बुद्धी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बुद्धी म्हणजे वस्तू, व्यक्ती, प्रसंगमाहिती समजून घेण्याची, लक्षात ठेवण्याची क्षमता, तसेच काय चांगले व काय वाईट हे ठरविण्याची क्षमता होय.


बुद्धी कुठे असते ?https://www.educationschooltocareer.com/2020/06/blog-post_13.html


मेंदूतल्या कुठल्या भागामुळे माणसाला बुद्धी प्राप्त होते ?


बुद्धीही एकाच प्रकारची असते का अनेक प्रकारची ?


ती मेंदूच्या एकाच भागावरून ठरते का सगळीकडे पसरलेली असते ?


ती फक्त गणित आणि विज्ञान अशा गोष्टींमध्ये दिसून येते का चित्रकला, संगीत, साहित्य ,नृत्य अशा कलांमध्ये दिसून येते? https://www.educationschooltocareer.com/2020/06/blog-post_13.html


ज्याला खूप माहिती आहे त्याला पण हुशार समजावं की ज्याच्या मध्ये खूप शिकण्याची क्षमता आणि प्रेरणा आहे त्याला हुशार समजावे?


अशा तऱ्हेतऱ्हेच्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली नाहीत?
बुद्धी म्हणजे नेमकं काय ?https://www.educationschooltocareer.com/2020/06/blog-post_13.html
मित्रांनो बुद्धी म्हणजे बुध्यांक चाचणी नाही .


बुद्धी ही स्वतः मध्ये आजूबाजूच्या परिस्थितीनुसार बदल करून परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता.


या दोन्ही गोष्टी बुद्धी या संकल्पनेत येतात .


बुद्धी किंवा क्षमता या अनुवंशिक असतात


त्याचबरोबर सभोवतालच्या परिस्थितीप्रमाणे प्राप्त हि करता येतात


          आपल्या मेंदूतल्या निर्णयांची सर्किट्स ही वयाप्रमाणे उलगडत जाणाऱ्या जीन्सच्या प्रोग्रामप्रमाणे आणि तसेच बाहेरच्या वातावरणामुळे अनुभवांमुळे बदलू शकतात णूनच आपला मेंदू हा अ‍ॅडॅप्टिव्ह किंवा प्लास्टिक आहे अस आपण म्हणतो. आपली बुद्धी सुद्धा काही प्रयत्नांनी वाढू शकते का? का ती फक्त अनुवंशिक असते आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी ती बदलत नाही असं असतं का ?


       मित्रांनो बुद्धी ही बरीचशी अनुवंशिक असली तरी ती प्रयत्नांनी आणि परिस्थितीप्रमाणे वाढवू शकते .फक्त ही वाढ फारच होत नाही ,त्याला काही मर्यादा पडतात. म्हणजेच आपला मोबाईल किती जीबीचा आहे यानुसार त्याचा प्रोसेसर काम करतो. जर आपल्या मोबाईल मध्ये साठवणूक क्षमता म्हणजे जीबी कमी असेल तर आपला मोबाईल काही दिवसांनी हँग होतो .म्हणजेच त्याची साठवण क्षमता जेवढी जास्त तेवढं तो जास्त वेगाने काम करतो.


        तसंच अगदी तसंच आपल्या मेंदूच आहे. आपल्या मेंदूची वाढ ही मूल गर्भात असल्यापासूनच होत असते .त्याचा वाढीचा वेग हा आईच्या गर्भात प्रचंड असतो म्हणजे 80% आणि त्यानंतर एक वर्षापर्यंत 15% असा वाढीचा वेग होतो.


              मित्रांनो माणसाच्या मेंदूवर वळकट्या असतात .हा वळकट्याने बनलेला मोठ्या मेंदूचा बाहेरच्या आवरणाचा भाग म्हणजेच कॉर्टेक्स. इतर अनेक प्राण्यात हा अशाप्रकारे दिसत नाही. या कॉर्टेक्स मुळेच माणसाला बुद्धी मिळते. माणसाचा कॉर्टेक्स सरासरी दोन मिलिमीटर जाडीचा असतो. या कॉर्टेक्सचे सहा थर असतात .या प्रत्येक थरातल्या मज्जापेशी आकाराने वेगवेगळ्या असतात. इतर प्राण्यांना कॉर्टेक्स नसतो असं नाही. पण माणसासारख्या खूप वळकट्या नसतात.
           माणसाच्या कॉर्टेक्स वरच्या वळकट्या काढून टाकल्या आणि तो एका मोठ्या कापडासारखा अंथरून ठेवला तर त्याचा आकार A4 आकाराच्या कागदाच्या चौपट एवढा होईल. इतर प्राण्यांचे बघितलं तर चिंपांजीच्या बाबतीत असंच केलं तर हा आकार फक्त एकाच A4 कागदाएवढा होईल तर इतर माकडांच्या बाबतीत हा आकार पोस्टकार्ड एवढा तर उंदराच्या बाबतीत हाच आकार पोस्टाच्या तिकिटाएव्हडा होईल .

