मँचेस्टर सिटी एफ.सी.
| मँचेस्टर सिटी एफ.सी. | ||||
| पूर्ण नाव | मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब | |||
|---|---|---|---|---|
| टोपणनाव | द सिटीझन्स, द ब्लूज, सिटी | |||
| स्थापना | इ.स. १८८० (सेंट मार्क्स नावाने) | |||
| मैदान | इतिहाद स्टेडियम, मँचेस्टर, इंग्लंड (आसनक्षमता: ५३,४००) | |||
| लीग | प्रीमियर लीग | |||
| २०२३-२४ | प्रीमियर लीग, प्रथम स्थान (विजेते) | |||
|
| ||||
मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब हा युनायटेड किंग्डमच्या मँचेस्टर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १८८० मध्ये 'सेंट मार्क्स' नावाने स्थापन झालेला हा क्लब १८९४ मध्ये 'मँचेस्टर सिटी' नावाने ओळखला जाऊ लागला. हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमध्ये खेळतो.
१९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात व १९७० च्या सुरुवातीस या क्लबने विविध विजेतेपदे मिळवून यश संपादन केले; परंतु त्यानंतरच्या काळात मँचेस्टर सिटीची कामगिरी घसरली. २००८ मध्ये हा क्लब 'अबू धाबी युनायटेड ग्रुप'ने विकत घेतला व संघात दर्जेदार खेळाडू मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. यानंतर मँचेस्टर सिटीची वाटचाल जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब्समध्ये झाली. २०११ मध्ये मँचेस्टर सिटीने एफ.ए. कप जिंकला आणि युएफा चॅम्पियन्स लीगसाठी पात्रता मिळवली. २०१२ मध्ये मँचेस्टर सिटीने १९६८ नंतर प्रथमच प्रीमियर लीग चषक जिंकला. पुढे पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२-२३ मध्ये क्लबने युएफा चॅम्पियन्स लीगसह 'ट्रेबल' (एकाच हंगामात तीन प्रमुख विजेतेपदे) जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.
प्रमुख विजेतेपदे
[संपादन]| स्पर्धा | प्रकार | विजेतेपदे | विजेती वर्षे |
|---|---|---|---|
| प्रीमियर लीग / फर्स्ट डिव्हिजन | राष्ट्रीय लीग | १० | १९३६–३७, १९६७–६८, २०११–१२, २०१३–१४, २०१७–१८, २०१८–१९, २०२०–२१, २०२१–२२, २०२२–२३, २०२३–२४ |
| एफ.ए. कप | राष्ट्रीय कप | ७ | १९०३–०४, १९३३–३४, १९५५–५६, १९६८–६९, २०१०–११, २०१८–१९, २०२२–२३ |
| ईएफएल कप (लॉग कप) | राष्ट्रीय कप | ८ | १९६९–७०, १९७५–७६, २०१३–१४, २०१५–१६, २०१७–१८, २०१८–१९, २०१९–२०, २०२०–२१ |
| एफए कम्युनिटी शील्ड | राष्ट्रीय सुपर कप | ७ | १९३७, १९६८, १९७२, २०१२, २०१८, २०१९, २०२४ |
| युएफा चँपियन्स लीग | आंतरराष्ट्रीय | १ | २०२२–२३ |
| युएफा कप विनर्स कप | आंतरराष्ट्रीय | १ | १९६९–७० |
| युएफा सुपर कप | आंतरराष्ट्रीय | १ | २०२३ |
| फिफा क्लब विश्वचषक | आंतरराष्ट्रीय | १ | २०२३ |
दालन
[संपादन]- इतिहाद स्टेडियम
- २०११ चा एफ.ए. कप जिंकल्यानंतरचा आनंदोत्सव
- प्रीमियर लीग विजेतेपदानंतर मैदानावर आलेले चाहते
संघनायक
[संपादन]| वर्षे | कर्णधार | देश |
|---|---|---|
| १९९८–२००० | अँडी मॉरिसन (DF) | |
| २०००–२००१ | अल्फी हॅलँड (DF/MF) | |
| २००१–२००२ | स्टुअर्ट पियर्स (DF) | |
| २००२–२००३ | अली बेनार्बिया (MF) | |
| २००३–२००६ | सिल्वेन डिस्टिन (DF) | |
| २००६–२००९ | रिचर्ड ड्युन (DF) | |
| २००९–२०१० | कोलो टूर (DF) | |
| २०१०–२०११ | कार्लोस टेवेझ (FW) | |
| २०११–२०१९ | व्हिन्सेंट कंपनी (DF) | |
| २०१९–२०२० | डेव्हिड सिल्वा (MF) | |
| २०२०–२०२२ | फर्नांडिन्हो (MF) | |
| २०२२–२०२३ | इल्के गुंडोगन (MF) | |
| २०२३–२०२५ | काइल वॉकर (DF) | |
| २०२५–वर्तमान | केविन डी ब्रूएन (MF) |
स्टेडियम
[संपादन]- हे सुद्धा पहा: हायड रोड (स्टेडियम) आणि मेन रोड
पूर्व मँचेस्टरमधील सिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियम, जे २०११ पासून प्रायोजकत्वाच्या कारणास्तव इतिहाद स्टेडियम म्हणून ओळखले जाते, मँचेस्टर सिटी कौन्सिलकडून २०० वर्षांच्या करारावर (लीज) मँचेस्टर सिटीकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.[३] २००२-०३ हंगामात या स्टेडियममध्ये येण्यापूर्वी क्लबने ३० दशलक्ष पाउंडपेक्षा जास्त खर्च करून त्याचा कायापालट फुटबॉल स्टेडियममध्ये केला. यात खेळपट्टीची पातळी खाली केली गेली, प्रेक्षकक्षमतेसाठी अतिरिक्त स्तर जोडला गेला आणि नवीन नॉर्थ स्टँड बांधण्यात आला. नवीन स्टेडियमवरील उद्घाटनाचा सामना एफ.सी. बार्सिलोनाविरुद्ध झाला, ज्यामध्ये मँचेस्टर सिटीने २-१ असा विजय मिळवला. २०१५-१६ च्या हंगामात साउथ स्टँडवर तिसरा मजला बांधून स्टेडियमची क्षमता ५५,०९७ पर्यंत वाढवण्यात आली.
१८८० ते १८८७ दरम्यान पाच वेगवेगळ्या मैदानांवर घरचे सामने खेळल्यानंतर क्लब हायड रोड फुटबॉल स्टेडियम येथे स्थायिक झाला, जिथे त्यांनी ३६ वर्षे सामने खेळले. १९२० मध्ये आगीत मेन स्टँड नष्ट झाल्यावर क्लब ८४,००० क्षमतेच्या 'मेन रोड' स्टेडियमवर गेला. ३ मार्च १९३४ रोजी स्टोक सिटीविरुद्धच्या एफ.ए. कप सामन्यात ८४,५६९ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती, जो इंग्लिश क्लब फुटबॉलच्या इतिहासातील घरच्या मैदानावरील प्रेक्षकसंख्येचा एक मोठा विक्रम ठरला.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ Leigh, Neil. "Walker 'honoured and privileged' to wear the City captain's armband". Manchester City FC (इंग्रजी भाषेत). 2025-03-12 रोजी पाहिले.
- ↑ "Pep Guardiola opens up on Manchester City's new club captain and behind-the-scenes relationship with Txiki Begiristain". Yahoo Sports (इंग्रजी भाषेत). 2025-02-12. 2025-03-12 रोजी पाहिले.
- ↑ "Etihad Stadium (City of Manchester Stadium / Eastlands) – StadiumDB.com". stadiumdb.com. 2025-03-12 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]