युएफा यूरो २०१२ अंतिम सामना हा फुटबॉल सामना १ जुलै, इ.स. २०१२ रोजी ऑलिंपिस्की संकूल, क्यीव, युक्रेन येथे स्पेन व इटली संघात झाला.[१] यात स्पर्धेच्या गतविजेत्या स्पेन संघाने इटली संघाला ४-० ने हरवले आणि आपले अजिंक्यपद राखले. याबरोबरच स्पेनचा संघ लागोपाठ दोन वेळ ही स्पर्धा जिंकणारा ते पहिलाच संघ झाला व तसेच लागोपाठ तीन महत्त्वाच्या स्पर्धा युएफा यूरो २००८ आणि २०१० फिफा विश्वचषक जिंकणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय संघ झाला.[२][३]
स्पेनला स्पर्धेच्या विजेता या नात्याने २०१३ फिफा कॉन्फडरेशन चषक मध्ये सरळ प्रवेश मिळाला आहे. स्पेन संघाने २०१० फिफा विश्वचषक जिंकला असल्यामुळे त्यांचा प्रवेश अगोदरच निश्चित झाला आहे, त्यामुळे अंतिम सामन्यासाठी पात्र झाल्यामुळे इटली संघ कॉन्फडरेशन स्पर्धेस पात्र झाला.[४]