Jump to content

दिग्बोई तेल शुद्धीकरण प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिग्बोई तेल शुद्धीकरण प्रकल्प (mr); Digboi Refinery (en); डिगबोई तेल शोधनागार (hi); ডিগবৈ তেল শোধনাগাৰ (as); ডিগবয় তেল শোধনাগার (bn) Asia's oldest oil refinery (en); Asia's oldest oil refinery (en); एशिया का सबसे पुराना तेल शोधनागार (hi); এছিয়াৰ আটাইতকৈ পুৰণি তেল শোধনাগাৰ (as); এশিয়ার প্রাচীনতম তৈল শোধনাগার, ডিগবয় (bn) ডিগবৈ শোধনাগাৰ (as)
दिग्बोई तेल शुद्धीकरण प्रकल्प 
Asia's oldest oil refinery
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारतेल शुद्धीकरण प्रकल्प
उद्योगpetroleum industry
स्थान आसाम, भारत
Map२७° २३′ २७″ N, ९५° ३७′ ०७″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

डिगबोई तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा डिगबोई रिफायनरी ही डिगबोई येथे १९०१ मध्ये आसाम ऑइल कंपनी लिमिटेडने स्थापन केली होती. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने १९८१ पासून आसाम ऑइल कंपनी लिमिटेडचे रिफायनरी ताब्यात घेतली आणि एक वेगळा विभाग तयार केला. डिगबोई येथील रिफायनरीची स्थापित क्षमता प्रतिवर्ष ०.५ दशलक्ष टन होती. जुलै १९९६ मध्ये रिफायनरीचे आधुनिकीकरण करून रिफायनरीची शुद्धीकरण क्षमता ०.६५ दशलक्ष टन प्रतिवर्षी वाढवण्यात आली.

डिगबोई रिफायनरी हे भारतातील तेल उद्योगाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. ११ डिसेंबर १९०१ रोजी ते कार्यान्वित झाले. आशियातील पहिली रिफायनरी आणि अजूनही कार्यरत असलेली सर्वात जुनी रिफायनरी असण्याचा गौरव तिला आहे.[] १८६७ मध्ये डिगबोई परिसरात तिनसुकिया जिल्ह्यातील घनदाट जंगलात रेल्वे लाईन टाकतानाचुकून तेलाचा शोध लागला. १८८९ मध्ये तेलासाठी खोदण्यास सुरुवात झाली आणि डिगबोई येथे १९०१ मध्ये रिफायनरी सुरू झाली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "5 Things That Make Assam Unique". Outlook India.
  2. ^ "Here is India's oil story". The Financial Express. 3 May 2018. 9 Dec 2018 रोजी पाहिले.