Jump to content

सदस्य चर्चा:Apurva

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Apurva, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Apurva, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,३४३ लेख आहे व १५० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

जसेदृश्य संपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प



पृथ्वी क्षेपणास्त्र चित्र

[संपादन]
सुधारण्याचा प्रयत्न केला, आपल्याला असेच हवे होते का ?
माहितगार १२:२८, ८ जून २०१० (UTC)


केलेल्या मदतीबद्दल आभार.. मराठी wikipedia वर चित्रे कशी upload करायची याची माहिती जर आपण मला देऊ शकलात तर त्याबद्दल मी आपला आभारी राहीन.

विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे येथे उजवीकडील सुचालनात अपेक्षीत माहिती मिळेल. आपण विकिपीडियावर अगदीच नवीन असाल तर आपल्याला चित्रे चढवण्याची सुविधा प्राप्त होण्यास चार एक दिवसांचा कालावधी लागतो.


नमस्कार, Apurva आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद.

मराठी विकिपीडियावरील वनस्पती संबंधीत लेखांचा आवाका आणि गुणवत्ता सुधारावी या हेतूने 'विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पाची आखणी केली आहे आपण या विकिपीडिया:प्रकल्पात लेखन योगदान करून या प्रकल्पाचा हिस्सा व्हावेत या सदिच्छेने मी आपणास हे निमंत्रण देत आहे.

या प्रकल्पात सहभाग घेऊन आपण सहकार्य करू इच्छित असाल तर, कृपया दालन:वनस्पती आणि संबधीत प्रकल्प पानास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी हि नम्र विनंती. पुन्हा एकदा धन्यवाद!माहितगार ०६:०९, १४ जून २०१० (UTC)

भारतीय वन सेवा

[संपादन]

कृपया भारतीय वन सेवा हा लेख पुन्हा बघावा. त्यात मी काही अपेक्षित बदल केले आहेत. ३ च्या वर उपमथळे तयार केल्यास अनुक्रमणिका आपोआप तयार होते. या लेखात असलेल्या लाल दुव्यांवर टिचकी मारुन(क्लिक करुन) आपण नविन लेख लिहु शकता.तेथे माउसचा पॉइंटर नेल्यास त्या लेखाचे नाव दिसेल.आपल्या म्हणण्यास पुष्टी म्हणुन आवश्यक संदर्भही द्यावयास हवे.लेखाचे वर्गीकरणही करणे अपेक्षित आहे.यावरील मदत विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण येथे बघा. वरील सर्व गोष्टी हळुहळु आत्मसात होतीलच. आपल्या विकिवरील लेखनास शुभेच्छा.


आता भारतीय वन सेवा हा लेख कृपया पुन्हा बघावा.अधिक माहितीसाठी विकिपीडिया:संदर्भ द्या हा लेखही बघावा. वि. नरसीकर (चर्चा) ०९:१०, १५ जून २०१० (UTC)

आपल्या मदतीबद्दल आणि सूचनांबद्दल आभार. मी इथे नवीन असल्यामुळे येथील लिहिण्याची व अनुवादाची पद्धत समजून घेण्यास मला थोडा वेळ लागेल. लवकरच मी यात पारंगत होईन याची मला खात्री आहे. आपले मार्गदर्शन पुढेही चालू राहावे ही इच्छा.. आपला अपूर्व


हा आपला संदेश ज्यास द्यावयाचा असेल त्याच्या चर्चा पानावर टाकावयास हवा.उदाहरणार्थ-वि. नरसीकर (चर्चा) येथे सदस्यनावापुढे कंसात असलेल्या 'चर्चा' वर क्लिक केल्यावर माझे सदस्यचर्चापान उघडते.संदेश लिहिल्यावर तो कोणी लिहिला त्याबद्दल आपली सही, कळफलकावरील(किबोर्ड) १ च्या डाव्या बाजुस असलेले '~' हे चिन्ह चार वेळा टाकुन ~~~~ अशी सही करावी. त्याने तो संदेश कोणी लिहिला ते कळुन त्या सदस्यास परत संदेश देणे सोईचे होते.आपण लवकरच पारंगत व्हाल.विकिवर आम्हीही कधीतरी नवागतच होतो.आता थोडेफार कळु लागले आहे.

आपण केलेले लेखन कसे दिसते हे बघण्यासाठी, ते जतन करण्यापूर्वी 'झलक पहा' येथे टीचकी मारा.त्याने प्रीव्हु दिसतो.त्या लेखनात चुक असेल तर ती दुरुस्त करता येते.अर्थात ही प्राथमिक माहिती आपणास असेलच.तरीही लिहिले आहे.

लेखनास पुन्हा शुभेच्छा.बढे चलो.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:५३, १६ जून २०१० (UTC)

आपल्या शंका

[संपादन]
  • माझी शंका
  • आधीच प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या नावात बदल करता येईल काय?
होय करता येईल आपण संपादन कळ दाबली त्याच ओळीत स्थानांतरण सुद्धा उपलब्ध असेल् तेथे जाऊन , अर्थात सर्व नवी शीर्षके विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतना अनुसरून आहेत हे पहावे.

एखाद्या लेखाचे नाव कसे बदलावे? लेखाच्या शीर्ष मेन्यू मधील स्थानांतरण येथे टिचकी मारा . "'लेखाचे नाव' हलवा" असे शीर्षक येईल. तीथे नवीन शीर्षकाकडे समोरील खिडकीत नवे सुयोग्य शीर्षक लिहा.[ चित्र हवे ]

शक्यतोवर शीर्षक देताना शुद्धलेखन आणि मराठी विकिपीडियावरील शीर्षक संकेतांचा आधार घेतला तर बरे.
  • लेखाच्या संदर्भात छायाचित्रे कशी चढवावीत?
विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र कसे चढवावे पहावे
  • लेखाची वर्गवारी म्हणजे नक्की काय? ती कशी करतात?
विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण पहावे व वापरावे. काही कारणाने समाधान न झाल्यास विकिपीडिया:मदतकेंद्र#लेख शोधताना आलेल्या अडचणी पहावे तसेच सदस्य संकल्प द्रवीडही ह्या विषयावर अधीक मार्गदर्शन करू शकतील.
  • इंग्लिश विकीपेडियामध्ये असतात तश्या चौकटी मराठीतील विकिपीडियामध्ये तयार करता येतात का? कशा?
आपण सदस्य चौकट साचे शोधत असल्यास वर्ग:सदस्यचौकट साचे आणि विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/सदस्यचौकट साचे येथे जा.
विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प येथे अधिक विस्तृत माहिती उपलब्ध आहे.
लेखन विकीपेडिया असे नव्हे तर विकिपीडिया असे करावे हि नम्र विनंती

अजूनही काही शंका असतील तर मनमोकळेपणाने विचारा

माहितगार ०८:०३, १८ जून २०१० (UTC)

नमस्कार Apurva, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.