अंकुर साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंकुर साहित्य संघ ही संस्था ९ ऑगस्ट १९८६ रोजी १९८६ साली वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे स्थापन झाली. तिचे महाराष्ट्र राज्यभर हजारापेक्षा अधिक सभासद आहेत. या संस्थेच्या अकोला, अमरावती, कुऱ्हा (काकोडा), जळगाव, जालना वगैरे अनेक शाखा आहेत. अंकुर साहित्य संघाचे अकोला जिल्ह्यातील चांदूर येथे एक वाचनालय आहे. या वाचनालयातर्फे १९९८सालापासून दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात. या संस्थेची ३० वर्षांत अकोला जिल्ह्यात २० साहित्य संमेलने, वाशीम जिल्ह्यात ७, अमरावती जिल्ह्यात ६, सोलापूर जिल्ह्यात ३, यवतमाळ जिल्ह्यात ३, हिंगोलीत २ संमेलने झाली. तर मुंबई, परभणी, वर्धा, नांदेड, सातारा, पुणे आणि गोवा येथे एकदा संमेलन झाले आहे. या ५४ साहित्य संमेलनांतून जवळपास १५ हजारांपेक्षा अधिक नवोदित साहित्यिकांचे साहित्य प्रकाशात आले. प्रत्येक संमेलनात कथा, कविता, गझल, ललित, बालसाहित्य, समीक्षक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ’अंकुर साहित्य पुरस्कार’, ‘अक्षरतपस्वी’ पुरस्कार, ‘अक्षरवेल’ पुरस्कार, ’बालकवी’ पुरस्कार, आणि महाराष्ट्राबाहेरील कवीसाठी ’बी’ पुरस्कार देते. शाल, श्रीफळ देऊन सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप असते. [ संदर्भ हवा ]

अंकुर साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष हिंमत शेगोकार यांचे ऑगस्ट २०१५मध्ये निधन झाले.

अंकुर साहित्य संघाचे ’शब्दांकुर’ नावाचे त्रैमासिक आहे.

यापूर्वी झालेली अंकुर साहित्य संमेलने[संपादन]

अनेक नामवंत साहित्यिकांनी यापूर्वीच्या साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले आहे. यांत प्रा. इंद्रजित भालेराव, डॉ. गंगाधर पानतावणे, जगदीश खेबूडकर, नामदेव कांबळे, प्रतिमा इंगोले, प्रा. फ.म. शहाजिंदे, प्रा. फ.मुं. शिंदे, प्रा. भगवान भोईर, मलिका अमर शेख, माधवी कुंटे, मेघना वसंत वाहोकार, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. रमेश वरखेडे, रवींद्र बगाडे, रामदास डांगे, डॉ. विठ्ठल वाघ, डॉ. प्रा. विलास डोईफोडे, डॉ. शंकर राऊत, शंकर सारडा, डॉ. शोभा रोकडे, शुभांगी भडभडे, श्रीकृष्ण बेडेकर, डॉ. श्रीपाल सबनीस, प्रा. सदानंद मोरे, डॉ. सय्यद जब्बार पटेल, सिंधूताई सपकाळ यांचा समावेश आहे.

पुरस्कार[संपादन]

  • इ.स. २००९ चा बालकवी पुरस्कार ज्योती कपिले यांना ’गंमतकोडी’ या पुस्तकासाठी, तर २०१० सालचा ’बी’ पुरस्कार गोमंतकीय कवी पांडुरंग गावकर यांना ’नंतर’ या कवितासंग्रहासाठी मिळाला होता.
  • जालना येथील जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी, तसेच लेखिका व कवयित्री बेबीसरोज अंबिलवादे यांच्या ’मीच मला शोधते’ या कथासंग्रहाला २००९-१० शब्दांकुरतर्फे बाजीराव पाटील कथासंग्रह पुरस्कार दिला होता.
  • कवयित्री प्रा.सौ.विद्या दीपक दिवटे यांना २०११ साली ’आम्ही अश्वत्थामे’ या पुस्तकासाठी अंकुर साहित्य पुरस्कार देण्यात आला.
  • अंकुर साहित्य संघाचा २००८ सालचा राज्यस्तरीय शोधपत्रकारिता (उत्तेजनार्थ) पुरस्कार पत्रकार विकास विनायकराव देशमुख‎ यांना प्रदान करण्यात आला होता.[ संदर्भ हवा ]

चांदूरच्या अंकुर वाचनालयाचे पुरस्कार[संपादन]

इसवी सन २००८ चे अंकुर साहित्य पुरस्कार
  • कुसुमाग्रज काव्य पुरस्कार : बाप झाला कासावीस (शिवाजी हुसे, कन्नड जिल्हा औरंगाबाद), हुंदका (दत्तात्रेय बैरागी, मुजळगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक), प्रश्न भाकरीचा (श्रीकांत हणमंते, वणी जिल्हा यवतमाळ), नीलपंख (प्रा. संजय घरडे, अमरावती), बेट बंद भावनेचे (शशिकांत हिंगोणेकर, मुक्ताईनगर)
  • बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार : अंधाराला डोळे फुटता (संजय घाडगे लातूर), आसवांचे देणं घेणं (जगदीश देवपूरकर), घे भरारी (कु. सुमित्रा अनंत भोसले, पोखवणी, तालुका मोहाळ, जिल्हा सोलापूर), अनंताची अभंगवाणी (प्रा. अनंत राऊत, नांदेड), अखेरचं आवर्तन (विलास गावडे, मुंबई)
  • कै. भाऊसाहेब पाटणकर गझल पुरस्कार : तुझ्यासाठी (सुजीत देशपांडे, कोल्हापूर)
  • बालकवी पुरस्कार : पक्ष्यांची शाळा (प्रा. पुराणिक धुळे), सारीपाट (सौ. निर्मला भयवाळ, औरंगाबाद)
  • राम गणेश गडकरी नाट्य पुरस्कार : हुंडा बोलतोय (रा.ना. कापुरे, जळगाव)
  • कै. उद्धव ज. शेळके कादंबरी पुरस्कार : झावळ (बाबा कोटंबे, परभणी)
  • कै.भाऊ भालेराव ललित लेखन पुरस्कार : सावी (सतीश सोळांकुरकर, कळवा-जिल्हा ठाणे)
  • कै. दया पवार आत्मकथन पुरस्कार : सर्जननामा (डॉ. जे.जी.वाडेकर, नांदेड)
  • कै.बाबा आमटे व्यक्तिचरित्र पुरस्कार : महाराष्ट्र कन्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील (आतीश सोसे, अकोला)[ संदर्भ हवा ]


हे सुद्धा पहा[संपादन]

मराठी साहित्य संमेलने