Jump to content

अनंतराव थोपटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनंतराव नारायणराव थोपटे (११ जानेवारी १९३३) हे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री होते. भोर विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. अनंतराव थोपटे हे पुणे जिल्ह्यातील काॅंग्रेसचे नेते. त्यांनी तब्बल १४ वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले.

अनंतराव थोपटे

महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री

विधानसभा सदस्य
भोर विधानसभा मतदारसंघ साठी
कार्यकाळ
१९७२ – १९७८
मागील शंकर भेलके
पुढील संपतराव जेधे
कार्यकाळ
१९८० – १९९९
मागील संपतराव जेधे
पुढील काशिनाथ खुटवड
कार्यकाळ
२००४ – २००९
मागील काशिनाथ खुटवड
पुढील संग्राम थोपटे

जन्म ११ जानेवारी, १९३३
हातनोशी,भोर पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय काँग्रेस पक्ष
अपत्ये संग्राम अनंतराव थोपटे
निवास भोर
शिक्षण जी.डी.सी.आणि बी.ए.
गुरुकुल नौरोसजी वाडिया महाविद्यालय
सर परशुरामभाऊ महाविद्यालय
व्यवसाय राजकारणी
धर्म हिंदू

राजकीय कारकीर्द

[संपादन]

अनंतराव थोपटेनी पुणे विद्यापीठातून जी.डी.सी आणि बी.ए ची पदवी घेतली. वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी म्हणजे १९७२ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.

१९८३ मध्ये वसंतदादा पाटील यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. आमदारकीच्या दुसऱ्याच टर्ममध्ये मंत्रिपद मिळाले. दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज अशा अनेक खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.

● पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक म्हणूनही त्यांनी १९८१-१९८२ च्या दरम्यान काम पाहिले.

● पुणे जिल्हा भूविकास बँकेचे तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले.

● पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून १५ वर्षे काम पाहिले.

● १९८१ ते १९९५ या कालखंडात कॅबिनेट मंत्री.दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, विधिमंडळ कामकाज,संसदीय कार्य खात्यांचा कारभार

● पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

● इ.स १९९९ ते २००० महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष(मंत्री दर्जा) म्हणून निवड

● महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ(महानंदा डेरी) या संस्थेचे पहिले अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

● अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम अनंतराव थोपटे हे त्याच

भोर - राजगड - मुळशी विधानसभा मतदारसंघातून सलग ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

कुस्तीतील पाच सुवर्णपदके

[संपादन]

अनंतरावानी १९५२-१९५७ अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियनशिप कुस्तीमध्ये सलग ५ वर्षे सुवर्णपदक मिळवले.

सहकार खात्यातील दिवस

[संपादन]

थोपटे यांचा वयाच्या पंचविसाव्या वर्षीच सहकार क्षेत्राशी संबंध आला. ते सहायक तालुका सहकारी अधिकारी या पदावर शासकीय सेवेत रुजू झाले. 1958 ते 1971 या कालखंडात त्यांनी शासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली.सहकार अधिकारी या पदाबरोबरच विविध संस्थामध्ये प्रमुख पदावर काम केले. वेल्हे तालुक्याचे गटविकास अधिकारी म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.

निवडणूक लढविण्याचा निर्धार

[संपादन]

मूळ पिंड कार्यकर्त्याचा असल्याने शासकीय नोकरीमध्ये थोपटे यांचे मन रमेना.म्हणून 1972 साली शासकीय सेवेचा राजीनामा देण्याचे धाडस यांनी केल आणि अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढविली आणि निवडून आले.खऱ्या अर्थाने त्यांचा सहकार,सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली.

शेतकऱ्यांसाठी लढा

[संपादन]

थोपटे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँकेचे राज्य स्तरावरील संचालक म्हणून व जिल्हा स्तरावरील अध्यक्ष म्हणून 1980 ते 1982 च्या दरम्यान काम केले.भू-विकास बँक या नावाने ही बैंक आजही प्रचलित आहे. या कालखंडात थोपटे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने कर्जवाटप करून योग्यवेळी शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागविली.त्यामुळे शेतीमध्ये नगदी पिके घेऊन आणि शेतीपूरक व्यवसाय करून गरीब अशा शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली.

मंत्रिमंडळात समावेश

[संपादन]

सुमारे 30 वर्षे भोर-वेल्हे या दोन तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले.तसेच 14 वर्षे विविध खात्याच्या मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत आपल्या अंगी असलेल्या अभ्यासू आणि अचूक निर्णयक्षमतेचा ठसा उमटिवला. या काळात त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविले. म्हणूनच एक अभ्यासू ,कार्यालयीन कामकाजबरोबरच प्रशासकीय कामाची तंतोतंत माहिती असलले मंत्री अशी प्रतिमा सर्व अधिकार आणि कर्मचारी यांच्यामध्ये निर्माण झाली.

विविध खात्यांचा पदभार

[संपादन]

अनंतरावाना अनेक खात्यांचा अनुभव होता. वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले होते.

दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) अशी विविध खाती त्यांनी भूषवली.

महानंद डेरीची स्थापना

[संपादन]

थोपटे यांनी दुग्धविकास राज्यमंत्री आणि मंत्री म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर कल्पकता आणि दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी दूध उत्पादनास मोठ्या प्रमाणावर चालना दिली. त्यांनी त्यावेळी दूधाचा महापूर योजना कार्यान्वित केली. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ स्थापन करण्यात त्यांचा वाटा होता. महानंद डेरीचा प्रारंभ त्याच काळात झाला. या संस्थेचे पहिले अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

दत्त दिगंबर वाहतूक संस्था

[संपादन]

थोपटे यांनी दत्त दिगंबर सहकारी वाहतूक कामगार संस्था 1975 मध्ये स्थापन केली. भोर व वेल्हे तालुक्यात वाहन चालक आणि वाहक यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. दुसऱ्याच्या ट्रकवर काम करणाऱ्या सर्व वाहन चालक व वाहक यांना एकत्र करून या संस्थेचे सभासद केले. या सभासदांनी या संस्थेचा आधार घेऊन बँकांकडून अर्थसाहाय्य उपलब्ध करून दूध वाहतुकीसाठी टँकर घेतले आणि संस्थेमार्फत दुधाची वाहतूक टँकरद्वारा करण्यास सुरुवात केली. त्यांनी वाहतुकीच्या उत्पन्नातून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली.

साखर कारखान्याचे स्वप्न

[संपादन]

थोपटे यांनी 1988 सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर राजगड सहकारी साखर कारखाना मर्या. अनंतनगर,निगडे, ता. भोर, जि. पुणे ची नोंदणी केली.1981 ते 1988 या प्रदीर्घ कालावधीपर्यंत कारखान्याच्या नोंदणीसाठी पाठपुरावा केल्यावर यश मिळाले.त्यावेळी भोर-वेल्हे तालुक्यासारख्या डोंगरी भागात साखर कारखाना उभा करून चालविणे धाडसाचे होते. या कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ऊस लागवडीखाली आले.त्यामुळे तरुण वर्गास रोजगार उपलब्ध झाला.तालुक्यातील विशेषतः डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.

पराभवाचा धक्का

[संपादन]

१९९९ साली काशिनाथ खुटवड यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा धक्का होता. हा पराभव झाला नसता व काॅंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली असती तर अनंतराव थोपटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते.

पुन्हा विजयमाला

[संपादन]

१९९९ ते २००० महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) म्हणून निवड

पुन्हा इ.स २००४ ते २००९ पर्यंत आमदार

संदर्भ

[संपादन]