Jump to content

"श्रीपाल सबनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४६: ओळ ४६:
# प्रबोधनपर्व (प्रा. [[विलास वाघ]] गौरवग्रंथ)
# प्रबोधनपर्व (प्रा. [[विलास वाघ]] गौरवग्रंथ)
# [[फ.म. शहाजिंदे]] यांची निवडक कविता
# [[फ.म. शहाजिंदे]] यांची निवडक कविता
# यथार्थ : डाॅ. [[श्री.भा. जोशी|श्रीपाद भालचंद्र जोशी]] गौरवग्रंथ


===नाटक===
===नाटक===

२३:३३, १९ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

डॉ. श्रीपाल मोहन सबनीस

श्रीपाल सबनीस यांचा जन्म १९५० साली हाडोळी (ता. निलंगा) येथे झाला. ते एम.ए. पीएच डी. आहेत. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे अधिष्ठाता होते. सबनीस मराठी लेखक, अभ्यासक व समीक्षक आहेत. कुलगुरू पदासाठीच्या निवड पॅनलवर त्यांनी दोन वेळा काम केले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), सेवा-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील तौलनिक भाषा विभागप्रमुख आणि प्रोफेसर म्हणून, तसेच कला विद्याशाखेचे डीन म्हणून काम केल्यावर ते प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले.

सबनीस यांचे ३२ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील सुमारे ६९ लेखक व कवींच्या कवितासंग्रह, कांदबरी, नाटक, लेखसंग्रह, स्तंभलेखनसंग्रह इत्यादी तब्बल १४०हून अधिक वाड्‌मयीन पुस्तकांना त्यांच्या प्रस्तावना आहेत. महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांत विविध विषयांवर त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.

कौटुंबिक माहिती

श्रीपाल मोहन सबनीस यांचे वडील मोहनराव पाटील (सबनीस) हे क्रांतिकारक होते. पूर्वीच्या हैद्राबाद स्टेटमधील निजामाच्या रझाकार सेनेशी तीनशे बंदुकांच्या हत्यारबंद टोळीसह लढणारे ते स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या निलंगा तालुक्यातील हाडोळी येथील गढीवजा घरास रझाकारांनी वेढा दिला होता, तेव्हा त्यांनी हा लढा दिला.

लेखन

ग्रंथ

  1. आदिवासी प्रतिभावंतांचे मराठी साहित्य
  2. आदिवासी, मुस्लीम, ख्रिश्चन साहित्य मीमांसा
  3. इहवादी संस्कृती शोध
  4. उगवतीचा क्रांतिसूर्य
  5. कलासंचित
  6. तौलनिक साहित्य आणि भाषांतर मीमांसा
  7. संत नामदेव तुकारामांचे सांस्कृतिक संचित
  8. नामदेवांचे संतत्व आणि कवित्व
  9. नारायण सूर्व्यांच्या कवितेची इहवादी समीक्षा
  10. परिवर्तनवादी प्रवाहाची तौलनिक समीक्षा
  11. बृहन्महाराष्ट्राचे वाड्‌मयीन संचित
  12. ब्राह्मणी सत्यशोधक
  13. ब्राह्मणी सत्यशोधकाचे अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र
  14. भारतरत्न आणि बहिष्कृत भारत
  15. भारतीय प्रबोधन आणि नव-आंबेडकरवाद
  16. यथार्थ : डाॅ. श्रीपाद भालचंद्र जोशी गौरवग्रंथ (संपादित)
  17. विद्रोही अनुबंध
  18. डॉ. श्रीपाल सबनीस यांची विद्रोही काव्यसमीक्षा
  19. संत साहित्यातील सेक्युलॅरिझम
  20. समतोल समीक्षा
  21. संस्कृती समीक्षेची तिसरी भूमिका
  22. साने गुरुजी विचार जागर
  23. सेक्युलर वाङ्मयीन अनुबंध
  24. सेक्युलॅरिझम : प्रबोधनाचा मानदंड
  25. ज्ञानेश्वर ते आंबेडकर

ललित लेखन

  1. उपेक्षितांची पहाट
  2. जीव रंगला रंगला
  3. मुक्तक

संपादित ग्रंथ

  1. महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्रियांचे योगदान
  2. संस्कृती स्पंदनाचा मराठी आलेख
  3. प्रबोधनपर्व (प्रा. विलास वाघ गौरवग्रंथ)
  4. फ.म. शहाजिंदे यांची निवडक कविता
  5. यथार्थ : डाॅ. श्रीपाद भालचंद्र जोशी गौरवग्रंथ

नाटक

  1. मुंबईला घेऊन चला (वगनाट्य)
  2. शुक्राची चांदणी (वगनाट्य)

एकांकिका

  • कॉलेज कॉर्नर
  • क्रांती (राज्यस्तरीय लेखन व प्रथम पुरस्कार)
  • सत्यकथा-८२ (सुवर्णपदक विजेती एकांकिका)

पुरस्कार आणि सन्मान

  1. पुण्यात भरलेल्या अंकुर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  2. पहिले आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन, चंद्रपूर (उद्‌घाटक)
  3. पुणे मराठी ग्रंथालयाचा न.चिं. केळकर पुरस्कार
  4. ग्रामीण साहित्य संमेलन, नामपूर, जि. नाशिक (उद्‌घाटक)
  5. डी. डी. कोसंबी पुरस्कार
  6. स्वातंत्र्यसेनानी चारठाणकर पुरस्कार
  7. प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार
  8. बडोद्याच्या साहित्य परिषदेने भरवलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  9. महानुभावपंथीय महदंबा साहित्य संस्थेचा 'मनोहर स्मृती' पुरस्कार
  10. महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षक' पुरस्कार
  11. महात्मा फुले पुरस्कार
  12. पुण्यात भरलेल्या युवा साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचा मान
  13. युसास साहित्य व समाज प्रबोधन संमेलन नाशिक (उद्‌घाटक)
  14. यू. जी. सी.चे अडीच लाख रुपयांचे 'रिसर्च अवॉर्ड'
  15. राष्ट्रीय एकात्मता संमेलन, एदलाबाद (अध्यक्ष)
  16. राष्ट्रीय संमेलन, भुसावळ (उद्‌घाटक)
  17. दुसरे विदर्भ साहित्य संस्कृती संमेलन, नागपूर (अध्यक्ष)
  18. शामा प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय 'जाणीव' पुरस्कार
  19. सातार्‍यातील ग्रंथ महोत्सवाच्या उद्‌घाटकपदाचा मान
  20. साहित्य व संस्कृती संमेलन, जळगाव (उद्‌घाटक)
  21. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे, सासवड, आळंदी, परभणी, औरंगाबादमध्यप्रदेश साहित्य संमेलन भोपाळबऱ्हाणपूर- व अस्मितादर्श साहित्य संमेलन - इंदूर, देगलूर, धुळे, जळगाव, कळंब यांत सहभाग
  22. पिंपरी-चिंचवड येथे भरणार्‍या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवड (इ.स. २०१५)
  23. 'चला कवितेच्या बनात' संस्थेचा 'साहित्य साधना' पुरस्कार
  24. पुणे विद्यापीठ-संत नामदेव अध्यासनाचा 'स्वामी स्वरूपानंद सरस्वती' पुरस्कार

पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस विजयी झाले. कवी विठ्ठल वाघ यांचा त्यांनी ११२ मतांनी पराभव केला. निवडणुकीत डॉ. श्रीपाल सबनीस यांना सर्वाधिक म्हणजे ४८५ मते मिळाली होती.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१५ मध्ये निवडणूक झाली. सबनीस, वाघ यांच्याबरोबरच अरुण जाखडे, शरणकुमार लिंबाळे आणि श्रीनिवास वारुंजीकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

महाराष्ट्रातील आणि बृहन्‌ महाराष्ट्रातील एक हजार ७५ पैकी एक हजार ३३ मतदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले. यापैकी २० मतपत्रिका अवैध ठरल्या. वैध ठरलेल्या मतदानापैकी सबनीस यांना ४८५, वाघ यांना ३७३, जाखडे यांना २३०, लिंबाळे यांना २५ तर वारुंजीकर यांना २ मते मिळाली, असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांनी मतमोजणीच्या चार फेऱ्यांनंतर हा निकाल जाहीर केला[]

वर्षभराची कारकीर्द पुस्तकरूपात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या सडेतोड भाषणाने व मुलाखतीने पिंपरी येथे झालेले ८९वे साहित्य संमेलन गाजवले. तसेच पुढे वर्षभर ते सतत चर्चेत राहिले. सबनीस यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीच्या वर्षभरात त्यांनी कार्यक्रम व गाठी-भेटीच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र पालथा घातला. राज्याच्या दुर्गम भागातही जाऊन ते आपली भूमिका अधिक जोरकसपण मांडत राहिल्याने बर्‍याचदा वादही निर्माण झाले. त्यांचे वर्षभराचे हे ‘साहित्य संचित’ पुस्तकरूपाने एकत्रित करण्यात आले आहे. अध्यक्षीय भाषणाबरोबरच विविध ठिकाणे झालेली भाषणे व लेख या पुस्तकातून वाचायला मिळतात.

हेही वाचा

संदर्भ

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष

  1. ^ Loksatta. 2015-11-07 https://www.loksatta.com/pune-news/shripal-sabnis-selection-marathi-sahitya-sammelan-1158118/. 2018-08-29 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)