"वासंती (चित्रपट अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३: ओळ १३:

'अमरज्योती' या चित्रपटात दुर्गा खोटेंना शोधत भिकारणीचे वेषांतर करून गात गात जाण्याचे दृश्य साकारताना वासंती तापाने फणफणली होती. पण काम म्हणजे काम, तिथे दया माया नाही ही 'प्रभात'ची शिस्त होती. त्याही परिस्थितीत वासंतीने काम केले आणि त्याची तारीफ झाली.

रणजीत स्टुडिओचा ‘अछूत’ (१९४०) हा सरदार चंदुलाल शहा यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता. यामध्ये राजकुमारी, सितारादेवी या पट्टीच्या गायिका असूनही वासंतीच्या वाट्याला पाच गाणी होती. खेमचंद प्रकाशनी संगीतबद्ध केलेल्या ‘दिवाली’मधील बहुतेक गाणी वासंती आणि इंदुबालांनी गायली होती. वासंतीचे ‘जल दीपक दिवाली आयी’ खूप लोकप्रिय झाले होते.

इ.स. १९३९मध्ये सर्वोत्तम बदामीच्या ‘आप की मरजी’ (इंग्रजीत ‘अ‍ॅज यू प्लीज’) चित्रपटात वासंती केकीच्या भूमिकेत होती. खुर्शीद यामध्ये दुय्यम नायिका होती. संगीतकार ज्ञानदत्त यांनी वासंतीकडून या चित्रपटात तीन गाणी गाऊन घेतली.

प्रभातचा ‘अमर ज्योती’ हा व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाठवला गेला होता.

==पगारावर नेमणूक==
==पगारावर नेमणूक==
ओळ २०: ओळ २६:
जयपूर अत्रौली घराण्याचे गायक पं. [[वामनराव सडोलीकर]] हे वासंतीच्या मोठ्या बहिणीचे यजमान. त्यांच्याकडून वासंतीबाईंना पाच वर्षे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. ठुमरी व दादराची तालीम उस्ताद घम्मन खाँकडून मिळाली. गळ्यात उपजतच सूर-ताल होते, त्यांना घराणेदार शिक्षणाचे कोंदण मिळाले. हे शिक्षण चालू असताना पुण्यातील भावे स्कूल ही शाळा, अभ्यास हेही सुरूच होते.

अभिनयाबरोबरच सुगम गायनाचे क्षेत्रही वासंतीने काबीज केले. घराजवळच ग्यानदत्त राहात होते; त्यांनी काही गीतांना संगीत देऊन वासंतीच्या वाजात रेकॉर्डिग केले. मदन मोहन त्यावेळी तरुण होते, त्यांचे घरी येणे-जाणे होते. घम्मन खाँसाहेबांची तालीम चालू असताना ते लक्षपूर्वक ऐकत, कधी पेटी घेऊन आपल्या चाली ऐकवत. [[दत्ता डावजेकर]], [[मास्टर कृष्णराव]], [[खेमचंद प्रकाश]], [[सुधीर फडके]] यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली वासंतीची सुमारे २०० गाणी रेकॉर्ड झाली. काही चित्रपटांच्या गाण्यात [[दुर्गा खोटे]], [[शांता आपटे]], [[विष्णुपंत पागनीस]], [[खुर्शीद]], कांतिलाल, [[सी. रामचंद्र]] हे सहगायक कलाकार होते. [[कुंदनलाल सैगल]], [[बेगम अख्तर]] यांनी वासंतीच्या गाण्याचे मनापासून कौतुक केले.
अभिनयाबरोबरच सुगम गायनाचे क्षेत्रही वासंतीने काबीज केले. घराजवळच ग्यानदत्त राहात होते; त्यांनी काही गीतांना संगीत देऊन वासंतीच्या वाजात रेकॉर्डिग केले. मदन मोहन त्यावेळी तरुण होते, त्यांचे घरी येणे-जाणे होते. घम्मन खाँसाहेबांची तालीम चालू असताना ते लक्षपूर्वक ऐकत, कधी पेटी घेऊन आपल्या चाली ऐकवत. [[दत्ता डावजेकर]], [[मास्टर कृष्णराव]], [[खेमचंद प्रकाश]], [[सुधीर फडके]] यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली वासंतीची खूप गाणी रेकॉर्ड झाली. काही चित्रपटांच्या गाण्यात [[दुर्गा खोटे]], [[शांता आपटे]], [[विष्णुपंत पागनीस]], [[खुर्शीद]], कांतिलाल, [[सी. रामचंद्र]] हे सहगायक कलाकार होते. [[कुंदनलाल सैगल]], [[बेगम अख्तर]] यांनी वासंतीच्या गाण्याचे मनापासून कौतुक केले.

