूमिकेत
- रसिकन रे (२००३)
- कल हो ना हो (२००३) - लाजोजीच्या भूमिकेत
- पल पल दिल के साथ (२००९)
- वर्षातील विद्यार्थी (२०१२)
- शानदार (२०१५)
- तमाशा (२०१५)
- नूर (२०१७)
- मेहराम (२०१८) - नूर बीबीच्या भूमिकेत, ZEE5 वर प्रदर्शित झालेला लघुपट
दुरचित्रवाणी मालिका
[संपादन]- स्टेइंग ऑन (१९८०) - कॉडकोड मेनेक्टारा म्हणून
- हम लोग (१९८४) - दादी म्हणून
- देख भाई देख (१९९३) - सरला दिवानच्या भूमिकेत
- अम्मा अँड फॅमिली (१९९५) - अम्मी म्हणून
- मिली (२००५)
- कश्मकश
- रेत पर लिखे नाम
- कैद
- कौन
- ये हुई ना बात
- दर्द का रिश्ता (२०१४) - गंगा दिनदयाल शर्माच्या भूमिकेत
- अलीबाबा
- वंश
- आराधना
- तन्हा
- जंजीरे
- स्टार बेस्टसेलर
संदर्भ
[संपादन]- ^ a b c "Stage plays performed from 1956-1990". 6 December 2015 रोजी पाहिले.
- ^ Sinha, Meenakshi (12 August 2010). "I am still called Hum Log's dadi: Sushma Seth". टाइम्स ऑफ इंडिया. 11 August 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Films yes, but she roots for theatre". द हिंदू. Chennai, India. 5 February 2007. 9 February 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ a b "Sushma Seth's career, personal life and other details you must know". republicworld.com. रोजी मूळ पानापासून संग्रहित2021-05-13. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Educational Qualifications".
- ^ Mishra, Garima (7 July 2009). "An episode in history". द इंडियन एक्सप्रेस. 6 December 2015 रोजी पाहिले.
- ^ "'Was taught to treat myself with utmost respect': Divya Seth Shah pens note on body positivity". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-04-02. 2021-05-13 रोजी पाहिले.
- ^ "Yatril Theatre Group". 6 December 2015 रोजी पाहिले.
- ^ Dhar, Aarti. "Sushma returns to children". द हिंदू. 2016-03-05 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 December 2015 रोजी पाहिले.
- ^ Jaskiran Kapoor (1 December 2010). "Tallking Point". इंडियन एक्सप्रेस.
- ^ "We Are Like This Only!". इंडियन एक्सप्रेस. 7 January 2010.
- ^ "THE LONG RUN". Screen. 16 ऑक्टोबर 2009. 23 ऑक्टोबर 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ TNN, Meenakshi Sinha. "I am still called Hum Log's dadi: Sushma Seth | Delhi News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-05-13 रोजी पाहिले.
- ^ "I never overplayed anything: Sushma". द टाइम्स ऑफ इंडिया. 11 August 2010. 6 December 2015 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सुषमा सेठ चे पान (इंग्लिश मजकूर)