महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती
Appearance
(महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती (इंग्लिश: Maharashtra Pradesh Congress Committee) ही भारत देशातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्या राजकीय पक्षाची महाराष्ट्र राज्यामधील शाखा आहे. मुंबई येथे मुख्यालय असलेल्या ह्या समितीचे विद्यमान अध्यक्ष नाना फाल्गुनराव पटोले आहेत.
सध्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये काँग्रेसचे ४२ आमदार आहेत.
या आधी २००९ च्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे ८२ आमदार असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस सदस्य आहेत.
मागील प्रदेश अध्यक्ष
[संपादन]- १९६०-६३ आबासाहेब खेडकर
- १९६३-६७ विनायकराव पाटील
- १९६७-७२ वसंतदादा पाटील
- १९७२-७८ पी.के. सावंत
- १९७८ नरेंद्र तिडाके
- १९७८-७९ नाशिकराव तिरपुडे
- १९७९-८० रामराव आदिक
- १९८०-८१ प्रेमिलाताई चव्हाण
- १९८१-८२ गुलाबराव पाटील
- १९८३ एसएमआय अमीर
- १९८३-८५ एन.एम. कांबळे
- १९८५-८८ प्रभा राव
- १९८८-८९ प्रतिभा पाटील
- १९८९-९० एन.एम. कांबळे
- १९९०-९१ सुशीलकुमार शिंदे
- १९९१-९२ शिवाजीराव पाटील निलंगेकर
- १९९२-९३ शिवाजीराव देशमुख
- १९९३-९७ सुशीलकुमार शिंदे
- १९९७-९८ रणजीत देशमुख
- १९९८-९९ प्रतापराव बाबुराव भोसले
- १९९९- अनंतराव थोपटे
- २०००-०३ गोविंदराव आदिक
- २००३-०४ रणजीत देशमुख
- २००४-०८ प्रभा राव
- २००८-०८ पतंगराव कदम
- २००८-१५ माणिकराव ठाकरे
- २०१५-१९ अशोक चव्हाण
- २०१९-२१ बाळासाहेब थोरात
- २०२१- आतापर्यंत नाना पटोले
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-02-07 at the Wayback Machine.