‘संत तुलसीदास’मध्ये [[स.अ. शुक्ल]] यांनी लिहिलेली वासंतीची पाच गाणी होती. या चित्रपटाने ऑपेरा हाऊसमध्ये रजत जयंती साजरी केली. संगीत निर्देशन पागनीस व ज्ञानदत्त यांनी केले होते. याच्या ध्वनिमुद्रिकांची तडाखेबंद विक्री झाली होती. मराठी 'संत तुलसीदास'मधील ‘माझ्या मामाच्या घरी’ हे वासंती व राम मराठे यांनी गायलेले गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते.

वासंतीने आपल्या सोळा वर्षांच्या कारकीर्दीत जवळजवळ २०० गाणी गायली. संगीतकार [[अनिल विश्वास]], [[सी. रामचंद्र]], [[सुधीर फडके]], [[स्नेहल भाटकर]], [[जी.एन. जोशी]] आदींनी वासंतीकडून गैरफिल्मी गीते आणि भावगीते गाणी गाऊन घेतली आहेत.
रणजीत स्टुडिओचा ‘अछूत’ (१९४०) हा सरदार चंदुलाल शहा यांनी दिग्दर्शित केलेला [[गोहरजान]]ने भूमिका केलेला हा शेवटचा चित्रपट होता. यामध्ये राजकुमारी, सितारादेवी या पट्टीच्या गायिका असूनही वासंतीच्या वाट्याला पाच गाणी होती. खेमचंद प्रकाशनी संगीतबद्ध केलेल्या ‘दिवाली’मधील बहुतेक गाणी वासंती आणि इंदुबालांनी गायली होती. वासंतीचे ‘जल दीपक दिवाली आयी’ खूप लोकप्रिय झाले होते.

===ध्वनिमुद्रिका===
===ध्वनिमुद्रिका===
ओळ ३१: ओळ ३७:
* अहा भारत विराजे (गीत - शांताराम आठवले, संगीत - केशवराव भोळे; चित्रपट - कुंकू)
* अहा भारत विराजे (गीत - शांताराम आठवले, संगीत - केशवराव भोळे; चित्रपट - कुंकू)
* आज भाऊबीज आली
* आज भाऊबीज आली
* काहे पंछी बावरिया, रोना राग सुनाए झमेला दो दिन का (चित्रपट -दिवाली)
* गोकुलनी गोवलडी (गुजराती चित्रपट - अच्युत; सहगायिका - [[सितारादेवी]])
* गोकुलनी गोवलडी (गुजराती चित्रपट - अच्युत; सहगायिका - [[सितारादेवी]])
* जल दीपक दिवाली आयी ((संगीत - खेमचंद प्रकाश; चित्रपट - अछूत)
* जल दीपक दिवाली आयी ((संगीत - खेमचंद प्रकाश; चित्रपट - अछूत)
ओळ ४०: ओळ ४७:
* बांंटे न बनेगा किसी का देश हमारा (गीत - मगन; संगीत - [[सी.रामचंद्र]]; चित्रपट - बच्चों का खेल; सहगयिका - विजया]]
* बांंटे न बनेगा किसी का देश हमारा (गीत - मगन; संगीत - [[सी.रामचंद्र]]; चित्रपट - बच्चों का खेल; सहगयिका - विजया]]
* बोलो बोलो रे प्रभुजी (गीत - डी.एन. मधोक; संगीत - [[सी.रामचंद्र]]; चित्रपट - भक्तराज)
* बोलो बोलो रे प्रभुजी (गीत - डी.एन. मधोक; संगीत - [[सी.रामचंद्र]]; चित्रपट - भक्तराज)
* भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे ((गीत- [[शांताराम आठवले]]; संगीत - [[केशवराव भोळे]]; चित्रपट - कुंकू; राग - देस)
* भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे ((गीत- [[शांताराम आठवले]]; संगीत - [[केशवराव भोळे]]; चित्रपट - कुंकू; राग - देस; सहगायिका - शांता आपटे)
* मत कर तू अभिमान (गीत - डी.एन. मधोक; संगीत - [[सी.रामचंद्र]]; चित्रपट - भक्तराज; सहगायक - [[विष्णुपंत पागनीस]])
* मत कर तू अभिमान (गीत - डी.एन. मधोक; संगीत - [[सी.रामचंद्र]]; चित्रपट - भक्तराज; सहगायक - [[विष्णुपंत पागनीस]])
* माझ्या मामाच्या घरी (गीत - [[स.अ. शुक्ल]]; संगीत - पागनीस व ज्ञानदत्त; चित्रपट - संत तुलसीदास)
* माझ्या मामाच्या घरी (गीत - [[स.अ. शुक्ल]]; संगीत - पागनीस व ज्ञानदत्त; चित्रपट - संत तुलसीदास; सहगायक - [[राम मराठे]])
* यॆह ठंडी हवाेंयें संदेश सुनायें (गीत - बी.आर. शर्मा, डी.एन. मधोक; संगीत - ज्ञानदत्त; चित्रपट - बेटी; सहगायिका [[खुर्शीद]])
* येह ठंडी हवायें संदेश सुनायें (गीत - बी.आर. शर्मा, डी.एन. मधोक; संगीत - ज्ञानदत्त; चित्रपट - बेटी; सहगायिका [[खुर्शीद]])
* सजणा पहाट झाली (भावगीत)
* सावन झूला झुलके निकला (चित्रपट - दुनिया न माने; सहगायिका - शांता आपटे)
* सावन झूला झुलके निकला (चित्रपट - दुनिया न माने; सहगायिका - शांता आपटे)

ओळ ५०: ओळ ५८:

==अखेरचा चित्रपट आणि विवाह==
==अखेरचा चित्रपट आणि विवाह==
इ.स. १९४४मध्ये प्रकाशित झालेला 'भाग्यलक्ष्मी' हा वासंतीचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर इंदुभाई पटेल यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि गृहिणी-माता या भूमिकेत वासंती रमून गेल्या.
इ.स. १९४४मध्ये प्रकाशित झालेला 'भाग्यलक्ष्मी' हा वासंतीचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर [[हैदराबाद]]च्या इंदुभाई पटेल यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि गृहिणी-माता या भूमिकेत वासंती रमून गेल्या.
आधुनिक विचारांच्या वासंतीने आपल्या मुलांनी संगीत शिकावे म्हणून प्रोत्साहन दिले. त्यांचा मोठा मुलगा चांगला तबला वाजवतो. त्यांच्या भाचीचे- [[श्रुती सडोलीकर]]ांचे नाव शास्त्रीय संगीताची एक नामवंत गायिका म्हणून सर्वश्रुत आहे. वासंतीच्या नातवंडांनाही संगीतात रुची आहे. १९८३ मध्ये वासंतीबाईंच्या पतीचे निधन झाले. वासंतींना तीन मुलगे, एक कन्या आणि नातवंडे आहेत.

==वासंतीची भूमिका असलेले चित्रपट==
==वासंतीची भूमिका असलेले चित्रपट==
ओळ ५७: ओळ ६६:
* अमर ज्योती
* अमर ज्योती
* अयोध्येचा राजा (मूकपट)
* अयोध्येचा राजा (मूकपट)
* आपकी मर्जी
* आपकी मरजी
* कुंकू
* कुंकू
* कुर्बानी
* कुर्बानी
* कृष्णजन्म (मूकपट)
* कृष्णजन्म (मूकपट)
ओळ ६४: ओळ ७३:
* दीवाली
* दीवाली
* दुःख सुख
* दुःख सुख
* दुनिया न माने (हिंदी)
* दुनिया न माने (हिंदी) - मराठी 'कुंकू'वरून बनवलेला
* धर्मात्मा (आधीचे नाव महात्मा)
* धर्मात्मा (आधीचे नाव महात्मा)
* पहिली मंगळागौर
* पहिली मंगळागौर
ओळ ७३: ओळ ८२:
* भाग्यलक्ष्मी
* भाग्यलक्ष्मी
* मायामच्छिंद्र (मूकपट)
* मायामच्छिंद्र (मूकपट)
* मीना (अप्रकाशित -१९४२; निर्माते - [[दॆव आनंद]] आणि वासंती)
* मीना (अप्रकाशित -१९४२; निर्माते - [[दॆव आनंद]] आणि वासंती). हा [[देव आनंद]]चा पहिला चित्रपट.
* मुरलीवाला (मूकपट)
* मुरलीवाला (मूकपट)
* मुसाफिर
* मुसाफिर
* संत तुलसीदास (मराठी-हिंदी)

==पुरस्कार==
==पुरस्कार==
ओळ ८३: ओळ ९३:
* 'पं. वामनराव सडोलीकर फाउंडेशन'तर्फे जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक पं. वामनराव सडोलीकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरांजली अर्पित केली जाते. त्या वेळी संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या आणि गायन/वादन क्षेत्राप्रमाणेच पंडितजींचे आणखी एक यशस्वी कार्यक्षेत्र असलेल्या नाट्यक्षेत्रामध्ये अग्रणी असणाऱ्या कलावंतांचा, विचारवंतांचा, गुणवंतांचा सन्मान करण्यात येतो. इ.स.२०१५ सालचा 'पं. वामनराव सडोलीकर जीवन गौरव सन्मान' वासंती पटेल यांना प्रदान करण्यात आला.

==विशेष==
शेवटच्या एक-दोन चित्रपटांत वासंती साडीमध्ये दिसली. बाकी चित्रपटांत परकर-पोलक्यातील गोड, निरागस चिमुरडी म्हणूनच वावरली. फणी मुजुमदारच्या अप्रकाशित मीना ऊर्फ वनराणी या चित्रपटात मध्ये देव आनंदचा भाऊ चेतन आनंद तिचा नायक होता.

सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर बेबी राणी ([[नर्गिस), बेबी [[मुमताज]] ([[मधुबाला]]), [[बेबी नाझ]], [[डेझी इराणी]] अशा अनेक बालतारका चमकल्या, पण त्यांत अभिनय, नृत्य आणि गायन या तिन्ही कलांची ईश्वरी देणगी लाभलेली फक्त एकच बालतारका होती, ती म्हणजे वासंती विनायकराव घोरपडे ऊर्फ वासंती इंदुभाई पटेल.

(अपूर्ण)

[[वर्ग:मराठी अभिनेत्री]]
[[वर्ग:मराठी अभिनेत्री]]

२०:३१, ३ मे २०१५ ची आवृत्ती

वासंती विनायक घोरपडे -सासरच्या वासंती इंदुभाई पटेल (जन्म : कोल्हापूर, इ.स. १९२२; हयात) या मराठी चित्रपटांत भूमिका करणाऱ्या पहिल्या गायक बालकलावंत होत्या.

१९१७ मध्ये बाबूराव पेंटरांनी कोल्हापूरला महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीला वासंतीच्या मावशी, तानीबाई कागलकर, यांनी अर्थसाहाय्य केले होते. तानीबाईंचा विवाह कोल्हापूरच्या महाराजांच्या भावाशी झाला होता. त्या उस्ताद अल्लादिया खान साहेबांच्या ज्येष्ठ शिष्या होत्या. उत्कृष्ट शास्त्रीय गायिका असल्या तरी, राजघराण्याशी संबंधित असल्याने त्या गायनाचे कार्यक्रम कधीच करत नसत. वासंतीबाईंचे वडील विनायकराव घोरपडे वकील होते. सर्व घोरपडे मंडळी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या आवारातच एका प्रशस्त बंगल्यात राहत होती. त्या बंगल्यात त्या काळी चित्रणही होत असे. इ.स.१९२२ मध्ये जन्मलेल्या वासंतीला पाळण्यात असतानाच बाबूराव पेंटरांनी त्यांच्या ‘कृष्णजन्म’ (१९२२) व ‘मुरलीवाला’ (१९२२) या मूकपटांत बालकृष्ण बनवले, आणि तेथपासूनच वासंतीचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.

१ जून १९२९ रोजी विष्णुपंत दामले, व्ही. शांताराम, केशवराव धायबर (वासंतीबाईंच्या आत्याचे यजमान), शेख फत्तेलाल व सीतारामपंत कुलकर्णी यांनी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. १९३२ मध्ये ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटाच्या निर्मितीनंतर, चांगला वीजपुरवठा, प्रशस्त जागा व अधिक सुखसोयींसाठी प्रभातने कोल्हापूर सोडून पुण्याला स्थलांतर केले. वासंतीबाई ह्या त्यांच्या मूकपटांतून व बोलपटांतून छोट्यामोठ्या भूमिका करत असत. १९३२ साली निघालेल्या ‘मायामच्छिंद्र’मध्ये स्त्रीलंपट, पण भित्र्या शंखनादाच्या (नट -राजाराम बापू पुरोहित) कन्येची भूमिका वासंतीने केली होती. तसेच ‘बजरबट्टू’ (१९३०) या मूकपटामध्येही वासंतीबाई होत्या.

प्रभातच्या ‘महात्मा’ (नंतरचे नाव ‘धर्मात्मा’) चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी शांताराम बापूंनी वासंतीमधील कलागुण हेरून तिला राणू महाराच्या (वसंत देसाई) मुलीची- जाईची आव्हानात्मक भूमिका दिली. वास्तविक वासंतीने अभिनय, नृत्य आणि गायनाचे तसे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते; तिला या सर्वाची नैसर्गिक देणगी होती. संत एकनाथांनी आपल्या घरी जेवायला येण्याचे मान्य केल्यावर हर्षभरित झालेली जाई (वासंती) ‘उद्या जेवायला येणार नाथ आमच्या घरी’ गात, नाचत, बागडत रस्त्यातून धावत जाते. वासंतीने हा प्रसंग इतका सुरेख आणि सहज साकार केला, की भल्याभल्यांनी तिच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. एका हरिजन मुलीची अप्रतिम भूमिका साकार केली म्हणून स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वासंतीची पाठ थोपटली होती.

'धर्मात्मा'च्या एका दृश्यात जाई रडता रडता हसते, हसता हसता रडते. अल्लड वयाच्या वासंतीला रडूच येईना. शांताराम बापूंनी फटकन चपराक दिली. आश्चर्य आणि दु:खाने रडणारी 'जाई' कॅमेऱ्याने केव्हा टिपली ते कळलेच नाही. ते दृश्य चित्रपटात फार प्रभावीपणे उतरले आहे.

पुढची कारकीर्द

'धर्मात्मा' पाठोपाठ 'अमर ज्योती' (दुर्गा खोटे, चंद्रमोहन यांच्यासह), कुंकू (शांता आपटे, केशवराव दाते, राजा नेने, विमला वसिष्ठ यांच्यासह) (हिंदीत 'दुनिया न माने') हे चित्रपट आले आणि त्यांनी उत्कृष्ट चित्रपटाचे मानक स्थापित केले. 'अमर ज्योती'मधील भूमिकेसाठी वासंती 'गौहर सुवर्ण पदका'ची मानकरी झाली. ही भूमिका खास वासंतीसाठी निर्माण केली होती. वासंतीने तिचे चीज केले.

'अमरज्योती' या चित्रपटात दुर्गा खोटेंना शोधत भिकारणीचे वेषांतर करून गात गात जाण्याचे दृश्य साकारताना वासंती तापाने फणफणली होती. पण काम म्हणजे काम, तिथे दया माया नाही ही 'प्रभात'ची शिस्त होती. त्याही परिस्थितीत वासंतीने काम केले आणि त्याची तारीफ झाली.

रणजीत स्टुडिओचा ‘अछूत’ (१९४०) हा सरदार चंदुलाल शहा यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता. यामध्ये राजकुमारी, सितारादेवी या पट्टीच्या गायिका असूनही वासंतीच्या वाट्याला पाच गाणी होती. खेमचंद प्रकाशनी संगीतबद्ध केलेल्या ‘दिवाली’मधील बहुतेक गाणी वासंती आणि इंदुबालांनी गायली होती. वासंतीचे ‘जल दीपक दिवाली आयी’ खूप लोकप्रिय झाले होते.

इ.स. १९३९मध्ये सर्वोत्तम बदामीच्या ‘आप की मरजी’ (इंग्रजीत ‘अ‍ॅज यू प्लीज’) चित्रपटात वासंती केकीच्या भूमिकेत होती. खुर्शीद यामध्ये दुय्यम नायिका होती. संगीतकार ज्ञानदत्त यांनी वासंतीकडून या चित्रपटात तीन गाणी गाऊन घेतली.

प्रभातचा ‘अमर ज्योती’ हा व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाठवला गेला होता.

पगारावर नेमणूक

'रणजित मूव्हीटोन' या चित्रपट कंपनीचे चंदूलाल शहा हे गुणी माणसांचे पारखी होते. त्यांनी महिना १,५०० रु. पगारावर वासंतीला कंपनीत घेतले. घोरपड्यांच्या दादर स्टेशनजवळच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच रणजित स्टुडिओ होता.. 'संत तुलसीदास' हा 'रणजित'चा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला. त्या काळात 'मराठी चित्रपटसृष्टीची शर्ले टेम्पल' असा किताबही वासंतीला मिळाला.

संगीताचे शिक्षण आणि ध्वनिमुद्रण

जयपूर अत्रौली घराण्याचे गायक पं. वामनराव सडोलीकर हे वासंतीच्या मोठ्या बहिणीचे यजमान. त्यांच्याकडून वासंतीबाईंना पाच वर्षे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. ठुमरी व दादराची तालीम उस्ताद घम्मन खाँकडून मिळाली. गळ्यात उपजतच सूर-ताल होते, त्यांना घराणेदार शिक्षणाचे कोंदण मिळाले. हे शिक्षण चालू असताना पुण्यातील भावे स्कूल ही शाळा, अभ्यास हेही सुरूच होते.

अभिनयाबरोबरच सुगम गायनाचे क्षेत्रही वासंतीने काबीज केले. घराजवळच ग्यानदत्त राहात होते; त्यांनी काही गीतांना संगीत देऊन वासंतीच्या वाजात रेकॉर्डिग केले. मदन मोहन त्यावेळी तरुण होते, त्यांचे घरी येणे-जाणे होते. घम्मन खाँसाहेबांची तालीम चालू असताना ते लक्षपूर्वक ऐकत, कधी पेटी घेऊन आपल्या चाली ऐकवत. दत्ता डावजेकर, मास्टर कृष्णराव, खेमचंद प्रकाश, सुधीर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली वासंतीची खूप गाणी रेकॉर्ड झाली. काही चित्रपटांच्या गाण्यात दुर्गा खोटे, शांता आपटे, विष्णुपंत पागनीस, खुर्शीद, कांतिलाल, सी. रामचंद्र हे सहगायक कलाकार होते. कुंदनलाल सैगल, बेगम अख्तर यांनी वासंतीच्या गाण्याचे मनापासून कौतुक केले.

‘संत तुलसीदास’मध्ये स.अ. शुक्ल यांनी लिहिलेली वासंतीची पाच गाणी होती. या चित्रपटाने ऑपेरा हाऊसमध्ये रजत जयंती साजरी केली. संगीत निर्देशन पागनीस व ज्ञानदत्त यांनी केले होते. याच्या ध्वनिमुद्रिकांची तडाखेबंद विक्री झाली होती. मराठी 'संत तुलसीदास'मधील ‘माझ्या मामाच्या घरी’ हे वासंती व राम मराठे यांनी गायलेले गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते.

वासंतीने आपल्या सोळा वर्षांच्या कारकीर्दीत जवळजवळ २०० गाणी गायली. संगीतकार अनिल विश्वास, सी. रामचंद्र, सुधीर फडके, स्नेहल भाटकर, जी.एन. जोशी आदींनी वासंतीकडून गैरफिल्मी गीते आणि भावगीते गाणी गाऊन घेतली आहेत.

