"अजित पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दोष
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १२४: ओळ १२४:
[[वर्ग:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री]]
[[वर्ग:बारामतीचे खासदार]]
[[वर्ग:बारामतीचे खासदार]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या_१२_व्या_विधानसभेचे_सदस्य]]

१३:२६, २३ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

अजित पवार
चित्र:862803-ajit-pawar
जन्म अजित
जुलै २२, इ.स. १९५९
देवळाली प्रवरा, राहुरी, अहमदनगर
निवासस्थान सहयोग,बारामती,पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.कॉम्.
पेशा राजकारण
कारकिर्दीचा काळ इ.स. १९८२ पासून
पदवी हुद्दा उप मुख्यमंत्री
कार्यकाळ इ.स.२०१० पासून इ.स.२०१४
पूर्ववर्ती छगन भुजबळ
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
धर्म हिंदू
अपत्ये पार्थ पवार, जय पवार
वडील अनंतराव
नातेवाईक शरद पवार (काका), सुप्रिया सुळे (चु. बहिण)


अजित पवार (जन्म : देवळाली प्रवरा-अहमदनगर जिल्हा, २२ जुलै १९५९) हे महाराष्ट्रातील राजकारणी व उपमुख्यमंत्री आहेत. ते शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते आहेत.[ संदर्भ हवा ]


विशेष माहिती

महाराष्‍ट्रात या ना त्‍या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्‍या काही मोजक्‍याच नेत्‍यांपैकी एक म्‍हणजे अजित पवार. त्‍यांच्‍यावर प्रसिद्धी माध्‍यमांतून व विरोधकांकडून नेहमीच कडाडून टीका होते.अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात भरपूर विकास कामे करुन शहराचा कायापालट केला आहे.[१]

बालपण व शिक्षण

अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली.

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते.

अन्य पदे

  1. विश्वस्त : विद्या प्रतिष्ठान, बारामती
  2. संचालक: छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा, पुणे
  3. संचालक : श्री.छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जिल्हा, पुणे
  4. संचालक : माळेगांव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
  5. संचालक : सोमेश्र्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
  6. संचालक : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
  7. संचालक : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे
  8. संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी.दूध उत्पादक संघ, पुणे
  9. संचालक : रयत शिक्षण संस्था, सातारा
  10. माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई
  11. माजी संचालक : महानंद
  12. माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
  13. अध्यक्ष : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – मार्च इ.स. १९९१ ते ऑगस्ट इ.स. १९९१ व डिसेंबर इ.स. १९९४ ते डिसेंबर इ.स. १९९८
  14. अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक – डिसेंबर, इ.स. १९९८ ते ऑक्टोबर, इ.स. १९९९
  15. अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – सप्टेंबर इ.स. २००५ ते मार्च २०१३
  16. अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन – ऑगस्ट , इ.स. २००६पासून
  17. अध्यक्ष : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन - मार्च २०१३ पासून
  18. अध्यक्ष : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ – सप्टेंबर इ.स. २००६पासून
  19. लोकसभा सदस्य : जून, इ.स. १९९१ ते सप्टेंबर, इ.स. १९९१.
  20. विधानसभा सदस्य : इ.स. १९९१ ते इ.स. १९९५, इ.स. १९९५ ते इ.स. १९९९, इ.स. १९९९ ते इ.स. २००४, इ.स. २००४ ते इ.स. २००९, इ.स. २००९ ते सप्टेंबर २०१४, ऑक्टोबर २०१४ मध्ये फेरनिवड. २०१९ साली राजीनामा.
  21. राज्यमंत्री : कृषी, फलोत्पादन आणि उर्जा - इ.स. १९९१ ते नोव्हेंबर इ.स. १९९२.
  22. राज्यमंत्री : जलसंधारण, ऊर्जा व नियोजन – नोव्हेंबर, इ.स. १९९२ ते फेब्रुवारी, इ.स. १९९३.
  23. मंत्री - पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे), फलोत्पादन – ऑक्टोबर इ.स. १९९९ ते जुलै इ.स.२००४.
  24. मंत्री - ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे) – इ.स. जुलैै २००४ ते नोव्हेंबर २००४.
  25. मंत्री - जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता – नोव्हेंबर, इ.स. २००४ ते नोव्हेंबर, इ.स. २००९.
  26. मंत्री - जलसंपदा (कृष्णा खोरे व कोंकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), ऊर्जा – नोव्हेंबर, इ.स. २००९ ते नोव्हेंबर, इ.स. २०१०.
  27. उप मुख्यमंत्री,(वित्त व नियोजन, ऊर्जा) - नोव्हेंबर, इ.स. २०१० ते सप्टेंबर इ.स.२०१२.
  28. उप मुख्यमंत्री(वित्त व नियोजन, ऊर्जा) - डिसेंबर इ.स. २०१२ ते इ.स. सप्टेंबर २०१४.[ संदर्भ हवा ]

खासदारकी, आमदारकी व मंत्रिपदे

१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.

अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.

१९९५ साली महाराष्ट्रात (भाजप+शिवसेना) या युतीचे सरकार आले. त्यानंतर १९९९ साली पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले.

महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.

२००४ साली आघाडी सरकार (काँग्रस + राष्ट्रवादी काँग्रॆस + इतर) पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. २००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.

आमदारकीचा राजीनामा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अर्थिक घोटाळ्याला ते जबाबदार असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. सक्त वसुली संचालनालय (Enforcement Directorate) या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात करणार त्यापूर्वीच अजित पवार यांनी २७ सप्टेंबर २०१९ रोजी आमदारकीचा राजीनामा दिला.

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ wikipediall https://www.wikipediall.com/2019/03/ajit-pawar-biography-in-marathi.html. 2019-03-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)