Jump to content

बिरोबिद्झान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिरोबिद्झान
Биробиджан
रशियामधील शहर

बिरोबिद्झान रेल्वे स्थानक
ध्वज
चिन्ह
बिरोबिद्झान is located in रशिया
बिरोबिद्झान
बिरोबिद्झान
बिरोबिद्झानचे रशियामधील स्थान

गुणक: 48°47′N 132°56′E / 48.783°N 132.933°E / 48.783; 132.933

देश रशिया ध्वज रशिया
राज्य ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १९१५
क्षेत्रफळ १६९ चौ. किमी (६५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २६० फूट (७९ मी)
लोकसंख्या  (२०२१)
  - शहर ७०,४३३
प्रमाणवेळ यूटीसी+१०:०० (मॉस्को प्रमाणवेळ+०७:००)
अधिकृत संकेतस्थळ


बिरोबिद्झान (रशियन: Биробиджан) हे रशिया देशाच्या ज्यूईश स्वायत्त ओब्लास्ताचे मुख्यालय व सायबेरियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. बिरोबिद्झान शहर रशियाच्या आग्नेय कोपऱ्यात रशिया-चीन सीमेजवळ बिरा व बिद्झान ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. ह्या दोन्ही नद्या आमूर नदीच्या उपनद्या आहेत. रशियामध्ये मोठ्या संख्येने स्थायिक झालेल्या ज्यू लोकांना वसविण्यासाठी इ.स. १९३१ साली ह्या शहराची स्थापना करण्यात आली. येथील अधिकृत भाषा यिडिश आहे.

मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील बिरोबिद्झान हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथील हिवाळे अत्यंत रूक्ष व कठोर असतात.

बाह्य दुवे

[संपादन]