          बुद्धी जेवढी जास्त तेवढे या आवरणातल्या मज्जापेशी जास्त. पण या सगळ्या मज्जापेशी माणसाच्या त्या बाहेरच्या कॉर्टेक्सच्या आवरणावर मावत नाहीत म्हणूनच या सुरकुत्या किंवा वळकट्या पडल्या असाव्यात असा तज्ज्ञांना वाटतं आणि म्हणूनच जेवढे वळकट्या जास्त तेवढी बुद्धी जास्त असंही मानलं जातं .कॉर्टेक्स मधल्या या पेशी राखी रंगाच्या दिसतात.         मित्रांनो बुद्धी अनुवंशिक असते किंवा नंतर ती प्रयत्नांनी परिस्थिती प्रमाणे आपण वाढवू शकतो. यासाठी आपल्याला हवे सकारात्मक प्रेरणा. मूल आईच्या पोटात असताना सहा महिन्यांपर्यंत मेंदूवर वळकट्या नसतात. साडे सहा महिन्यांपासून ते दहा महिन्यांपर्यंत या वळकट्या पडत राहतात .जन्माच्या वेळेपर्यंत मेंदूचा 80 टक्के भाग विकसित झालेला असतो .काही माणसांचा मोठा झाल्यावरही मेंदू गुळगुळीत राहतो .त्यांना कुठलेच गुंतागुंतीची गोष्ट करता येत नाही .


          मेंदूचा आकार मोठा असला तर बुद्धी जास्त असतं असं मानलं जातं ,पण चाचणी घेतल्यावर तसे आढळले नाही. पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त हुशार असतात अशी समजूत होती पण तीही चाचणीमध्ये खरे ठरले नाही .मेंदूतल्या राखी रंगाचा जो भाग असतो त्याचा पांढऱ्या भागाशी रेशो असतो त्याचा बुद्धीशी संबंध आहे .मेंदू मधला राखी रंगाचा भाग जितका जास्त तितका बुद्ध्यांक जास्त .एखाद्याचा बुध्यांक वयाप्रमाणे बदलतो की आयुष्यभर तसाच राहतो याविषयी संशोधकांनी चाचण्या घेतल्या यामध्ये वयाबरोबर बुद्धी चक्क सुधारत होती असा आढळला. त्याचबरोबर जी माणसं लठ्ठ जाड त्यांचा बुद्ध्यांक कमी असं कळलं.        मित्रांनो आपल्या आयुष्यात खूप वेगळ्या गोष्टी केल्या तर आपला मेंदू तल्लख होतो. म्हणजेच आपल्या मुलांच्या बाबतीत मुलांचे शिकणे घडत असताना ज्ञानरचनावाद पद्धतीने जर मुलांचे शिक्षण घडलं तर मुलं स्वतःच्या स्वतःला आव्हान घेत शिकत राहतील आणि त्यांना सतत सकारात्मक प्रेरणा दिली तर मुलांची बुद्धी नक्कीच विकसित होते आणि म्हणून मुलांना सतत नवीन आव्हान वेगवेगळ्या गोष्टी करायला दिल्या तर मुलांचा बौध्दीक विकास होईल .


मित्रांनो मेंदूवरील वळकट्या म्हणजेच मोबाईल मधील मेमरी जशी आपल्याला वाढवता येत नाही परंतु निसर्गत आहात माणसाच्या मेंदू वरील वळकट्या म्हणजे जे माणसाने प्रयत्न करून वाढवलेली बुद्धी असते म्हणजेच आपण नेहमी वाचतो मेंदूमध्ये अनेक न्यूरॉन्स असतात आणि न्यूरॉन्स जोडण्याचे काम सिनॅप्स करतात .आपण घेतलेले अनुभव केलेल्या कृती यांनी त्यांची जोडणी होते आणि या जोडणीला सिनॅप्स म्हणतो .जेवढे जास्त सिनॅप्स वाढतील तेवढी बुद्धी वाढेल आणि वाढलेली बुद्धी वळकट्याच्या रूपात मेंदूवर असते.


