१९६० दशकाच्या उत्तरार्धात व १९७० च्या सुरुवातीस हा क्लब यशस्वी होता परंतु त्यानंतरच्या काळात मॅंचेस्टर सिटीची अधोगती झाली. २००८ साली हा क्लब अबु धाबीमधील एका कंपनीने विकत घेतला व दर्जेदार खेळाडू मिळवण्यासाठी कोट्यावधी पाउंड खर्च केले. त्यानंतर मॅंचेस्टर सिटीची वाटचाल प्रिमियर लीगमधील सर्वोत्तम स्थानाकडे सुरू आहे. २०११ साली मॅंचेस्टर सिटी क्लबने एफ.ए. कप जिंकला व तो युएफा चॅंपियन्स लीगकरता पात्र ठरला. २०१२ साली मॅंचेस्टर सिटीने १९६८ सालानंतर प्रथमच प्रीमियर लीग चषक जिंकला.