सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी/जुनी चर्चा १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मदत[संपादन]

आपल्याला काही मदत लागल्यास कळवावे! - प्रबोध (चर्चा) ०९:४७, २८ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply[reply]

आपली शंका[संपादन]

 • [[वनाधिकार कायदा (अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 आणि नियम 2008) ]] असे कायद्याचे नेमक्या नावाचे जे शीर्षक असेल त्या शीर्षकाचा लेख बनवावा. त्यात आपण धूळपाटीवर केलेले लेखन कॉपीपेस्ट करावे. आपण स्वत: केल्यास नविन लेखाच्या इतिहासात तुमच्या सदस्य नावाची नोंद होईल म्हणून तसे करणे श्रेयस्कर. आपल्यास काही कारणाने जमलेच नाही तर इतर मंडळी करुन देतीलच.

धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:५०, २८ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply[reply]

आकडे मराठीत हवे[संपादन]

आपण हळदी‎ या लेखावर बरीच मेहनत घेत आहात.उत्तम. एक गोष्ट सुचवाविशी वाटते, त्यातील आकडेवारी मराठीत हवी. आपले सवडीने ते काम करावे ही विनंती.

धन्यवाद.
आपले हातून या विकिवर असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

--वि. नरसीकर (चर्चा) १६:१३, १९ नोव्हेंबर २०१५ (IST)Reply[reply]

लेखाचे पुनर्नामाभिधान (रिनेमिंग)[संपादन]

@सुबोध कुलकर्णी:

हळदी साठी आपण जे नविन नाव सुचविले आहे त्यामागील आपली भूमिका काय हे कळू शकेल काय? कारण अश्याप्रकारची नावे द्यावयाची विकिवर सध्या पद्धत नाही.तितके ठोस कारण असेल तर ते नाव स्वीकारण्यास कोणाचीही हरकत नसावी असे मला वाटते. असो.


यासमवेतच आपण कृपया विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत हा लेख व त्याचे चर्चापानही वाचावे अशी आपणास विनंती करतो.
तसेच, आपण कृपया इंग्रजी विकिवरील हा विस्तृत लेखही बघावा व त्यावरुन आपणास या विषयाची पुरेपूर कल्पना येईल.
पुढील लेखनासाठी माझ्या सदिच्छा व शुभेच्छा कृपया स्वीकाराव्यात.

--वि. नरसीकर (चर्चा) २०:४७, २५ नोव्हेंबर २०१५ (IST)Reply[reply]

गावाची ओळख - जनगणनेतील युनिक स्थळ निर्देशांक[संपादन]

@ वी. नरसीकर आम्हाला राज्यातील (आणि मग देशातीलही) प्रत्येक गावावर प्रथम जनगणना २०११ मधील माहिती वापरून एक लेख तयार करायचा आहे . स्थानिक नागरिक या लेखात वास्तव परिस्थिती , इतर आशय नंतर जोडू शकतील. उदा. हळदी हे गाव पंचगंगा प्रदूषणाने त्रस्त आहे . एकाच नावाची गावे अनेक असल्याने बराच गोंधळ होतो . म्हणून गावाचा विशिष्ठ (unique code) कोड कंसात टाकणे आवश्यक आहे . शोधणे , सुधारणे सोपे होईल .मी परिते(७४५१) हा लेख त्यानंतर लिहिला आहे. आपण आमच्या या प्रकल्पाला मार्गदर्शन करालच!

--सदस्य:सुबोध कुलकर्णी

साचा:माहितीचौकट भारतीय गाव[संपादन]

वरील साचा स्वतंत्रपणे उपलब्ध व्हायला हवा. साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र/उदा/गाव हा मी परितेहळदी गावाच्या लेखासाठी वापरला आहे. त्यात काही सुधारणा सुचवत आहे. गावाची वैशिष्ठ्ये लक्ष्यात घेवून हा साचा माहितीचौकट भारतीय गाव असा नवीन बनवावा असे मला वाटते.
गाव या घटकासाठी खालील मुद्दे चौकटीत यावेत -
 1. गावाचे नाव -
 2. ग्रामपंचायतीचे नाव -
 3. तालुक्याचे नाव -
 4. जिल्ह्याचे नाव -
 5. ग्रामपंचायत मुख्यालय -
 6. पंचायत समिती कार्यालय -
 7. तलाठी कार्यालय -
 8. उपविभागीय कार्यालय -
 9. अक्षांश रेखांश
 10. क्षेत्रफळ
 11. वनाने व्याप्त भूमी
 12. समुद्र सपाटीपासून उंची
 13. सरासरी पाऊसमान
 14. जवळची नदी /समुद्र /पर्वतरांग
 15. प्रमुख कृषी उत्पादन
 16. पर्यटन स्थळ
 17. साक्षरता - पुरुष , महिला , सरासरी
 18. विशेष दर्जा - अवर्षण प्रवण, अनुसूचित क्षेत्र, दुर्गम डोंगराळ प्रदेश, पूरग्रस्त क्षेत्र

वरील साचा बनविण्यास मार्गदर्शन/सहाय्य अपेक्षित आहे.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:५५, ११ डिसेंबर २०१५ (IST)Reply[reply]


सध्याच्या साचात सुधारणेची गरजेशी सहमत आहे. विकिपीडिया:चावडी/इतर_चर्चा#.साचा:माहितीचौकट भारतीय गाव येथे माझा प्रतिसाद नोंदवला आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३३, १२ डिसेंबर २०१५ (IST)Reply[reply]

असभ्यता खुणपताका येण्याचे कारण[संपादन]

लिंग गुणोत्तर लेखात मी भर घातली. असभ्यता कोठे दिसून आली हे जाणून घ्यायचे आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:५१, १८ डिसेंबर २०१५ (IST)Reply[reply]


थोडीशी गफलत झाली[संपादन]

tna हे अक्षर मराठीत दोन प्रकारे लिहिले जाते, एक उभ्या बांधणीचे त्न (त च्या पोटात न) आणि दुसरे आडव्या बांधणीचे त्‍न (अर्ध्या त शेजारी पूर्ण न). हल्ली tna च्या लिखाणात उभ्या बांधणीचे जोडाक्षर विचित्र दिसत असल्याने लिहिले जात नाही, फक्त आडवी बांधणीचे अक्षरच बहुधा लिहिली जाते. त्यामुळे मी योग्य ती दुरुस्ती केली. पण असे करताना वर्गाच्या नावातच उभ्ह्या बांधणीचा tna असल्याचे लक्षात आले नाही. वर्गाचे नाव दुरुस्त केले तरी त्यांत समाविष्ट असलेले जुन्या नावाचे लेख नवीन नावाच्या वर्गात दाखल होत नाहीत, हे ध्यानात आले नाही. दोन-तीन लेख असते तर ते मी दुरुस्स्त केले असते, पण संख्या जास्त असल्याने गफलत झाली.

मी टंकलेखित केलेले tna तुमच्या संगणकावर कसे दिसतात हे मला माहीत नाही. कृपया वर्णन करून सांगावेत.... (चर्चा) ११:०९, २५ फेब्रुवारी २०१६ (IST)Reply[reply]

नमस्कार
उभी बांधणीच सर्वत्र वापरली जाते. सर्व मुद्रित साहित्यातही - वर्तमानपत्रे, पुस्तके, विकी वरही. मी गुगल इनपुट टूल वापरतो.त्यातही उभीच बांधणी आपसूक येते. आपण यापूर्वी याच समजुतीने रत्नागिरी या लेखाचे रत्‍नागिरी वर स्थानांतरण केले आहे. यातून फार काही साध्य होत नाही, वाचक/लेखक उगाचच गोंधळतो असे मला वाटते. आपल्या मताचे स्वागत आहे.

---सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:२६, २५ फेब्रुवारी २०१६ (IST)Reply[reply]


(त्+न=त्‍ + न =) Marathi alphabate cluster 'tna'.png


आडवी विरुद्ध उभी बांधणी[संपादन]

त्न (उभी बांधणी) लिहिताना ‘त’च्या पोटात न लिहिणे बंद होऊन अनेक वर्षे झाली, तुम्हाला तसे लिहिलेले कुठे सापडते? फक्त संगणकावर? फॉन्ट्‌स बनवणार्‍या लोकांनी आडव्या बांधणीची जोडाक्षरे टंकलेखित करण्याची सोयच ठेवलेली नाही, त्यामुळे नाईलाजाने उभ्या बांधणीचा त्न लिहावा लागतो. अशी अनेक अक्षरे आहेत.

‘त्र’ ला ‘क’ची वाटी जोडून लिहिलेला उभ्या बांधणीचा क्र लिहिताच येत नाही, त्यामुळे तो छापील पुस्तकांतूनही अदृश्य झाला आहे; परंतु उभ्या बांधणीचा क्त लिहिता येतो, तेथे आडव्या बांधणीचा क्‍त लिहायची गरज नाही.

उभ्या बांधणीचा प्त(प+त) वाईट दिसतो, तिथे आडव्या बांधणीचा प्‍त हेच अक्षर असले पाहिजे.

उभ्या बांधणीचा ट्व लिहिता येत नसल्याने ट्विटर शब्द लिहिता येत नाही (मलाही आलेला नाही), कारण फॉन्ट्समध्ये योग्य लिहिण्याची सोयच नाही. प्रयत्‍नाने तो ट्‌विटर असा लिहिणे भाग पडते. पण असे लिहिणे प्रत्येकाला जमेलच असे नाही.

संगणकावर छापलेल्या लिखाणात चतुःशृंगी हा शब्द चतुःश्रृंगी असा चुकीचा लिहिलेला सापडेल. श्रृ (श+र+ऋ) हे अक्षर मराठीत किंवा अन्य कोणत्याही भारतीय भाषांत नाही. केवळ प्रचलित फॉन्ट्समध्ये तसेच लिहिण्याची (गैर)सोय असल्याने नाईलाजाने लोक तसे टाईप करत असावेत. पुण्यात चतुःशृंगीच्या आसपासच्या किमान सहा साईन बोर्ड्‌सवर (बोर्ड्सवर नाही!) चुकीची चतुःशृंगी दिसेल. कारण एकच, लोकांना योग्य मराठी लिहिता येत नाही.

स्पोर्ट्‌स शब्द हमखास स्पोर्ट्स असा चुकीचा टाईप केला जातो. संगणकाचे टंक बनवणार्‍यांना देवनागरीच्या उच्चाराचे संकेत (जे अक्षर आधी त्याचा उच्चार आधी) माहीत नसल्याने शुद्ध मराठी लिहिणारे टंक बनलेच नाहीत.

एवंच काय, तर त्न हे लिखाण चुकीचे आहे, त्‍न हेच बरोबर. जिथेजिथे त्न असेल, तेथे त्‍न करण्याचे माझे प्रयत्‍न चालूच राहतील. .... (चर्चा) १७:१४, २५ फेब्रुवारी २०१६ (IST)Reply[reply]


मी अनेक पुस्तके चाळून त्यातले त्‍न असलेले शब्द शोधले, मिळाले नाहीत. तेव्हा गुगलची मदत घेतली; समजले की प्रचलित मराठीत ‘त्‍न’ हे अक्षर असलेले पत्‍नी, यत्‍न आणि रत्‍न हे तीनच शब्द आहेत. (चौथा शब्द अरत्‍नी असा मिळाला, अर्थ - कोपरापासून ते करंगळीच्या टोकापर्यंतचे अंतर. पण हा शब्द वापरात नाही). त्यामुळे tna लिहिण्याची प्रचलित पद्धत कोणती याचा शोध लावणे फार अवघड होते. शेवटी पुस्तके चाळली, लक्षात आले की ज्या पुस्तकांची छपाई युनिकोड वापरून केली आहे, त्यांत उभ्या जोडणीचा त्न सापडतो.. जिथे अन्यमार्गाने छपाई केली असेल तेथे त्‍न अशीच छपाई होते.