         मित्रांनो काहींची बुद्धी ही अनुवंशिक असते तर काहींनी प्रयत्नांनी मिळवलेली असते .मित्रांनो सहज आपल्या आजूबाजूला जर आपण पाहिले किंवा आपण सतत असाच विचार करत असतो ,की डॉक्टर च्या घरात जन्माला आलेला मुलगा डॉक्टर होतो किंवा शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो. मलाही असेच प्रश्न पडलेले होते. पण आता काही प्रमाणात ते मात्र आता संशोधकांनी संशोधन केल्याप्रमाणे काहींचे बुद्धिमत्ता बुद्धी हे अनुवंशिक असते हे या उदाहरणांवरून समजते.https://www.educationschooltocareer.com/2020/06/blog-post_13.html


      मित्रांनो माझे पडलेले दोन प्रश्न हेच होते की


डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो कसा होतो आणि त्याच्या विरुद्ध आपण नेहमी बातम्यांमध्ये वाचतो ऐकतो पाहतो चहा विकणाऱ्याचा मुलगा C.A. झाला        बुद्धी अनुवंशिकतेने मिळते. त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थिती ,सकारात्मक प्रयत्न ,नवीन आव्हाने स्वीकारण्याची क्षमता याच्या जोरावर ती वाढवता येते.


 मुलांची बुद्धी वाढवायचे असेल तर आपल्या मुलांना सकारात्मक प्रेरणा नवीन आव्हाने कृती दिली पाहिजेत तुम्ही म्हणाल हे सारखेच म्हणतात सकारात्मकप्रेरणा द्या,आव्हाने द्या.पण आव्हान घ्यायची कशी???


मित्रांनो छोट्या-छोट्या कृतींतून ही आपल्याला मुलांना आव्हान देता येतीलhttps://www.educationschooltocareer.com/2020/06/blog-post_13.html


आपण आपल्या आयुष्यात सतत बदल करत राहिला पाहिजे


अगदी काही छोट्या गोष्टी केल्या तरीही


मधून मधून उलट्या हाताने ब्रश करा.
डोळे बंद करून चहा करणे
किंवा एखादा परिछेद उलटा वाचन करा 
आपण जरी अगदी जीनियस होत नसला तरी त्याचा मेंदूला फायदा नक्कीच होतो.


मित्रांनो याच बरोबर अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे बुद्धीवर संगीताचा परिणाम नक्कीच होतो 
         मित्रांनो हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल आहे ,1997 साली शॉ आणि डॉ रॉशर यांनी मुलाची बुद्धि पियानो ऐकल्यामुळे वाढते हे आम्ही सिद्ध केल्यास जाहीर केलं .त्यांना संगीताचे हे बुद्धिवर्धक धडे मिळाले होते. त्यांच्या बुद्धीत इतरांपेक्षा 34 टक्क्यांनी वाढ झालेली त्यांना आढळले आहे .त्यांनी उद्योगच सुरू केला .त्यांनी म्युझिक इंटेलिजन्स न्युरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट नावाची संस्थाही काढली .त्यांनी त्यावर ' Keeping Mozart in mind ' नावाचे एक पुस्तक लिहिलं. त्याची सीडी तयार केली आणि हे सगळं 52. 95 डॉलर्सला म्हणजेच दोन हजार पाचशे रुपयाला विकायला सुरुवात केली आणि जॉर्जिया राज्यातले राज्यपाल या प्रकाराने इतके भारावून गेले किती ते जन्माला आलेल्या प्रत्येक अर्भकाला मिळावी यासाठी त्यांनी खास प्रयत्न केले .

एकूणच काय तर आपल्या बुद्धीचा मेंदूशी ,आजूबाजूच्या वातावरणात सतत खाद्य मिळण्याची ,संगीताशी आणि इतर आणि गोष्टींशी जवळचा संबंध आहे हे नक्की.तेव्हा मित्रांनो आपल्या मेंदूला खायला द्या ,आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मक प्रेरणा निर्माण होईल असा प्रयत्न करा, त्याच बरोबर अभ्यासा वेळी घरामध्ये शांत संगीत लावा, मुलांना आनंदी प्रेरणा द्या .


सचिन बाजीराव माने