ध्वनिमुद्रिका

  • अब क्या ढूँढ रहे हो साजन (गीत - वली साहब; संगीत - खेमचंद प्रकाश; चित्रपट - दु:ख सुख)
  • अहा दिवाळी दिवाळी आली
  • अहा भारत विराजे (गीत - शांताराम आठवले, संगीत - केशवराव भोळे; चित्रपट - कुंकू)
  • आज भाऊबीज आली
  • काहे पंछी बावरिया, रोना राग सुनाए झमेला दो दिन का (चित्रपट -दिवाली)
  • गोकुलनी गोवलडी (गुजराती चित्रपट - अच्युत; सहगायिका - सितारादेवी)
  • जल दीपक दिवाली आयी ((संगीत - खेमचंद प्रकाश; चित्रपट - अछूत)
  • जाग रे अब तॊ जाग (गीत - बी.आर. शर्मा, डी.एन. मधोक; संगीत - ज्ञानदत्त; चित्रपट - बेटी)
  • जान गयी झूटे इकरार (गीत - वली साहब; संगीत - खेमचंद प्रकाश; चित्रपट - दु:ख सुख)
  • जा रे बदरिया तू जा (गीत - बी.आर. शर्मा, डी.एन. मधोक; संगीत - ज्ञानदत्त; चित्रपट - बेटी; सहगायिका खुर्शीद)
  • जोगन खोजन निकली है (चित्रपट - अमर ज्योती)
  • देखे न कही दुनिया (गीत - मगन; संगीत - सी.रामचंद्र; चित्रपट - बच्चों का खेल]]
  • बांंटे न बनेगा किसी का देश हमारा (गीत - मगन; संगीत - सी.रामचंद्र; चित्रपट - बच्चों का खेल; सहगयिका - विजया]]
  • बोलो बोलो रे प्रभुजी (गीत - डी.एन. मधोक; संगीत - सी.रामचंद्र; चित्रपट - भक्तराज)
  • भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे ((गीत- शांताराम आठवले; संगीत - केशवराव भोळे; चित्रपट - कुंकू; राग - देस; सहगायिका - शांता आपटे)
  • मत कर तू अभिमान (गीत - डी.एन. मधोक; संगीत - सी.रामचंद्र; चित्रपट - भक्तराज; सहगायक - विष्णुपंत पागनीस)
  • माझ्या मामाच्या घरी (गीत - स.अ. शुक्ल; संगीत - पागनीस व ज्ञानदत्त; चित्रपट - संत तुलसीदास; सहगायक - राम मराठे)
  • येह ठंडी हवायें संदेश सुनायें (गीत - बी.आर. शर्मा, डी.एन. मधोक; संगीत - ज्ञानदत्त; चित्रपट - बेटी; सहगायिका खुर्शीद)
  • सजणा पहाट झाली (भावगीत)
  • सावन झूला झुलके निकला (चित्रपट - दुनिया न माने; सहगायिका - शांता आपटे)

नाट्यसृष्टीत प्रवेश

चित्रपटसृष्टीत नाव गाजत असताना १९४४ च्या मराठी नाट्य महोत्सवात 'संगीत शारदा' हे नाटक करायचे ठरले. वासंतीला शारदेचे काम दिले गेले. कोदंड-गंगाधरपंत लोंढे, श्रीमंत- चिन्तोपंत गुरव आणि इंदिरा काकू- बालगंधर्व असा तगडा संच होता. सकाळपासून रात्रीपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण आटोपून घरी येऊन मेकअपसुद्धा न उतरवता वासंती शारदेच्या भूमिकेची तालीम करत असे. ही भूमिका पं. वामनराव सडोलीकर (वासंतीच्या बहिणीचे पती) यांनी बसवून घेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. पदे आणि संवाद-अभिनय शिकवताना सडोलीकर (भाऊ) अतिशय शिस्तीने, वेळ पडल्यास कठोरपणे तालमी घेत. त्यांनी पदे शिकवली, पण इतरांबरोबर तालीम करताना संपूर्ण पद गायचे नाही असे वासंतीला बजावले होते. त्यामुळे सहकलाकार खूप अस्वस्थ झाले. प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी या शारदेने अभिनय आणि गाण्याचा असा बार उडवला की बस्स! 'मूर्तिमंत भीती उभी' या पदाने वन्स मोअर तर घेतलेच, पण अंक संपताच हिराबाई बडोदेकर विंगेत येऊन वासंतीला मिठी मारून रडल्या. पोरी, तू रडवलंस आम्हाला असं म्हणून त्यांनी खूप तारीफ केली.

अखेरचा चित्रपट आणि विवाह

इ.स. १९४४मध्ये प्रकाशित झालेला 'भाग्यलक्ष्मी' हा वासंतीचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर हैदराबादच्या इंदुभाई पटेल यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि गृहिणी-माता या भूमिकेत वासंती रमून गेल्या. आधुनिक विचारांच्या वासंतीने आपल्या मुलांनी संगीत शिकावे म्हणून प्रोत्साहन दिले. त्यांचा मोठा मुलगा चांगला तबला वाजवतो. त्यांच्या भाचीचे- श्रुती सडोलीकरांचे नाव शास्त्रीय संगीताची एक नामवंत गायिका म्हणून सर्वश्रुत आहे. वासंतीच्या नातवंडांनाही संगीतात रुची आहे. १९८३ मध्ये वासंतीबाईंच्या पतीचे निधन झाले. वासंतींना तीन मुलगे, एक कन्या आणि नातवंडे आहेत.

वासंतीची भूमिका असलेले चित्रपट

  • अच्युत (गुजराती)
  • अछूत
  • अमर ज्योती
  • अयोध्येचा राजा (मूकपट)
  • आपकी मरजी
  • कुंकू
  • कुर्बानी
  • कृष्णजन्म (मूकपट)
  • संत तुलसीदास
  • दीवाली
  • दुःख सुख
  • दुनिया न माने (हिंदी) - मराठी 'कुंकू'वरून बनवलेला
  • धर्मात्मा (आधीचे नाव महात्मा)
  • पहिली मंगळागौर
  • बच्चोंका खेल
  • बजरबट्टू (मूकपट)
  • बेटी
  • भक्तराज
  • भाग्यलक्ष्मी
  • मायामच्छिंद्र (मूकपट)
  • मीना (अप्रकाशित -१९४२; निर्माते - दॆव आनंद आणि वासंती). हा देव आनंदचा पहिला चित्रपट.
  • मुरलीवाला (मूकपट)
  • मुसाफिर
  • संत तुलसीदास (मराठी-हिंदी)

पुरस्कार

  • 'मराठी चित्रपटसृष्टीची शर्ले टेम्पल' हा किताब
  • 'गौहर सुवर्ण पदक'
  • अमर ज्योती या चित्रपटातील 'जोगन खोजन निकली है' या गाण्यासाठी मिळालेले सुवर्णपदक
  • 'पं. वामनराव सडोलीकर फाउंडेशन'तर्फे जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक पं. वामनराव सडोलीकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरांजली अर्पित केली जाते. त्या वेळी संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या आणि गायन/वादन क्षेत्राप्रमाणेच पंडितजींचे आणखी एक यशस्वी कार्यक्षेत्र असलेल्या नाट्यक्षेत्रामध्ये अग्रणी असणाऱ्या कलावंतांचा, विचारवंतांचा, गुणवंतांचा सन्मान करण्यात येतो. इ.स.२०१५ सालचा 'पं. वामनराव सडोलीकर जीवन गौरव सन्मान' वासंती पटेल यांना प्रदान करण्यात आला.

विशेष

शेवटच्या एक-दोन चित्रपटांत वासंती साडीमध्ये दिसली. बाकी चित्रपटांत परकर-पोलक्यातील गोड, निरागस चिमुरडी म्हणूनच वावरली. फणी मुजुमदारच्या अप्रकाशित मीना ऊर्फ वनराणी या चित्रपटात मध्ये देव आनंदचा भाऊ चेतन आनंद तिचा नायक होता.

सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर बेबी राणी ([[नर्गिस), बेबी मुमताज (मधुबाला), बेबी नाझ, डेझी इराणी अशा अनेक बालतारका चमकल्या, पण त्यांत अभिनय, नृत्य आणि गायन या तिन्ही कलांची ईश्वरी देणगी लाभलेली फक्त एकच बालतारका होती, ती म्हणजे वासंती विनायकराव घोरपडे ऊर्फ वासंती इंदुभाई पटेल.