Jump to content

रामदास आठवले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रामदास बंडू आठवले या पानावरून पुनर्निर्देशित)
रामदास आठवले

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००४
मागील रामदास आठवले
मतदारसंघ पंढरपूर
कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
मागील संदीपान थोरात
पुढील रामदास आठवले
मतदारसंघ पंढरपूर
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मागील नारायण आठवले
पुढील मनोहर जोशी
मतदारसंघ उत्तर मध्य मुंबई

जन्म २५ डिसेंबर, १९५९ (1959-12-25) (वय: ६४)
अगलगाव, सांगली जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष आर.पी.आय. (आठवले)
पत्नी सीमा आठवले (वि. १९९२)
निवास कांदीवली, मुंबई, महाराष्ट्र
धर्म नवयान बौद्ध धर्म[]
या दिवशी ऑगस्ट ३१, २००८
स्रोत: [वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती एप्रिल १०, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)]

रामदास बंडू आठवले ( २५ डिसेंबर, इ.स. १९५९) हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. ते भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.

जीवन

[संपादन]

आठवले यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील अगलगाव या गावातील एका गरीब बौद्ध (पूर्वीचे दलित) कुटुंबात झाला. रामदास आठवलेंच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांची आई हौसाबाई काबाडकष्ट करीत होती. प्राथमिक शिक्षण ढालेवाडीत (तासगाव, जि. सांगली) झाल्यानंतर पुढे काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेले. पुढे वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात राहायला गेले. त्यांची तेथे खऱ्या अर्थाने जडणघडण झाली. इ.स. १९७२ मध्ये दलित पॅंथरची स्थापना झाली व ते पॅंथर्समध्ये सक्रिय झाले. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ती व सहकारी मंडळी होती. पॅंथर्समुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांच्यात पॅंथर्सचा झंझावात निर्माण झाला.

रामदास आठवले यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. इ.स. १९७१ मध्ये मुंबई गाठली. विद्यार्थिदशेपासून अन्याय, अत्याचाराविरोधात लढले . वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये महाराष्ट्रातील अनेक दलित आणि मागासवर्गीय समाजातील मुले शिक्षण घेण्यासाठी येत असत. हे वसतिगृहच गोरगरिबांचे आधारस्थान होते. येथे चळवळीविषयी खूप चर्चा होत असत. पुरोगामी आणि दलित चळवळीतील अनेक मान्यवरांची भाषणे आणि व्याख्याने ऐकण्यासाठी जात असत.हळूहळू लोकांशी संपर्क वाढत होता. प्रा. अरुण कांबळेेंचे त्यांना वैचारिक पाठबळ मिळाले. दलित पॅंथर्सच्या चळवळीत सक्रिय झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पालथा घातला.

जेथे जेथे दलितांवर अन्याय आणि अत्याचार होत असे तेथे तेथे ही पॅंथर्स धावून जात होते. अन्यायाविरोधात पॅंथर्सच्या माध्यमांतून त्यांनी आवाज बुलंद केला. त्यांच्या आंदोलनाची भल्याभल्यांनी धडकी घेतली होती. महाराष्ट्रात भटकंती करीत असताना दलित समाजाबरोबरच कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, भटक्या आणि फाटक्या माणसांची दुःखही कळली. दलित समाज त्यांना ओळखू लागला. पुढे नामांतर आंदोलनात मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली. त्या नामांतर चळवळीतही रामदास आठवले सहभागी झाले. “जोपर्यंत मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही”, असा त्यांनी निर्धार केला. तेव्हा संपूर्ण राज्यात वातावरण तापले.

नामांतराचा लढा काही वर्षे सुरू राहिला. शिवसेनेशी व सरकारशी त्यांनी संघर्ष केला. अनेक नेत्यांसह मोर्चे आणि आंदोलनात ते सहभागी झाले. शेवटी मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ’ असा नामविस्तार वा नामांतर झाले. तेव्हाचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मुख्यमंत्री असताना हा ऐतिहासिक निर्णय झाला. मार्ग निघाला. आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली. आंदोलन, चळवळ आणि राजकारण सुरू असतानाच त्यांचा इ.स. १९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात समावेश झाला.

आठवलेंनी प्रारंभी महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम केले. पुढे आधी मुंबई आणि नंतर पंढरपूर या लोकसभा मतदार संघांतून ते खासदार झाले. पण दलितांना न्याय मिळत नव्हता. गावागावांत सन्मानाने जगता येत नव्हते. अन्याय, अत्याचार पराकोटीला पोचले होते. गांजलेल्या गरीब जनतेला त्यांनी पॅंथरचे बळ दिले. काळ बदलला मात्र, परिस्थिती काहीशा फरकाने तशीच आहे. "जुलमास जाळण्याला, मी विद्रोहाची वात झालो,' असे रामदास आठवले यांचे आजही प्रामाणिक मत आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "अठावले का मायावती पर निशाना, कहा: बौद्ध धर्म अपना लें". www.patrika.com (हिंदी भाषेत). 2016-09-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-18 रोजी पाहिले.
  2. ^ "सकाळ ०२ मार्च २०११". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-24 रोजी पाहिले.