Jump to content

वर्धा–नांदेड रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
वर्धा–नांदेड रेल्वेमार्ग
Overview
सद्य स्थिती १ टप्पा पूर्ण (कळंबपर्यंत)
प्रदेश महाराष्ट्र(विदर्भ-मराठवाडा)
Services यवतमाळ मार्गे DEMU Passenger
मालक भारतीय रेल्वे
चालक द.म.रे.
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी २८४ किमी (१७६ मैल)
ट्रॅकची संख्या
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण सोबतच प्रगतीपथावर


वर्धा-यवतमाळ-नांदेड किंवा वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग हा महाराष्ट्र राज्यातील निर्माणाधीन रेल्वे प्रकल्प आहे. या मार्गामुळे यवतमाळ मार्गे वर्धा आणि नांदेड दरम्यान रेल्वे वाहतूक सुविधा सुरू होईल . भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा दिला आहे. हा रेल्वे मार्ग २८४.६५ किलोमीटर लांबीचा असेल.[][]सध्या वर्धा-नांदेड प्रवासाला १० तास लागतात, या मार्गाच्या पूर्णत्वानंतर हे अंतर ४ तासांवर येऊन वेळ व इंधनाची बचत होईल.

इतिहास

[संपादन]
  • मंजूरी: २००९
  • प्रत्यक्ष सुरुवात: २०१६
  • पहिला टप्पा: वर्धा ते कळंब (३८.६१ किमी)चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ फेब्रुवारीला २०२४ रोजी या मार्गाचे यवतमाळ दौऱ्यात लोकार्पण केले आहे.

सद्यस्थितीत वर्धा-कळंब पॅसेंजर आठवड्यातून ५ (रविवार व बुधवार वगळता) दिवस यांवर सुरू आहे. या रेल्वे गाडीला एकूण १० कोच राहणार आहेत. यामध्ये जनरलचे आठ, तर एसएलआरचे दोन कोच राहणार आहे.

  • २०२४, फेब्रुवारी ०२: राज्याच्या अर्थसंकल्पात ७५० कोटींची तरतूद

पण अजुन ३००० कोटींची गरज

भुसंपादन प्रक्रिया

[संपादन]

या मार्गाची लांबी २८४ किमी आहे आणि त्यासाठी ७२२ हेक्टर जमीन आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने ७२२ हेक्टर जमीन संपादन करण्यास मान्यता दिली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रुंदमापी रेल्वे मार्गासाठी लागणारी जवळपास ९०% जमीन अधिग्रहित करण्यात आली असून आता महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयाला निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी विनंती केली.[] भूसंपादन २०१८ मध्ये पूर्ण झाले.[]

बांधकाम

[संपादन]

पूर्ण मार्गासाठी निविदा फेब्रुवारी २०१९ मध्ये देण्यात आली होती आणि बरेच बांधकाम यापूर्वीच बांधकाम चालू झाले. ७७ कि.मी. वर्धा - यवतमाळ विभागाच्या कामाला मध्य रेल्वे क्षेत्राच्या बांधकाम संस्थेला देण्याची मंजूरी मिळाली तर २०७ यवतमाळ - नांदेड विभागाच्या कामाला रेल्वे विकास निगमला देण्याची मंजूरी मिळाली. फेब्रुवारी २०१९ पर्यंत मार्गावरील सर्व पुल (यशोदा नदी व भिंडी नदीवरील २ मोठे पूल आणि २६ छोटे पूल), आणि किमान ५४ रेल्वे अंडर ब्रिज पूर्ण झाले होते. ९.८ किमीचे एकूण 6 बोगदे या मार्गावर असतील, यापैकी सर्वात आव्हानात्मक २.५ किमी लांबीचा यवतमाळ विमानतळामागील टेकड्यातून जाणारा बोगदा आहे. सर्व स्टेशन इमारतींचे कंत्राट फेब्रुवारी २०१९ पर्यंत देण्यात आले आहेत आणि बांधकाम सुरू झाले आहे.[]

यवतमाळ नवीन रेल्वे स्थानकाचे प्रारंभिक काम सुरू झाले असून, ह्या काळादरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या(आर्णी मार्ग) परिसरात हे स्थानक उभारण्यात येत आहे.[]

किंमत

[संपादन]

२८४ किमी लांबीच्या या प्रकल्पाची एकूण सुधारित किंमत ₹३१६८.२९ कोटी आहे.[] या प्रकल्पासाठी२०१९-२० च्या पिंक बुकनुसार त्या आर्थिक वर्षासाठी ₹३५० कोटीचे वाटप करण्यात आले होते, कारण बांधकाम आधीच चालूझाले होते आणि यामुळे काही भाग जलदगतीने पूर्ण करण्यात मदत होईल.[]

लोहमार्गावरील रेल्वेस्थानके

[संपादन]

मार्गावर खालीलप्रमाणे एकूण २७ स्थानकांचे नियोजन केले गेले आहे. []

  1. सेवाग्राम जंक्शन रेल्वे स्थानक
  2. वर्धा जंक्शन, (विद्यमान स्थानक)
  3. देवळी जंक्शन
  4. भिडी, (हॉल्ट स्थानक)
  5. कळंब (कामठवाडा)
  6. तळेगाव, (हॉल्ट स्थानक)
  7. यवतमाळ जंक्शन,
  8. लसीना, (शकुंतला रेल्वे जंक्शन)
  9. लडखेड
  10. तपोना
  11. दारव्हा जंक्शन
  12. अंतरगांव
  13. हर्सूल/हरसुल
  14. दिग्रस
  15. बेलगव्हाण
  16. पुसद (होणारे जंक्शन)
  17. शिलोना
  18. पळसा
  19. उमरखेड
  20. हदगाव
  21. बामणी
  22. वारंगा
  23. देववाडी
  24. अर्धापूर
  25. मुगट जंक्शन रेल्वे स्थानक
  26. मालटेकडी
  27. हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक

भविष्यकालीन व्याप्ती

[संपादन]

या रेल्वे मार्गाचे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये आणि ९० गावात काम होईल.[] हा मार्ग कार्यान्वित झाल्यावर नागपूरविदर्भ आणि मराठवाडा भागातील इतर जिल्ह्यांमधील थेट संपर्क साधला जाईल.

कळंब ते नांदेड हा एकूण २०६ किलोमीटर लांबीचा हा मार्ग साडेतीन हजार कोटी रुपये खर्चून पूर्णत्वास जात आहे. वर्धा ते यवतमाळ या मार्गाचे ९०% काम पूर्ण झाले आहे. मार्गावर १५ मोठे पूल, २९ बोगदे व ५ उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.

  • वर्धा-यवतमाळ-नांदेड या २७० कि.मी. रेल्वे मार्गाकरीता केंद्राच्या अर्थसंकल्पात नुकतीच ₹७५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सध्या कळंब-यवतमाळ-दारव्हा या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या रेल्वेमुळे विदर्भ-मराठवाड्यातील दळणवळणाची गती वाढणार आहे.
  • नागपूरहून थेट नांदेड येथे जाण्यासाठी रेल्वे सुविधा मिळण्यासोबतच यवतमाळची उत्तर-दक्षिण अशी कनेक्टिव्हीटी होणार आहे. या रेल्वेमार्गामुळे यवतमाळ जिल्ह्यात उद्योग, व्यवसायांना चालना मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील कळंब-यवतमाळ हा मार्ग पूर्ण होताच नागपूर-वर्धा-यवतमाळ अशी रेल्वे सुरू होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
  • यवतमाळहून दररोज हजारो नागरिक नागपूरला ये-जा करतात. रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यावर नागपूर-यवतमाळ ही ब्रॉडगेज मेट्रोसेवा सुरू करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

मार्गाचे फायदे

[संपादन]

या नवीन मार्गाच्या पूर्ततेमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रामुख्याने वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली व नांदेड या ५ जिल्ह्यांमधील एकूण १०० गावांचा ज्यातील ७५ गावे यवतमाळ जिल्हात आहेत, त्यांचा रेल्वेसंपर्क सुधारेल आणि या प्रदेशांच्या सामाजिक-आर्थिक विकासात लक्षणीय योगदान मिळेल.

वर्धा ते यवतमाळ विभागाला रेल्वे आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात ६०:४० खर्चाच्या वाटणीतत्वावर मंजूरी देण्यात आली, ज्याची अंमलबजावणी मध्य रेल्वेकडून केली जात आहे. यवतमाळ ते नांदेड हा दुसरा भाग २०१८ मध्ये (RVNL) रेल्वे विकास निगमकडे हस्तांतरित करण्यात आला.


आदिलाबाद-वाशिम रेल्वेमार्ग

[संपादन]

आदिलाबाद ते वाशिम या नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण रेल्वे बोर्डाने केले आहे. हा रेल्वे मार्ग आदिलाबाद-किनवट-माहूर-पुसद-पोहरादेवी मार्गे वाशिम पोहचणार आहे. पुसद हे रेल्वेजंक्शन बनणार.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

 

  1. ^ "Wardha–Nanded rail line project gets special status".
  2. ^ "Land acquisition for new rail line in Yavatmal fast-tracked".
  3. ^ "Work will start soon".
  4. ^ Land acquisition for new rail line in Yavatmal fast-tracked
  5. ^ a b c CR to lay track on Wardha–Nanded route
  6. ^ "Work Started". 2018-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-06-09 रोजी पाहिले.
  7. ^ No new railway projects but ongoing ones get fund boost
  8. ^ "Wardha–Nanded rail line project gets special status".[permanent dead link]

बाह्य दुवे

[संपादन]