Jump to content

"श्रीराम लागू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो योग्य वर्गनाव using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३४: ओळ २३४:
* २०१०, [[संगीत नाटक अकादमी फेलोशिप]]
* २०१०, [[संगीत नाटक अकादमी फेलोशिप]]
* २०१२, [[राजश्री शाहू कला गौरव पुरस्कार]]
* २०१२, [[राजश्री शाहू कला गौरव पुरस्कार]]

==तन्वीर सन्मान==
श्रीराम लागू यांचा तन्वीर नावाचा तरुण मुलगा मुंबईतील लोकल गाडीवर झोपडपट्टीतील मुलाने मारलेल्या दगडामुळे जखमी होऊन मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ लागूंनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान (२०१३सालच्या विश्वस्त सौ. दीपा लागू) हे इ.स. २००४सालापासून ज्येष्ठ रंगकर्मींना ’तन्वीर सन्मान’ हा पुरस्कार देते.
* २०१३सालचे पुरस्कारार्थी
** तन्वीर पुरस्कार : [[गो.पु. देशपांडे]] (मरणोत्तर) यांना
** तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार : नाट्यनिर्माते वसंत पंडित यांना


{{विकिक्वोटविहार}}
{{विकिक्वोटविहार}}

१७:२४, ६ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

श्रीराम लागू
श्रीराम लागू
जन्म डॉ.श्रीराम लागू
नोव्हेंबर १६ १९२७
सातारा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
कारकीर्दीचा काळ १९७२-पासून
भाषा मराठी
हिंदी
प्रमुख नाटके नटसम्राट
सूर्य पाहिलेला माणूस
मित्र
प्रमुख चित्रपट सामना
पिंजरा
सिंहासन
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार - १९७८, संगीत नाटक अकादमी फेलोशिप - २०१०
वडील डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू
आई सत्यभामा लागू

डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू (जन्म: १६ नोव्हेंबर, इ.स. १९२७, सातारा) हे मराठीहिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेतेदिग्दर्शक आहेत. देवाला निवृत्त करा अशी आरोळी ठोकत त्यांनी पुरोगामी आणि आणि त्यांच्या मते तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला आहे.[]

सुरुवातीचे जीवन

श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर, इ.स. १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.

कारकीर्द

वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली.[] १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. त्यांच्या पत्‍नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.[]

धर्म

श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे आहेत. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते.[] नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते.

ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले आहेत. देव हा सुद्धा एक अंधविश्वासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.[]

डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिका असलेले चित्रपट

श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)

  • अग्निपंख (रावसाहेब)
  • अँटिगनी (क्रेयाँ)
  • आकाश पेलताना (दाजीसाहेब)
  • आत्मकथा (राजाध्यक्ष)
  • आंधळ्यांची शाळा (आण्णासाहेब, विश्वनाथ)
  • आधे अधुरे (यात ४ भूमिका केल्या आहेत.)
  • इथे ओशाळला मृत्यू (संभाजी)
  • उद्याचा संसार (विश्राम)
  • उध्वस्त धर्मशाळा (श्रीधर)
  • एकच प्याला (सुधाकर)
  • एक होती राणी (जनरल भंडारी)
  • कन्यादान (नाथ देवळालीकर)
  • कस्तुरीमृग (रावबहादुर पेंडसे)
  • काचेचा चंद्र (बाबुराव)
  • किरवंत (सिद्धेश्वरशास्त्री)
  • खून पहावा करून (आप्पा)
  • गार्बो (पॅन्सी)
  • गिधाडे (रमाकांत)
  • गुरु महाराज गुरू (गुरुनाथ)
  • चंद्र आहे साक्षीला
  • चाणक्य विष्णुगुप्त (चाणक्य)
  • जगन्नाथाचा रथ (भुजबळ, सखा)
  • डॉक्टर हुद्दार (हुद्दार)
  • दुभंग
  • दूरचे दिवे (सदानंद)
  • देवांचे मनोराज्य (विष्णू)
  • नटसम्राट (बेलवलकर)
  • पप्पा सांगा कुणाचे (पप्पा)
  • पुण्यप्रभाव (वृंदावन)
  • प्रतिमा (चर्मकार)
  • प्रेमाची गोष्ट (के. बी.)
  • बहुरूपी
  • बेबंदशाही (संभाजी)
  • मादी
  • मित्र
  • मी जिंकलो मी हरलो (माधव)
  • मुख्यमंत्री (मुख्यमंत्री)
  • यशोदा (अण्णा खोत)
  • राजमुकुट (राजेश्वर)
  • राव जगदेव मार्तंड (जगदेव)
  • लग्नाची बेडी (कांचन)
  • वंदे मातरम्‌ (त्रिभुवन)
  • वेड्याचं घर उन्हात (दादासाहेब)
  • शतखंड (प्रा. धुंडिराज धांदेफळकर)
  • सुंदर मी होणार (डॉ. पटवर्धन)
  • सूर्य पाहिलेला माणूस (सॉक्रेटीस)
  • हिमालयाची सावली (गुंडो गणेश)
  • क्षितिजापर्यंत समुद्र

पुस्तके

डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ’रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे. पुस्तकाला डॉ. पुष्पा भावे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे. "लमाण" हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशन यांनी सन २००४ मध्ये प्रकाशित केले आहे.

पुरस्कार

तन्वीर सन्मान

श्रीराम लागू यांचा तन्वीर नावाचा तरुण मुलगा मुंबईतील लोकल गाडीवर झोपडपट्टीतील मुलाने मारलेल्या दगडामुळे जखमी होऊन मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ लागूंनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान (२०१३सालच्या विश्वस्त सौ. दीपा लागू) हे इ.स. २००४सालापासून ज्येष्ठ रंगकर्मींना ’तन्वीर सन्मान’ हा पुरस्कार देते.

  • २०१३सालचे पुरस्कारार्थी
    • तन्वीर पुरस्कार : गो.पु. देशपांडे (मरणोत्तर) यांना
    • तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार : नाट्यनिर्माते वसंत पंडित यांना
विकिक्वोट
विकिक्वोट
श्रीराम लागू हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.

संदर्भ

  1. ^ Support pours in for Hazare Indian Express, 13 August 1999.
  2. ^ . Times Of India. October 13, 2001 http://articles.timesofindia.indiatimes.com/2001-10-13/pune/27239714_1_pda-amateur-theatre-theatre-festival. September 23, 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Still Waters Indian Express, 20 April 1998.
  4. ^ Hindus feel hurt by Dr. Shreeram Lagoo's frank opinion that the Idols were just "stones" for him
  5. ^ As quoted by Vivek Jagar in his Article "Debates on Conscious Awakening" on Antisuperstition.Org

बाह्य दुवे