"सदाशिव अमरापूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ४८: | ओळ ४८: | ||
* हवा अंधारा कवडसा |
* हवा अंधारा कवडसा |
||
==अमरापूर यांनी लिहिलेली/दिग्दर्शित केलेली नाटके-- |
|||
* कन्यादान (दिग्दर्शन) |
|||
* किमयागार (नाट्यलेखन. हे नाटक [[लेलन केलर]] आणि तिची शिक्षिका यांच्या जीवनावर आहे.) |
|||
==सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका असलेले हिंदी-(मराठी) चित्रपट== |
==सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका असलेले हिंदी-(मराठी) चित्रपट== |
१२:३१, ४ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
सदाशिव अमरापूरकर | |
---|---|
जन्म |
सदाशिव अमरापूरकर ११ मे, इ.स. १९५० अहमदनगर, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
३ नोव्हेंबर २०१४ पहाटे पावणे तीन वाजता. मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
पत्नी | सुनंदा |
अपत्ये | तीन मुली |
गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर (जन्म : अमरापूर अहमदनगर जिल्हा-महाराष्ट्र-भारत, ११ मे इ.स. १९५०; मृत्यू : मुंबई, ३ नोव्हेंबर २०१४) हे मराठी नाट्यअभिनेते तसेच हिंदी-मराठी-ओरिया-हरियाणी-भोजपुरी-बंगाली-गुजराथी भाषांतील चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते.
शेवगाव तालुक्यातील अमरापूर हे त्यांचे मूळ गाव. त्याचे वडील शेती करत. शेत नांगरणे, बैलांना चारा घालणे, मोट चालवणे, गाईचे दूध काढणे, जत्रेत बैल पळविणे या सगळ्या गोष्टी अमरापूरकर यांनी बालपणी केल्या होत्या. त्यांच्याकडे १०० शेळ्या होत्या. रोज त्यांना चरायला घेऊन जाण्याचे काम अमरापूरकर करीत. आपल्या आळंदीला राहणाऱ्या आत्याबरोबर त्यांनी तीन चार वेळेला आळंदी ते पंढरपूर अशी पायी यात्रा केली होती.
त्यांचे मूळचे नाव गणेशकुमार नरवाडे. नाटकांतील भूमिकांसाठी त्यानी सदाशव अमरापूरकर हे नाव घेतले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी 'पेटलेली अमावास्या' या एकांकितेत नायकाची आणि त्यांची पहिली-वहिली भूमिका केली होती.
सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या संस्था-संघटानांशीही अमरापूरकरांचा संबंध होता. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी 'लग्नाची बेडी' या नाटकाचे गावोगावी प्रयोग झाले होते. त्या नाटकात सदाशिव अमरापूरकर भूमिका करत असत. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ध्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर आदी सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही अमरापूरकरांचे जिव्हाळ्याचे नाते होते.
अमरापूरकरांनी श्याम बेनेगल यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या दूरचित्रवाणी मालिकेत महात्मा फुले यांची भूमिका केली होती.
मार्च २०१४ मध्ये होळीच्या उत्सवात पाण्याची नासाडी रोखण्याचा प्रयत्न करीत असताना अमरापूरकर यांना सहा व्यक्तींनी मारहाण केली होती.
सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका असलेली मराठी नाटके
- काही स्वप्नं विकायचीत
- छिन्न
- ज्याचा त्याचा विठोबा
- यात्रिक
- लग्नाची बेडी
- हॅन्ड्स अप
- हवा अंधारा कवडसा
==अमरापूर यांनी लिहिलेली/दिग्दर्शित केलेली नाटके--
- कन्यादान (दिग्दर्शन)
- किमयागार (नाट्यलेखन. हे नाटक लेलन केलर आणि तिची शिक्षिका यांच्या जीवनावर आहे.)
सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका असलेले हिंदी-(मराठी) चित्रपट
- अर्धसत्य (मराठी)
- आई पाहिजे (मराठी)
- आखरी रास्ता
- आँखे
- आन्टी नंबर १
- इश्क
- एलान-ए-जंग
- कुली नंबर १
- गुप्त
- छोटे सरकार
- जन्मठेप (मराठी)
- झेडपी (मराठी)
- नाकाबंदी
- पैंजण (मराठी)
- बाॅम्बे टाॅकीज
- २२ जून १८९७ (मराठी)
- वास्तुपुरुष (मराठी)
- सडक
- हुकुमत
- होऊ दे जरासा उशीर (मराठी)
सदाशिव अमरापूरकर यांच्या भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका
- राज से स्वराज तक
- डिस्कव्हरी आॅफ इंडिया
| दुवा = http://archive.indianexpress.com/news/roles-reversed-villain-sadashiv-amrapurkar-beaten-up/1094213/ | शीर्षक = रोल्स रिव्हर्स्ड: 'व्हिलन' सदाशिव अमरापूरकर बीटन अप | प्रकाशक = इंडियन एक्सप्रेस | भाषा = इंग्लिश | लेखक = सारिका शर्मा | आर्काइव्हदुवा = http://archive.indianexpress.com/news/roles-reversed-villain-sadashiv-amrapurkar-beaten-up/1094213/ | आर्काइव्हदिनांक = २०१४-०३-२८ | अॅक्सेसदिनांक = २०१४-१०-२६ }}
</ref>Empty citation (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |