"वामन कर्डक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
जन्म हा मृत्यूच्या वर्गाच्या आधी दिसण्यासाठी आवश्यक बदल
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५२: ओळ ५२:
| संकीर्ण =
| संकीर्ण =
}}
}}
'''वामन तबाजी कर्डक''' ([[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९२२]] - [[१५ मे]], [[इ.स. २००४]], इतर नावे - ''वामनदादा कर्डक, वामनराव कर्डक'') हे एक मराठी लोकशाहीर, लोककवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.<ref>{{cite web | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/lucrative-milk-production-2-174222/ | शीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत: १५ ऑगस्ट | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | दिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | लेखक=संजय वझरेकर | भाषा=मराठी}}</ref> त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे वडील मोळ्या विकणे, टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकणे हे आणि हेडीचा व्यवसाय करीत.
'''वामन तबाजी कर्डक''' ([[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९२२]] - [[१५ मे]], [[इ.स. २००४]], इतर नावे - ''वामनदादा कर्डक, वामनराव कर्डक'') हे एक मराठी लोकशाहीर, लोककवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.<ref>{{cite web | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/lucrative-milk-production-2-174222/ | शीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत: १५ ऑगस्ट | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | दिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ | लेखक=संजय वझरेकर | भाषा=मराठी}}</ref> कर्डकांनी १०,००० हून अधिक गाते डॉ. आंबेडकरांवर लिहिली.
== जीवन ==
त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे वडील मोळ्या विकणे, टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकणे हे आणि हेडीचा व्यवसाय करीत.


कर्डकांनी लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी करणे, मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिल मध्ये नोकरी, इत्यादी व्यवसाय केले. त्यांना वाचनाचा छंद असून त्यांनी ''लल्लाट लेख'' या नाटकात ''घुमा'' या पात्राची भूमिका केली होती.
कर्डकांनी लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी करणे, मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिल मध्ये नोकरी, इत्यादी व्यवसाय केले. त्यांना वाचनाचा छंद असून त्यांनी ''लल्लाट लेख'' या नाटकात ''घुमा'' या पात्राची भूमिका केली होती.

१०:४२, ६ जुलै २०१७ ची आवृत्ती

वामन कर्डक
जन्म १५ ऑगस्ट १९२२ (1922-08-15)
देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक
मृत्यू १५ मे, २००४ (वय ८१)
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे वामनदादा
नागरिकत्व भारतीय
धर्म बौद्ध
जोडीदार शांताबाई वामन कर्डक
अपत्ये मीरा (जगू शकली नाही), दत्तक पुत्र -रवींद्र कर्डक
वडील तबाजी कर्डक
आई सईबाई तबाजी कर्डक
नातेवाईक सदाशिव (थोरला भाऊ), सावित्राबाई (धाकटी बहीण)

वामन तबाजी कर्डक (१५ ऑगस्ट, इ.स. १९२२ - १५ मे, इ.स. २००४, इतर नावे - वामनदादा कर्डक, वामनराव कर्डक) हे एक मराठी लोकशाहीर, लोककवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.[१] कर्डकांनी १०,००० हून अधिक गाते डॉ. आंबेडकरांवर लिहिली.

जीवन

त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे वडील मोळ्या विकणे, टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकणे हे आणि हेडीचा व्यवसाय करीत.

कर्डकांनी लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी करणे, मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिल मध्ये नोकरी, इत्यादी व्यवसाय केले. त्यांना वाचनाचा छंद असून त्यांनी लल्लाट लेख या नाटकात घुमा या पात्राची भूमिका केली होती.

वामनदादा कर्डक यांनी ३ मे १९४३ रोजी पहिले विडंबन गीत लिहिले व त्यानंतर २००४ पर्यंत गीतलेखन व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला.. त्यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजाराच्या आसपास गीतरचना असल्याचा अंदाज आहे. कर्डकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९४० साली नायगांव येथे पाहिले व त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांत गायन केले.

पुरस्कार व सन्मान

  1. दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप.
  2. महाराष्ट्र राज्य शासनाचा दलित मित्र पुरस्कार.
  3. महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे तीन वर्ष सदस्यत्व.
  4. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व.
  5. औरंगाबाद येथे पहिला भव्य नागरी सत्कार (१९८७).
  6. प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचे प्रकाशन (१९८७).
  7. मधुकर भोळे संपादित वामन दादा कर्डक गौरव ग्रंथाचे प्रकाशन (२००१)
  8. प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित ‘वामनदादा कर्डक यांची गीत रचना’ लेख संग्रहाचे प्रकाशन.
  9. नाशिक, बुलढाणा येथे नाणेतुला
  10. परभणी येथे प्रख्यात उर्दू शायर बशर नवाज यांचे सोबत वहीतुला. नंतर या वह्यांचे गरीब मुलांना वाटप करण्यात आले.
  11. साहित्य, संस्कृती मंडळाची ‘उत्कृष्ट कविरत्‍न’ ही गौरववृत्ती.
  12. ’युगांतर प्रतिष्ठान’तर्फे ‘युगांतर पुरस्कार’ (१९९७).
  13. जामखेडच्या भाई फुटाणे प्रतिष्ठानचा ‘संत नामदेव पुरस्कार’
  14. मुंबईच्या बौद्ध कलावंत संगीत अकादमीचा ‘भीमस्मृती पुरस्कार’
  15. भोपाळ येथे ताम्रपट मिळाला..
  16. भुसावळ येथे चांदीचे मानपत्र मिळाले.
  17. हिंगोली जिल्ह्यातील बसमत येथे संजय मोहड यांनी आयोजित केलेल्या ‘स्वरार्हत संगीत संगीती’ या कार्यक्रमात नागरी सत्कार आणि गायन
  18. मराठवाडा ‘अस्मितादर्श पुरस्कार’
  19. सन १९९३ला वर्धा येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  20. औरंगाबादच्या वामनदादा कर्डक प्रतिष्ठान या संस्थेने भरविलेले पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, १५ मे २००८ रोजी औरंगाबाद येथे झाले. डॉ. यशवंत मनोहर संमेलनाध्यक्ष होते.

काव्यसंग्रहृ

  1. ‘वाटचाल’ (गीतसंग्रह) १९७३
  2. ‘मोहळ’ (गीतसंग्रह) १९७६
  3. ‘हे गीत वामनाचे’ (गीतसंग्रह) १९७७
  4. ‘माझ्या जीवनाचं गाणं’ (आत्मकथन) १९९६

ध्वनिफिती व चित्रपट गीते

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट
  2. भीमज्योत
  3. जय भीम गीते
  4. सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला (चित्रपट - सांगत्ये ऐका)
  5. चल गं हरणे तुरू तुरू (चित्रपट - पंचारती)

वामनदादा कर्डक यांच्या अन्य गीतरचना व इतर भीमगीते

  • ह्यो ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा, तुझ्याकडे बघून हसतोय गं, काही तरी घोटाळा दिसतोय गं (संगीत- मधुकर पाठक; स्वर- श्रावण यशवंते)

चरित्र

  • एका कवीचे जीवनगाणे - वामन कर्डक यांची चरित्रकथा (लेखक -बबन लोंढे)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ संजय वझरेकर. http://www.loksatta.com/navneet-news/lucrative-milk-production-2-174222/. ३१ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)


बाह्य दुवे

  1. http://www.youtube.com/watch?v=oKvOHun5pa8
  2. http://yashwantmanohar.com/samikshechi-pustake/ambedkarvadi-mahageetkar-wamandada-kardak/