वोल्गा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वोल्गा
उल्यानोव्स्क शहारातून वाहणारी व्होल्गा नदी
उगम त्वेर ओब्लास्त, रशिया
मुख कॅस्पियन समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश रशिया
लांबी ३,६९२ किमी (२,२९४ मैल)
उगम स्थान उंची २२५ मी (७३८ फूट)
सरासरी प्रवाह ८,०६० घन मी/से (२,८५,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १३,८०,०००
उपनद्या कामा नदी, ओका नदी
उगमापासून मुखापर्यंत वोल्गाचा मार्ग
व्होल्गा नदीवरील सारातोव्ह पूल

व्होल्गा (रशियन: Во́лга) ही रशियामधील एक प्रमुख नदी आहे. ३,६९२ किमी लांबीची वोल्गा ही युरोपातील सर्वाधिक लांबीची तसेच सर्वाधिक जलप्रवाह व सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेली नदी आहे. वोल्गाला अनेकदा रशियाची राष्ट्रीय नदी असे म्हटले जाते. रशियातील २० मोठ्या शहरांपैकी ११ मोठी शहरे व्होल्गाच्या खोऱ्यात वसलेली आहेत. त्यापैकी एक आणि या नदीच्या नावावरून ओळखले जाणारे व्होल्गोग्राद शहर व्होल्गा नदीकिनाऱ्यावर वसलेले आहे.

रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहराच्या आग्नेयेस ३२० किमीवर समुद्रसपाटीपासून २२५ मीटर उंचीवर उगम पावणारी ही नदी कास्पियन समुद्राला मिळते.

मोठी शहरे[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: