Jump to content

मोट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोट म्हणजे जास्त प्रमाणात पाणी वाहण्यासाठी(convey/transport) मोठ्या पिशवीसदृश निमुळत्या तोंडाची जनावरांच्या चामड्यापासून तयार केलेली एक पिशवी. यंत्राचा शोध लागण्यापूर्वी व देशात विद्युतीकरण पूर्ण होण्यापूर्वी विहिरीतून बैल आणि मोटेच्या साहाय्याने पाणी काढून ते शेतीला दिले जात असे. थोड्या लहान स्वरूपातील मोटेचा वापर, पाणके धनवान लोकांकडे, दोर बादलीच्या साहाय्याने विहिरीतून पाणी काढून,ते या मोटेत भरून पाठीवर आणून, रांजणात भरण्यासाठी करीत असत.