Jump to content

प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर
Provence-Alpes-Côte d'Azur
फ्रान्सचा प्रदेश
चिन्ह

प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी मार्सेल
क्षेत्रफळ ३१,४०० चौ. किमी (१२,१०० चौ. मैल)
लोकसंख्या ४९,५१,३८८
घनता १५८ /चौ. किमी (४१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-PAC
संकेतस्थळ regionpaca.fr

प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर (फ्रेंच: Provence-Alpes-Côte d'Azur; ऑक्सितान: Provença-Aups-Còsta d'Azur / Prouvènço-Aup-Costo d'Azur) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेला भूमध्य समुद्रमोनॅको तर पूर्वेला इटली हे देश आहेत.

प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर हा प्रदेश खालील भूभागांचा बनला आहे.

लोकसंख्या व अर्थव्यवस्था ह्या दोन्ही बाबतीत प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाचा फ्रान्समध्ये तिसरा क्रमांक लागतो (इल-दा-फ्रान्सरोन-आल्प खालोखाल).

शहरे

[संपादन]

फ्रान्समधील खालील मोठी शहरे प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशात आहेत.

क्र. शहर विभाग लोकसंख्या (शहर) महानगर
0 मार्सेल बुश-द्यु-रोन ८,५१,४२० १६,१८,३६९
0 नीस आल्प-मरितीम ३,४४,८७५ ९,९९,६७८
0 तुलॉं व्हार १,६६,७३३ ६,००,७४०
0 एक्स-अँ-प्रोव्हॉंस बुश-द्यु-रोन १,४२,७४३ मार्सेल
0 आव्हियों व्हॉक्ल्युझ १,१६,१०९ ३,९७,१४१
0 अँतिब आल्प-मरितीम ७६,९९४ नीस
0 कान आल्प-मरितीम ७२,९३९ नीस
0 अ‍ॅर्ल बुश-द्यु-रोन ५२,७२९ ५३,०५७

विभाग

[संपादन]

खालील सहा विभाग प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.

विभाग चिन्ह क्षेत्रफळ लोकसंख्या मुख्यालय घनता
04 आल्प-दा-ओत-प्रोव्हॉंस
६,९४४ चौरस किमी (२,६८१ चौ. मैल) १,५७,९६५ दिन्य २३ प्रति किमी
05 ओत-आल्प
५,५४९ चौरस किमी (२,१४२ चौ. मैल) १,३४,२०५ गॅप २४ प्रति किमी
06 आल्प-मरितीम
४,२९९ चौरस किमी (१,६६० चौ. मैल) १०,८४,४२८ नीस २५२ प्रति किमी
13 बुश-द्यु-रोन
५,११२ चौरस किमी (१,९७४ चौ. मैल) १९,६६,००५ मार्सेल ३८५ प्रति किमी
83 व्हार
५,९७३ चौरस किमी (२,३०६ चौ. मैल) १०,०१,४०८ तुलॉं १९६ प्रति किमी
84 व्हॉक्ल्युझ
३,५६६ चौरस किमी (१,३७७ चौ. मैल) ५,३८,९०२ आव्हियों १५१ प्रति किमी


खालील लीग १ फुटबॉल क्लब ह्या प्रदेशात स्थित आहेत.

वाहतूक

[संपादन]

आल्प्स पर्वतराजीमध्ये भूमध्य समुद्राजवळ वसलेला हा प्रदेश युरोपातील एक मोठे पर्यटन क्षेत्र आहे. ह्यामुळे येथे रेल्वे व महामार्गांचे जाळे आहे. टीजीव्ही ही फ्रेंच रेल्वे कंपनी येथे अनेक मार्ग चालवते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: