नुमालीगढ तेल शुद्धीकरण प्रकल्प
Appearance
Oil refinery in Assam, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | तेल शुद्धीकरण प्रकल्प | ||
---|---|---|---|
उद्योग | petroleum industry | ||
स्थान | आसाम, भारत | ||
| |||
नुमालीगढ तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा नुमालीगढ रिफायनरी हा ऑईल इंडिया लिमिटेडचा एक विभाग आहे जो भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीखाली आहे. हे भारतातील आसाममधील नुमालीगढ, गोलाघाट जिल्हा येथे आहे. नुमालीगढ रिफायनरी हा भारत पेट्रोलियम चा विभाग होता. ते १९९९ मध्ये उघडले गेले व १ ऑक्टोबर २००० पासून व्यावसायिक उत्पादन सुरू झाले.[१]
त्याची प्रतिवर्षी 3 दशलक्ष मेट्रिक टन क्षमता होती.[२] जानेवारी २०१९ मध्ये, आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट समितीने रिफायनरीची क्षमता दरवर्षी ९ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याच्या योजनांना मंजूरी दिली.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "About us: Genesis". Numaligarh Refinery Limited. 21 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Numaligarh Refinery expansion project to cost Rs 20,000 cr". Business Standard. 25 November 2014. 5 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "Numaligarh refinery capacity to be tripled". The Hindu. 16 January 2019. 13 May 2019 रोजी पाहिले.