अर्वाचीन मराठी, हिंदी, संस्कृत कोश पाहिले, त्‍न आणि फक्त त्‍नच मिळाले. रत्‍नागिरीचा नकाशा आणि रत्‍नागिरी गाईड, गुहागर गाईड, रत्‍नागिरी जिल्ह्यातील किल्ल्यांची माहिती असलेली पुस्तके पाहिली, चुकूनही त्न सापडला नाही. इंटनेटवर त्‍न टंकता येत नसल्याने नाईलाजाने त्न टंकतात, याची खात्री झाली. अडाणी लोकांनी मराठीचे फॉन्ट्स बनवले की असेच होणार! ... (चर्चा) २३:४५, २५ फेब्रुवारी २०१६ (IST).Reply[reply]


युनिकोडमध्ये टंकन करताना 'त्‍न टंकता येत नसल्याने नाईलाजाने त्न टंकतात', त्यामुळे सर्वत्र त्न असे चुकीचे छापले जाते असा आपला घट्ट समज आहे असे दिसते. मी केवळ संगणकावर दिसणारे संदर्भ दिलेले नाहीत.
पुन्हा खात्री करण्यासाठी मी काही पुस्तके पहिली, रत्नागिरी/रत्नाकर शब्द असलेली पण युनिकोडमध्ये नसलेली.-

 1. मागोवा - देशमुख आणि कंपनी(१९६७),ले.नरहर कुरुंदकर;पान क्र.१०,११,१२,१४ (रत्नाकर )
 2. लिहावे नेटके-भाग १ - ज्योत्स्ना(२०१०), ले.माधुरी पुरंदरे;पान क्र.२४२
 3. कातकरी - मौज(२०१०), ले.मिलिंद बोकील;पान क्र.९७,९९,१०४

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने यावर लवकर सहमती व्हावी ही आशा व शुभेच्छा! -- सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:५५, २६ फेब्रुवारी २०१६ (IST)Reply[reply]

@: हा त्‍न तुम्ही टंकला कसा ? म्हणजे कोणत्या टंकन पद्धतीतून टंकला आहे ? हा तुमचावाला त्‍न मला टंकता आला नाही.
@सुबोध कुलकर्णी: त् आणि न वेगवेगळा जोडलेला दिसणे अधिक वाचक सुलभ वाटते, आपल्याला वाचताना सहसा दोन्हींची सवय असते, इंग्रजी माध्यमातून मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तेवढा वाचनाचा एक्सपोजर मिळत नाही मग तच्या आत दिसणारा न त्न चुकून तच्या आत रफार समजून वाचून गोंधळू शकतील, लिपी वाचकास कमीत कमी गोंधळाची असणे बरे असे माझे व्यक्तिगत मत, बाकी इतर सदस्य काय म्हणतात ते पाहू. मुख्य म्हणजे ज त्यांच्या त्‍नचे टंकन कसे साधता आहेत ते अद्याप समजले नाही.
117.195.57.190 १४:२५, २६ फेब्रुवारी २०१६ (IST)Reply[reply]

मागोवा आणि कातकरी ही पुस्तके मिळवून पहाणे तूर्त शक्य नाही, पण लिहावे नेटके (आवृत्ती दुसरी, २०११) पाहिले. त्यात आपण निर्दिष्ट केलेले २४२ पान उघडले. त्यावरच्या १५-१६ क्रमांकाच्या दोन वाक्यांत त्‍न सापडला. ती वाक्ये अशी :- १. नारायण रत्‍नागिरीला जातो तेव्हा अक्काकडे थांबतो...
२. रत्‍नागिरीला जाताना नारायण अक्काकडे थांबतो.
दोनही ठिकाणी आडव्या बांधणीचा त्‍न आहे. तुम्ही पाहिलेली आवृत्ती नक्की २०१०च असेल, तर कदाचित २०११ छापलेल्या आवृत्तीत योग्य सुधारित त्‍न छापला असावा.

मुळात मराठीत त्‍न असलेले तीनच शब्द असल्याने मुद्रित वाङ्‌मयात हे अक्षर शोधणे कष्टाचे आहे. तुम्हाला तीन ठिकाणी शब्द सापडला याचा अर्थ तुम्ही भरपूर शोधाशोध केली असणार. आपणही करावी म्हणून मी माझ्या शेजारच्या फळीवरची तीन-चार पुस्तके काढली. त्‍न शोधले; मिळाले. ते असे :
१. ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा (पुस्तक - लेखक डॉ. सदाशिव शिवदे, सुधारित दुसरी आवृत्ती - २००८) पान ९२, ओळ १२वी, शब्द तिसरा, रत्‍नखचित
२. तेच पुस्तक. पान ९३, ओळ ११वी, रत्‍नखचित. दोनही ठिकाणी आडव्या बांधणीचा त्‍न.
३. विस्तारित शब्दरत्‍नाकर (शब्दकोश, आद्य संपादक वा.गो. आपटे, मार्च २०००ची ’वरदा’ने काढलेली आवृत्ती). मुखपृष्ठावर आणि प्रस्तावनेतएकूण चारवेळा ‘त्‍न’ आला, चारही वेळेला आडव्या बांधणीचा.
४. तेच पुस्तक. आंत ५७८व्या पानावर रत्‍न, रत्‍नखचित, रत्‍नत्रय, रत्‍नत्रितय, रत्‍नदीप, रत्‍न पारखी, रत्‍नसानु, रत्‍नविद्या, रत्‍नाकर, रत्‍नाचल, रत्‍नाभरण, रत्‍नी इतके शब्द, सर्वात आडव्या बांधीण्याच्या ‘त्‍न’चा वापर.
५. तेच पुस्तक. ५६६व्या पानावर यत्‍न, यत्‍नचक्र, यत्‍नवादी, यत्‍नवान्‌, यत्‍नसिद्ध हे शब्द. सर्व शब्दांत आडव्या बांधणीचा tna.
६. तेच पुस्तक. पान ४४२. आडव्या बांधणीचा त्‍न असलेले प्रयत्‍न, प्रयत्‍नवाद आणि प्रयत्‍नवान हे तीन शब्द. ७. शब्दकौमुदी : मराठी पर्यायी शब्दांचा कोश (मो.वि. भाटवडेकर,) पहिली आवृत्ती २५ मार्च २०००. नोंद क्रमांक : अ १८ व ४९८, आ १७७, उ १५९, क २१२ व ५९९, ख ३६, ग ४, च १५६, प १४६, म २९१, य ८ व २३, र १४९ आणि स ४६१ व ४६२. या सर्व नोंदीत आडव्या बांधणीचा त्‍न. ८. गीर्वाणलघुकोश (संस्कृत-मराठी शब्दकोश, ज.वि.ओक) सुधारलेली ४थी आवृत्ती. १ ऑगस्ट २००२. : पृष्ठ ३९९, रत्‍नं आणि रत्‍नि हे शब्द. दोन्ही ठिकाणी त्‍न असे लिखाण ९. राजा शिवछत्रपती (बाबासाहेब पुरंदरे) एकोणीसाव्वी दोनखंडी आवृत्ती. ३१ मार्च २०१४). खंड २रा (उत्तरार्ध) पान ३९६.पहिले वाक्य - जंजिरा जिंकून घेण्याचा प्रयत्‍न गेलीं पंधरा वर्षें महाराज सतत करत होते.
हेच वाक्य जुन्या २००१ सालच्या चौदाव्या आवृत्तीत पृष्ठ ८१३ वर आहे. दोन्ही आवृत्त्यांत आडव्या बांधणीचा त्‍न.
१०.सोहोनींचा इंग्रजी-मराठी शब्दकोश - ऑक्टोबर २०००चे पुनर्मुद्रण. नोंद अशी - effort(ए’फट्‌) ना. trying hard प्रयत्‍न, परिश्रम. त्‍न मी लिहिला तसाच. ११. रत्‍नाकर मतकरींच्या पुस्तकांची मुखपृष्ठे [१] पहा. फक्त आडव्या बांधणीचा त्‍न सापडेल. पुस्तकाच्या वर्णनात जुना त्न दिसेल. कारण उघड आहे, बुकगंगाला संगणकाच्या पडद्यावर सुयोग्य फॉन्ट्सच्या अभावी योग्य त्‍न टंकता येत नाही.

उद्या फेब्रुवारीची २७ तारीख आहे; महाराष्ट्र भाषा दिन, कुसुमाग्रज जयंती. तेव्हा जुना त्न प्रयत्‍नपूर्वक हटवू या ..... (चर्चा) १८:३३, २६ फेब्रुवारी २०१६ (IST)
Reply[reply]


तुम्ही त्‍न च्या समर्थनार्थ जितकी उदाहरणे देत आहात , तितकीच त्न साठीही देता येतील. पण अशाने बरोबर काय हे कसे ठरणार? भाषाविषयक अधिकृत नियमांचा संदर्भ द्यायला हवा-जो सर्वमान्य होऊ शकेल.पुढील चर्चांना ठोस आधार ठरू शकेल. मी शोध घेत आहे, आपणही घ्यावा...--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २२:२१, २६ फेब्रुवारी २०१६ (IST)Reply[reply]

-- जरूर शोधावे; त्यासाठी आपल्याला शुभेच्छा! मला तरी आधुनिक पुस्तकांत एकही त्न सापडला नाही.

जोतिबा फुलेंच्या पुस्तकात क्षत्रिय हा शब्द अनेकदा सापडतो. त्यातला त्र हा हमखास ‘त’च्या पोटात तिरप्या रेघेचा र घुसवून काढलेला (त्न) दिसेल. त्यांच्या काळी आपण काढतो तसला त्र नसावा, किंवा त्यांना माहीत नसावा. समग्र जोतिबा फुले कुणाकडे असेल तर त्याने खात्री करून घ्यावी.

मनोगत या संकेतस्थळावर छन्न आणि छत्र हे दोन्ही शब्द सारखेच दिसतात, कारण त्यातला न्न हा उभ्या बांधणीचा असल्याने ‘त्र’ सारखा दिसतो. हेन्री शब्द जर लोकांना वाचता यावा असे वाटत असेल तर तो हेन्‍री असा लिहिणे भाग आहे.


@117.195.57.190 आणि 117.195.57.190: तुम्ही विचारले आहे की हा त्‍न कसा टंकायचा? हा इथून नक्कल करून उचलायचा आणि आपल्या संगणकावरील एखाद्या धारिकेमध्ये डकवायचा. जेव्हा लागेल तेव्हा तिथून उचलून वापरायचा. हीच माझी युक्ती आहे.

मराठीतली अनेक अक्षरे प्रचलित फॉन्ट्‌स वापरून टंकता येत नाहीत. स्पोर्ट्‌स हा शब्द टाईप करणे सोपे नाही. तो बहुधा स्पोर्ट्स (उच्चार स्पोट्‌ र्‍स) असा चुकीचा उमटतो. दीर्घ ॡ बहुधा टाईप करता येत नाही. फार काय मराठी ल, मराठी श आणि मराठी ख टाईप करता येत नाहीत. मराठी अॅ (‘अ’वर चंद्र) जमत नाही. पाऊण य नावाचे एक अक्षर मराठीत आहे, ते टंकायची सोय कुणीच केलेली नाही; त्यामुळे नाट्य, षाठ्य, जाड्य़, आढ्यता हे शब्द योग्यरीत्या टंकता येत नाहीत. सावरकरी लिपीतले अि, अी, अ‍ु‌‌, अ‍ू , अ‍ू, अ‍े, अ‍ै टाईप करताना विचित्र अक्षरे उमटतात. ‘ट’च्याखाली व लावता येत नसल्याने ट्‌विटर (twitter) लिहिता येत नाही. प्रयत्‍न केला तर ट्विटर (उच्चार टि् वटर) उमटते. हविर्अन्न, कुर्आन, पुनर्ओखणी, पुनर्उभारणी, नैर्ऋत्य हे शब्द टाईप करताना दमछाक होते. मराठी च़मच्यातला च़ टंकणे भल्याभल्यांना जमत नाही. जमलेच़ तर या ‘च़’ची बाराखडी (च़, च़ा, च़ि, च़ी, च़ु, च़ू, चे़, चै़, चो़, चौ़, च़ं, च़ः) उमटवता येत नाही.

