येनिसे नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
येनिसे
Енисе́й
येनिसे नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम मंगोलिया
मुख कारा समुद्र, आर्क्टिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देश मंगोलिया, रशिया
लांबी ५,५३९ किमी (३,४४२ मैल)
उगम स्थान उंची ३,३५१ मी (१०,९९४ फूट)
सरासरी प्रवाह १९,६०० घन मी/से (६,९०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २५.८ लाख
उपनद्या अंगारा नदी

येनिसे (रशियन: Енисе́й) ही आशियाच्या सायबेरिया प्रदेशामधील तीन विशाल नद्यांपैकी एक नदी आहे (इतर दोन नद्या: ओबलेना). येनिसे नदी मंगोलियामध्ये उगम पावते. तेथून प्रामुख्याने उत्तरेस वाहत जाऊन येनिसे आर्क्टिक महासागराला मिळते. एकूण ५,५३९ किमी लांबीची येनिसे ही जगातील सर्वात लांबीच्या नद्यांपैकी एक आहे. सायबेरियातील बव्हंशी निर्मनुष्य तैगा प्रदेशातून वाहणाऱ्या येनिसेचे मुख टुंड्रा प्रदेशामध्ये असून तेथे वर्षातील बराच काळ येनिसे गोठलेल्या स्थितीत असते. बैकाल सरोवरामध्ये उगम पावणारी अंगारा ही येनिसेची प्रमुख उपनदी असून येनिसे, अंगारा व बैकालला पुरवठा करणारी सेलेंगा ह्या तीन नद्या मिळून जगातील सर्वात मोठ्या पाणलोट क्षेत्रांपैकी एक निर्माण झाले आहे.

येनिसेवरील क्रास्नोयार्स्क धरण

रशियाच्या तुवा, क्रास्नोयार्स्क क्राय, खाकाशिया, इरकुत्स्क ओब्लास्त, बुर्यातियाझबायकल्स्की क्राय ह्या प्रदेशांमधून वाहणाऱ्या येनिसेवरील क्रास्नोयार्स्क हे सर्वात मोठे शहर तर अबाकान हे दुसरे मोठे शहर आहे. येनिसेच्या दक्षिण व मध्य भागात जलविद्युतनिर्मिती करणारी अनेक मोठी धरणे बांधली गेली आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत