कंबोडिया अंगकोर एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कंबोडिया अंगकोर एर
आय.ए.टी.ए.
K6
आय.सी.ए.ओ.
KHV
कॉलसाईन
CAMBODIA
स्थापना २८ जुलै २००९
हब पनॉम पेन आंतरराष्ट्रीय विमानतळ
सीम रीप
हो चि मिन्ह सिटी
हनोई
विमान संख्या
गंतव्यस्थाने १४
ब्रीदवाक्य Proudly the national flag carrier
पालक कंपनी कंबोडिया सरकार (५१%)
व्हियेतनाम एरलाइन्स (४९%)
मुख्यालय पनॉम पेन, कंबोडिया
संकेतस्थळ http://www.cambodiaangkorair.com/

कंबोडिया अंगकोर एर (ख्मेर: កម្ពុជា អង្គរ អ៊ែរ) ही आग्नेय आशियातील कंबोडिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. २००९ साली स्थापन झालेली ही कंपनी संयुक्तरित्या कंबोडिया सरकार व व्हियेतनाम एरलाइन्सच्या मालकीची असून तिची सर्व विमाने व्हियेतनाम एरलाइन्सकडून भाड्याने घेण्यात आली आहेत. स्थापनेपासून कंबोडिया अंगकोर एरचा देशामधील विमानवाहतूकीवर बव्हंशी ताबा आहे.

सध्या कंबोडिया अंगकोर एरकडे ४ एरबस ए३२१ विमाने तर २ ए.टी.आर. ७२ विमाने आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]