त्यातूनही ही अक्षरे संगणकावरच्या एखाद्या पानावर सापडली आणि ती नकल-डकव पद्धतीने विकिपीडियावर टाईप केली तर ती मुळाबरहुकूम दिसतीलच याची शाश्वती नाही. एखाद्या वेळी टाईप करणार्‍याला योग्य अशी दिसली तर वाचणार्‍याला तशीच दिसतील याचा भरवसा नाही.. मराठीतली अशा अवघड अक्षरांचा कुणी Character Map बनवून दिला तर तो फार उपयोगी ठरेल. .... (चर्चा) ००:२६, २७ फेब्रुवारी २०१६ (IST)Reply[reply]

@: वाचकाने त्‍न घाईत वेगळ्या कोनातून (ॲंगल) पाहिल्यास शी कन्फ्युज होऊ शकणार नाही का ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:४९, ८ मार्च २०१६ (IST)Reply[reply]

मी अनेक कोनांतून पाहिला, मला त्न आणि 'ल्न' यांच्यात काही घोटाळा होऊ शकेल असे वाटत नाही.

@सुबोध कुलकर्णी: उभ्या बांधणीचा त्न केव्हा बंद झाला याचा शोध लागला. जेव्हा भारतात टाईपरायटरवर मराठी टंकलेखन सुरू झाले, तेव्हा उभ्या बांधणीची जोडाक्षरे टंकलिखित करणे अशक्यप्राय झाले. द्वंद्व हा शब्द द् वं द् व असा छापला जाई. द्वंद्वची ही विचित्र छपाई निदान पाठ्यपुस्तकांतून बंद व्हावी यासाठी कै. सत्त्वशीला सामंत यांनी जंगजंग पछाडले, पण त्यांना त्यांच्या आयुष्यभरात यश मिळाले नाही. पुस्तक छपाई ही खिळ्यांनी होत असल्याने त्या छपाईत ही जुन्या वळणाची अक्षरे राहिली होती. आता मात्र उभ्या बांधणीचा त्न छापलाही जात नाही. ... (चर्चा) १६:३६, ९ मार्च २०१६ (IST)Reply[reply]

@: मी ल्न नव्हे नुसत्या चा उल्लेख केला आहे, खास करुन फाँटसाईज कमी असताना आणि मुळाक्षरांशी नव्याने परिचीत होऊ लागलेल्या/ कमी परिचीत वाचकाला जसे इंग्रजी माध्यमातून मराठी भाषेचे शिक्षण घेणारी मुले त्यांचे प्रत्यक्ष वाचन घेऊन - 'ल' चे फाँट्स आणि दोन्ही प्रकारचे 'त्न' लहान फाँटसाईज मध्ये - बघावयास हवे; आपल्याला माहित असल्यामुळे आपण त्याच पद्धतीने पहातो नवीन / मराठी खूप वाचनात नसलेल्या व्यक्ति कसे वाचतात हे वाचन सुलभतेच्या निकषासाठी महत्वाचे असावे किंवा कसे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:५१, १२ मार्च २०१६ (IST)Reply[reply]

@:@माहितगार: मला वाटते हि चर्चा माझ्या पानावर मर्यादित न राहता शुद्धलेखन विषयक विभागात हलवावी. मला असे वाटते म्हणून असेच, या पातळीवर चर्चा राहू नये. मी पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे सध्या कोणते अधिकृत सर्वमान्य नियम प्रचलित आहेत, त्यांचा संदर्भ देवून मांडणी झाल्यास त्यात तटस्थता येवू शकेल.याबाबतीत कौल घेण्याची पध्दत आहे का?

---सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:२२, १२ मार्च २०१६ (IST)Reply[reply]

@सुबोध कुलकर्णी: @: या विषयावर अंतीम निर्णयास बराच कालावधी जाईल असे वाटते कारण, 'त्न' च्या लेखन प्रमाणी करणारचा अंतीम निर्णय मराठी विकिपीडियासाठी मराठी विकिपीडियालाच घ्यायचा हे खरे असले तरीही एकुणच आंतरजालावरील आणि डिजीटल स्वरुपातील सर्वच मराठी संदर्भाने लेखन प्रमाणीकरण अद्याप फारसा न चर्चीला गेलेला विषय असणार सार्वत्रिक प्रमाणीकरण होणे आणि ज म्हणतात तो त्न प्रमाणीत करावयाचा असेल तर त्याच्या टंकनाची सार्वत्रिक उपलब्धता, हे प्रश्न इतर चर्चात्मक मराठी संकेतस्थळे जसे मायबोली, मिसळपाव ऐसि अक्षरे अशा मराठी संस्थळावर व्यापक पणे चर्चा करावी लागेल. सर्वसाधारण पणे पब्लिकला एवढ्या बारकाव्यांमध्ये खुपसा रस नसतो त्यामुळे अशा चर्चा आणि निर्णयात बराच कालावधी जाणार हे निश्चित. तुर्तास प्रत्येक जण आपापला आवडलेला 'त्न' वापरु जेव्हा प्रमाणिकरणाचा निर्णय होईल तेव्हा बॉट लावून सर्व त्न सहजपणे एकसारखे करता येतील, 'ज',ंनी तुर्तास प्रत्येक त्न इंडीव्हीज्युअली बदलण्यात त्यांचा अमुल्य वेळ घालवू नये असे वाटते.

चर्चा मध्यवर्ती पानावर नेण्याचा आपला मुद्दा बरोबर आहे पण त्याही पुर्वी इतर संस्थळांवर चर्चा करुन घेईन मग मध्यवर्ती पानावर चर्चा लावेन बराच कालावधी कदाचित काही महिनेही सहज जाऊ शकतील. बाकी ज्ञानकोशातील निर्णय शक्यतोवर तर्काधारीत चर्चेवर व्हावयास हवेत, ज्ञानकोशात तर्कसुसंगतता महत्वाची बहुमत महत्वाचे नसावे हि ज्ञानकोशीय संस्कृतीची गरज असावी.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:५१, १२ मार्च २०१६ (IST)Reply[reply]


ज्या लहान फाँटसाईजमध्ये टंकित केलेल्या 'त्न'चा लंगड्या कुबडीधारी हिंदी 'ल'शी गोंधळ होऊ शकेल असे माहितगारांना वाटते, त्या 'ल'ला महाराष्ट्र सरकारची मान्यता नाही. दोन वाट्या असलेला भरतनाट्यम करताना बैठक मारलेल्या नर्तकीसारखा 'ल'च सरकारमान्य आहे. तो तसा टंकित करता येत नाही, हा आपला नाइलाज आहे. .... (चर्चा) १२:००, १२ मार्च २०१६ (IST)Reply[reply]

आशयाची वारंवारता टाळावी[संपादन]

सुबोध आपण चांगले काम करीत आहात.

आपण केलेल्या लिखाणात 'एकाच गोष्ट अनेकदा लिहिल्याजात आहे.' हे अनावधानाने पण होवूशाकते. उदारणार्थ आपण लिहिलेल्या शिरंबे ह्या लेखात " ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे" हे वाक्य वरवर लिहिल्या गेले आहे (१३ ते १५ दा ). विश्वकोशिय लिखाणात अश्या आशयाची वारंवारता टाळण्यास हवी.

आपण सदर लेखात दुरुस्ती करून जवळील मोठे गाव आणि गावाचे नाव द्यावे; ज्यामागे त्या सुविधा तिथे उपलब्ध असतील असे अभिप्रेत असते. त्या गावाचा लेख उपलब्ध असल्यास त्याचे नावाला दुवा द्यावा.

पुढील कामासाठी शुभेच्छा - तात्या (चर्चा) ०९:४२, ८ मे २०१६ (IST)Reply[reply]


यात्राद्वारे लिहिलेले लेख, दर्ज्या आणि पुनरावलोकन[संपादन]

सुबोध ,

आपले इतरही लिखाण तपासले, प्रथम दर्शनी असे आढळते कि आपण सांगकाम्या अथवा ट्याप्लेट वैगरे सारख्या यांत्रिक उपकरणाच्या सहाय्याने लेख बनवत आहात, आपल्या बहुतेक लिखाणात लेखन शैलीचा आभाव असणे त्यामुळे साहजिक असले तरी एकाच गोष्टीची वारंवारता आणि निर्जीव पद्धतीचे लिखाण नसावे.

आपण कुपया स्वतःच आपल्या लिखाणाचे पुनरावलोकन ( रिव्ह्यू ) करून त्यास पुनर्लिखित करावे जेणे करून मराठी विकिपीडियाचा दर्ज्या राखण्यास मदत होईल. खूप ज्यास्त काम करण्यापेक्ष्या थोडे कमी पण दर्जेदार काम करण्यावर मराठी विकिपीडिया जोर देत आलेला आहे. अन्यथा हिंदी विकिपीडिया सारखे लाख भर लेखाचे गार्बेज कधीही बनवता येईल. आशा आहे कि आपण ह्या परंपरेस पाइक होण्याचा प्रयत्न कराल.

ता क  : यात्रिक पद्धतीने लिखाण करण्या साठी यंत्रामानावाचा फ्ल्याग घ्यावा जेणेकरून आपले खाते भविष्यात गोठवण्यात येणार नाही आणि कुणी तक्ररारही करणार नाही.

- तात्या (चर्चा) ११:१९, ८ मे २०१६ (IST)Reply[reply]

गावांवरील सदर लेख हे जनगणना २०११ मधील अधिकृत माहितीचा आधार घेवून तयार केलेले आहेत. हे लेख विपी वर यांत्रिक पद्धतीने भरले जात नाहीत. (एक संदर्भ - आरंभी इंग्रजी विकिपीडियात तब्बल ४०,००० लेख अमेरिकी जनगणनेच्या आधारे यांत्रिक रीत्या भारती केले होते व ते मान्य केले गेले होते)
हे लेख प्राथमिक अवस्थेत आहेत. या लेखांमध्ये भर घालणे व असलेली माहिती सुधारणे - हे काम करण्यासाठी गावांशी संबधित व्यक्ती व संस्था यांचे आमचा एक गट नागरिकांचे प्रशिक्षण करत आहे. अशी भर घातलेले परिते, रुकडी, मोपा,तेरेखोल, नरसोबाची वाडी हे लेख पहावेत. त्यामुळे हळूहळू हे लेख आशयाने समृद्ध होत जातील. वारंवारता आणि निर्जीव पद्धतीचे लिखाण टाळण्याचा नक्की प्रयत्न करु. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:२४, २० मे २०१६ (IST)Reply[reply]

महाराष्ट्रातील समाजसेवक वर्ग[संपादन]

'महाराष्ट्रातील समाजसेवक' हा वर्ग प्रस्तुत ठिकाणी बरोबर वाटतो. महाराष्ट्रात काम करणाऱ्या समाजसेवकांचा यात समावेश होईल. मराठी समाजसेवक याची व्याख्या अधिक विस्तृत होईल. महाराष्ट्रात काम करणारे समाजसेवक एका अर्थाने मराठीच ठरतात. याशिवाय महाराष्ट्रात मूळ असलेल्या (जन्मस्थान, संस्कृतीप्रभाव, इ.) व्यक्तींचाही यात समावेश करता येईल. असे असताही मराठी समाजसेवकची व्याख्या वस्तुनिष्ठपणे करता येईलच असे नाही, तरी महाराष्ट्रातील समाजसेवक हा वर्ग सहसा वापरावा असे वाटते.

