रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रिलायन्स उद्योग समूह या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र खनिज तेल
स्थापना १९६६ (’रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन’ या नावाने)
संस्थापक धीरूभाई अंबानी
मुख्यालय भारत मुंबई, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती मुकेश अंबानी (अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक)
उत्पादने पेट्रोलियम व पेट्रोलियमनिर्मित उत्पादने
रिटेल दुकाने
पॉलिमर
पॉलिस्टर
रसायने
कापड
महसूली उत्पन्न २८ अब्ज अमेरिकन डॉलर (२००७)
कर्मचारी ~१,००,००० (२००७)
संकेतस्थळ www.ril.com

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (बीएसई.500325, एनएसई.RELIANCE) ही भारतातील सर्वात मोठी खासगी कंपनी आहे. मार्च २००६ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात २८ अब्ज अमेरिकन डॉलरांचा महसूल व २.०३३ अब्ज अमेरिकन डॉलर नफा कमवणारी ही कंपनी फॉर्च्यून ५०० कंपन्यांमधील भारतीय कंपन्यांच्या पंक्तीत गेली. १९६६ मध्ये धीरूभाई अंबानी यांनी ही कंपनी स्थापली. परंतु २००६ मध्ये मुकेश व अनिल अंबाणी या धीरूभाईंच्या दोन मुलांमधील मतभेदांमुळे रिलायन्स उद्योगसमूहाचे विभाजन करण्यात आले.