हा फरक लक्षात घेउन त्याबद्दल माझे मत विचारल्याबद्दल धन्यवाद!

अभय नातू (चर्चा) २२:२२, २ जुलै २०१६ (IST)Reply[reply]

Rio Olympics Edit-a-thon[संपादन]

Dear Friends & Wikipedians, Celebrate the world's biggest sporting festival on Wikipedia. The Rio Olympics Edit-a-thon aims to pay tribute to Indian athletes and sportsperson who represent India at Olympics. Please find more details here. The Athlete who represent their country at Olympics, often fail to attain their due recognition. They bring glory to the nation. Let's write articles on them, as a mark of tribute.

For every 20 articles created collectively, a tree will be planted. Similarly, when an editor completes 20 articles, a book will be awarded to him/her. Check the main page for more details. Thank you. Abhinav619 (sent using MediaWiki message delivery (चर्चा) २२:२४, १६ ऑगस्ट २०१६ (IST), subscribe/unsubscribe)Reply[reply]

येथील संपादने[संपादन]

१५६३ संपादने झाल्याबद्दल आपले अभिनंदन. कृपया शुभेच्छा स्वीकाराव्यात. आपण येथे अशीच भर घालीत रहाल अशी अपेक्षा व आशा.--वि. नरसीकर (चर्चा) १७:३०, २२ डिसेंबर २०१६ (IST)Reply[reply]

धन्यवाद! मलाही आपल्याप्रमाणेच दीर्घकाळ, अर्थपूर्ण योगदान करायचे आहे. आपले सहकार्य व मार्गदर्शन असेलच. -सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:३५, २२ डिसेंबर २०१६ (IST)Reply[reply]


ज्ञानप्रबोधिनीच्या पोथीवरून घेतलेल्या मजकुरात संस्कृत शब्द लिहिण्यात काही चुका आढळल्या, त्या तेवढ्या दुरुस्त केल्या. बाकीचा मजकूर बदलला नाही.... (चर्चा) १२:५५, ३१ डिसेंबर २०१६ (IST)Reply[reply]

तुम्ही वगळलेला मजकूर :- १. नवरात्रीतील नऊ दिवसांचे नऊ रंग - हा मजकूर म्हणजे सामान्य ज्ञान आहे, ती ज्ञानप्रबोधिनीची मालमत्ता नाही.
२. देवीची नऊ रूपे : देवीच्या नऊ रूपांची नावे सांगणार्‍या या ओळी ‘चण्डीकवचम्‌’ या संस्कृत ग्रंथातील आहेत. त्यावर ज्ञानप्रबोधिनीचे स्वामित्व नाही.
३. पूजाविधी : हा पारंपरिक पूजाविधी आहे. त्यावरही कुणाचा प्रताधिकार नाही; परंतु हा मजकूर विकिपीडियाच्या धोरणांशी सुसंगत नसल्याचे वाटत असल्यास खुशाल उडवावा. शिवाय त्या मजकुरातील संस्कृत मंत्रांमध्ये शुद्धलेखनाच्या बर्‍याच चुका आहेत; उदा० म्ह, ध्द ही अक्षरे संस्कृतमध्ये नाहीत, ती या मजकुरात आहेत. प्रीत्यर्थ या शब्दाची पुढे येणार्‍या नामाच्या लिंगाप्रमाणे रूपे बनतात, तशी ती काही ठिकाणी बनलेली नाहीत. संध्येच्या २४ नावातील त्रिविक्रम हे नाव चुकीचे छापले गेले आहे, वगैरे.

पूजाविधीसंबंधी संपूर्ण मजकूर उडवला गेला तर विकिपीडियाच्या वाचकांचे फारसे नुकसान होणार नाही. ह्याच अर्थाचा मजकूर इतर अनेक मराठी-हिंदी संकेतस्थळांवर आहे. ... (चर्चा) १७:०६, ३१ डिसेंबर २०१६ (IST) .Reply[reply]

अर्जुन पुरस्कार[संपादन]

मी आपले लक्ष अर्जुन पुरस्कार या लेखाकडे वेधत आहे. यातील लाल दुव्यांचे लेख बनविले तर ते चांगले होईल.अर्थातच आपणास आवड व सवड असेल तर.--वि. नरसीकर (चर्चा) १०:५८, ७ जानेवारी २०१७ (IST)Reply[reply]

विषयतज्ञ[संपादन]

दोन्ही ठिकाणी विषयतज्ञ कोण आहेत ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:५१, १५ जानेवारी २०१७ (IST)Reply[reply]

सांगली - प्रा.वासमकर ; कोल्हापूर - प्रा.तारा भवाळकर
कार्यशाळा सदस्यांची नोंदणी सारणीत झालेली दिसत नाही. इतर कोठे केली आहे का? आम्ही कोठे करावी? मेटा प्रमाणे मराठीत कार्यशाळा पान कसे तयार करावे?
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:०२, १६ जानेवारी २०१७ (IST)Reply[reply]

१) कार्यशाळांमध्ये नविन सदस्यांनी लेखात सरळ संपादने करण्यावर भर असणे आणि वेळ कमी पडणे यामुळे सारणीत नोंदी करुन घेतल्या नाहीत. (अर्थात तुमच्या कार्यशाळांअध्ये वेळ पुरेसा उपलब्ध झाल्यास तुम्ही तसे करुन घेऊ शकता.)

२) सदस्य नामविश्वात दृष्य संपादनाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे सध्याचे पान बनवले आहे. सर्व कार्यशाळांसाठी तुर्तास तेच पान वापरावे असे वाटते कॉमन नेम हवे असे वाटलेतर सदस्य नामविश्वात कार्यशाळा असे नाव बनवतो आणि त्याची लिंक देतो - म्हणजे साईट नोतीसवरुन लिंक बदल बसण्याची भानगड नाही. मजकुर जूना झाला अथवा पान भरले की त्याचे विदागारीकरण (अर्काईव्हींग) करावे म्हणजे झाले.

३) सध्याच्या सारणीत सहीसाठी तुम्हाला स्तंभ हवा आहे तो लगेच जोडता येईल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:२४, १६ जानेवारी २०१७ (IST)Reply[reply]

धन्यवाद. मीही यावरच काम करत होतो. मी हे पान बनवले आहे. तपशील भरायचा आहे. दोन्ही कार्यशालांसाठी वापरावे असे वाटते.सोपे व सुटसुटीत असे.आपला अभिप्राय कळवावा.

-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:३४, १६ जानेवारी २०१७ (IST)Reply[reply]

वेगळे पान बनवण्यासाठीही हरकत नाही (सदस्य:कार्यशाळा पानास सध्या मध्यवर्ती कार्यशाळा पान मानून दुवा द्यावा). अर्थात मध्यवर्ती पानासच तुम्हाला सोईस्कर असे विभाग जोडण्यास हरकत नसावी. प्रत्येक कार्यशाळेसाठी वेगळे पान बनवण्यात तुमचा व्यक्तिगत वेळ प्रशासकीय कामात जास्त जाणार नाहीना हे पहावे असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:५६, १६ जानेवारी २०१७ (IST)Reply[reply]

... ... नमस्कार, आपला निरोप मिळाला. उद्या कार्यशाळा उत्तम कशी होईल यासाठी नक्की प्रयत्न करतो.

हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे २२:१२, १९ जानेवारी २०१७ (IST)

विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती[संपादन]

All rights reserved logo

मराठी विकिपीडियावर क्रांती चिडली आहे ती म्हणजे विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती. हा एक ऐतिहासिक शन आहे तुमचे वह योगदान आवश्यक आहे.. चर्चेत सहभागी व्हा वह विकिपीडियाच्या प्रगतीत परिभागी व्हा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:०२, २१ जानेवारी २०१७ (IST)Reply[reply]

विकिस्रोत कार्यशाळा[संपादन]

१) स्थळांच्या जागा दोन लिहिल्या आहेत. कोणत्या तारखेस कुठे असे काही आहे का ?

२) वेळा काय आहेत ?

३) इतरांसाठी कितपत खुली आहे ? म्हणजे सोशल मिडीयावर मराठी संकेतस्थळांवर माहिती टाकणे चालणारे आहे का ?

४) संपर्क इमेल अथवा दुरध्वनी उपलब्ध करणे शक्य आहे का ?


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१४, २९ जानेवारी २०१७ (IST)Reply[reply]

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१[संपादन]

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२८, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply[reply]

कार्यशाळा[संपादन]

कार्यशाळांमधील लेख संपादित करीत असतांना, कृपया त्यांना विकिडाटा दुवेही द्यावेत ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) ११:३४, १२ फेब्रुवारी २०१७ (IST) हो जरुर, एखादे उदाहरण दाखवून मार्गदर्शन कराल का?
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:४०, १२ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply[reply]

धन्यवाद[संपादन]

नमस्कार व महाजालावर मराठी भाषेच्या वाढीस हातभार लावल्याबद्दल धन्यवाद! मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 27th Feb Marathi gaurav din वि. नरसीकर (चर्चा) १२:२७, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply[reply]

गल्लत साचा[संपादन]

मी करमळी या लेखात टाकलेला गल्लत साचा आपण कां काढला याचे कारण कळू शकेल काय?--वि. नरसीकर (चर्चा) १६:५७, २१ मार्च २०१७ (IST)Reply[reply]

अनवधानाने काढला गेला असेल, पाहतो...--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:०१, २१ मार्च २०१७ (IST)Reply[reply]

सोशल मीडिया[संपादन]

सर आपले मत विकिपीडिया:चावडी/सोशल मीडिया अपेक्षित आहे. कृपा आपले मत द्यावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:१९, २० एप्रिल २०१७ (IST)Reply[reply]

हॅपी बिर्थडे मराठी विकिपीडिया[संपादन]

१ मे २०१७--टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:००, १ मे २०१७ (IST)Reply[reply]

मार्च २०१७ बाबत शुभेच्छा[संपादन]

Working Man's Barnstar Hires.png
नमस्कार सुबोध कुलकर्णी,

विकिपीडियाने मार्च २०१७ च्या आकडे प्रकाशन केले आहे. त्यातील सर्वाधिक सक्रिय विकिपीडिया मराठी विकिपीडियामध्ये जगभरातील १७ व्या क्रमांकावर आहे.

या आकडेवारीत आपण मराठी विकिपीडियाचे आक्रवे सर्वात सक्रिय विकिपीडियाचे सदस्य आहात.पूर्ण यादी इथे पहा

आम्ही मराठी विकिपीडियावर केलेल्या आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन करतो आणि भविष्यात आणखी पुढे चालू ठेवण्यासाठी उत्सुकता दाखवतो.

Wikipedia-logo-mr.png


आपल्या योगदानाबद्दल धान्यवाद.


आपला शुभचिंतक,

टायवीन

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:५४, ३ मे २०१७ (IST)Reply[reply]

अर्काईव्हींग[संपादन]

आपल्या चर्चा पानाचे विदागारीकरण (अर्काईव्हींग) करावे म्हणजे नवे प्रतिसाद/संदेश लिहिणाऱ्यांना सोपे जाईल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:४७, ३१ जुलै २०१७ (IST)Reply[reply]